Wednesday, October 17, 2012

नवरात्र

नवरात्र


 अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते. प्रतिपदेस या दिवशी देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात,   नऊ दिवस रोज ...
एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते. दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.

आदिशक्तीची नऊ रुपे  :  नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

Tuesday, October 16, 2012

दुर्गेचे रूप

दुर्गेचे रूप 

दुर्गेचे रूप 
  • दुर्गेचे पहिले रूप शैलीपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिलाशैलपुत्रीअसे नाव पडले आहे....
  •  नवशक्तीपैकी ब्रम्हचारिणी हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.
  •  दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते.
  • दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव कुष्मांडा आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.
  • दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते.
  •  दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते.
  •  दुर्गेचे सातवे रूप कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते
  • दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.
  • दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे

Monday, October 15, 2012

55 कोटींचे बळी - गोपाळ गोडसे लेखक

"55 कोटींचे बळी" वाचा म्हणजे हे बेगडी गांधीप्रेम निवळेल. गोपाळ गोडसे लेखक आहेत. Gandhi-vadh-kyo-गाँधी-वध-क्यों Hindi version of Marathi Book "55 कोटींचे बळी"

Sunday, October 14, 2012

नवरात्र शुभेच्छापत्रे

नवरात्र शुभेच्छापत्रे 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ
साधिके,शरण्ये त्र्यंबके
गौरी नारायणी नमोस्तुते "
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !