Showing posts with label आठवण. Show all posts
Showing posts with label आठवण. Show all posts

Tuesday, June 5, 2012

पावसाच्या त्या सुंदर क्षणी


पावसाच्या त्या सुंदर क्षणी
तो अन मी असेच बसायचो
एकमेकांच्या गप्पांत
उगाच तासंतास रमून जायचो

आठवतात ते क्षण
सोबत एकमेकांच्या सहवासातले
दोघांनी समुद्र किनारी बसून
वाळूतही स्वप्नातले घर साकारलेले

ते बाईक वरून आमच फिरणं
रोज रोज नाही पण कधीतरी असायचं
दोघांच एकमेकांवर प्रेम करणं
जणू स्वप्न सुख भासायचं

त्यान माझी उगाच काळजी करणं
मला नेहमीच खटकायच
त्या काळजीतीलही त्याच प्रेम
मला नंतर जाणवायच

भर पावसातही दोघे
आम्ही स्वच्छंदी होऊन फिरायचो
सिहगड काय अन माथेरान काय
सर्वच पालथ घालायचो

पावसाचे ते टपोरे थेंब
अंगावर झेलायला त्याला खूप आवडायचे
त्याच्या ह्या आवडीवर
मी मात्र त्याच्यावर खूप चिडायचे

रुसवा फुगवा काढत
दिवस असेच उडून जायचे
जीवनाच्या वाटेवर आतातरी
आपण स्थिर व्हावे आसे मला वाटायचे

माझ्या वाटण्याचा आता त्याला नाही गंध
हे मला सारख जाणवायच
माझ्या पेक्षाही आता त्याला
कोणी दुसरेच जवळच भासायचं

दिशा बदलल्या , वाटा बदलल्या
पण तरीही मन त्याच्यासाठीच झुरायचं
कधीतरी तो परत येईल
असा वेडा विचार मन माझ करायचं

आजही पावसाचे ते क्षण
हवेहवेसे वाटतात
पण पाउस येताच
पाण्याबरोबर आठवणीही वाहून नेतात...!!! 
-अनामिक

Friday, September 30, 2011

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा ?

आठवण
   

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....

नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणींना एकदा एकत्र मिळून वेचू...

पण तेव्हा सारं काही बदललेलं असेल...
कुणीतरी बोलावतय म्हणून भेट लवकर सुटेल...

लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणींचा हाच झरा त्या दिशेने वाहणार नाही...

आज सोबत आहोत मनासारखे जगून घेऊ ...
जीवनभर पुरतील  अश्या आठवणी साठवून घेऊ ....!!!!

-अनामिक

Thursday, July 22, 2010

खरंच तू कशी ?.......

खरंच तू कशी ?................
तू अशी तू तशी, खरंच तू कशी ?

तू अशी लडिवाळ
तू प्रेमाचा वेल्हाळ
वाणी तुझी रसाळ
म्हणून का तू मला पाडलंस फशी ?

तू मैत्र अन प्रेमाचा मळा
तू मम जीवीचा जिव्हाळा
तू प्रेममयी घुंगुरवाळा
काय तुझी मी वर्णू महती अशी ?

तू दीपस्तंभाची ज्योती
तू सृजन्मनाची प्रीती
तुजसवे उमलती सरी नाती
कळले आता मनास ओढ तुझी का अशी ?


---**----

.... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा
तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला
तुजवर रचलेल्या कवितांमधून
जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

---**-----
तेव्हा आले सगळे बघायला !!


होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,


जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,

आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?
---**----


आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वात पाहत असेल ,,,
माझ्याकडे पावसाचा पहिला थेंब पडला आहे
तुझ्याकडे पण पडला असेल
आठवला मला तो आपल्या भेटीचा पहिला क्षण
कदाचित तुला पण आठवला असेल ,,,,,,,,,

रप रप ना-या आवाजात
तो तुला काही तरी विचारित असेल
आकाशात ढग दाटलेत
तसेच मनात आठावानिचे काहुर माजले असेल ,,,,,,,,,,,

तुझा मनात त्याला
खुप काही सांगायचे असेल
परन्तु तोपर्यंत तो कसा थांबेल
कारण ,,,,,,,,,
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वात पाहत असेल ,,,,,,,,

Tuesday, July 20, 2010

जीवन
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !

सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हालता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !

चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली ?
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !

मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या प्रीतीला, या मातीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !

गीत - शांता शेळके
संगीत - राम-लक्ष्मण
स्वर - उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
चित्रपट - आपली माणसं (१९७९)
__._,_.___

..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा
तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला
तुजवर रचलेल्या कवितांमधून
जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?
---**-----
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वाट  पाहत असेल ,,,
माझ्याकडे पावसाचा पहिला थेंब पडला आहे
तुझ्याकडे पण पडला असेल
आठवला मला तो आपल्या भेटीचा पहिला क्षण
कदाचित तुला पण आठवला असेल ,,,,,,,,,
रप रप ना-या आवाजात
तो तुला काही तरी विचारित असेल
आकाशात ढग दाटलेत
तसेच मनात आठावानिचे काहुर माजले असेल ,,,,,,,,,,,
तुझा मनात त्याला
खुप काही सांगायचे असेल
परन्तु तोपर्यंत तो कसा थांबेल
कारण ,,,,,,,,,
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वाट  पाहत असेल ,,,,,

-----**----

Monday, July 19, 2010




आठवण 
"तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते..

तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...

स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते....

तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते..,

हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा... देउन जाते....."
-अनामिक 

Tuesday, July 6, 2010

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली..



कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,


स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥


आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥


वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली
...॥४॥




तू अशीच आहेस,


एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....


तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....


तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....


तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...


तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी .....


तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ......




तिला मी शोधतो
आहे.....


"परि" नसली तरी "खरी" असावी ती...
सुसंकृत, भारतीय परंपरा जपणारी.


आपल्या संस्कृतीचा अभिमान असणारी.
"मी मराठी भाषिक"असं अभिमानानं सांगणारी.


समजूतदार अणि माझी प्रिय मैत्रिण होणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;


मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एवढं सगळे गुणं "असणारी"सापडणे कठीणयं हो!


पण शोधात आहे.तुम्हाला कोठे सापडली तर मला कळवा लगेचं



Sunday, October 12, 2008

तुझी आठवण..
तुझी आठवण..
सकाळी आठवण रात्रीची आठवण..
दिवसभर मनात रेंगा लनारी आठवण ..
कस सांगू काय असत या साठ्वानित..
अजुन ही काय काय जपले या आठवणीत..
कधी असते एका छत्रीत घालवलेली एक ओलिचिम्ब संध्याकाळ..
तर कधी रन रन त्या उन्हत उगाच फटकत घालवलेली दुपार ..
कधी तू सहज बोलता बोलता दूर सारलेली माझ्या केसांची बट,
तर कधी अड़ खलत धरलेला हात..
कधी असतात आपलं खोटी खोटी भाडन,
आणि मी रुस्ल्यावर तुझ डोळ्यातून हसन..
कधी असतात उगाचच तासंतास मारलेल्या गप्पा..
तर कधी असतात तू सवईने मारलेल्या गमज्या..
कधी असत रंगलेले आपले sms war.
तर कधी मुदाम हुन घातलेला वाद..
कधी असत रात्रि उशीराच च्रोरून बोलने...
तर कधी असते तू नेहमी माझ्यासाठी गायलेले गाने..
अशा तुझ्या आठवणी
एक्ट साधून नेहमीच येतात...
तर कधी चार चौघात गाढ्तात..
कधी हसवतात तर कधी रडव तात..
तुज्या आठवणी म्हणजे
बेधुंद कोसलनारा पाउस
कधी गार गार वार
तर कधी बोचणार उन
कधी रंगांची उधलन
तर कधी मोरपिशी स्वप्न
कधी दिवसाचा हर एक प्रहर
तर कधी दोन स्वसामधिल अंतर..
कधी असतात माझ्या जगण्याच कारण
तर कधी माज्या अस्तित्वाचा एक भाग..
तुझी आठवण

Saturday, September 20, 2008

शाळे समोरुन जाताना
बालपण मनात गवसत
वर्गात डोकाऊन पहाताना
आठवणींनी मन भरतं
मागे वळुन पहाताना
वाटत तिथेच आहोत आज
तेच सर्व मित्र अन्
तोच बसायचा बाक
आठवणी असतात अभ्यासाच्या
मार दिलेल्या गुरु़जींच्या
मधल्या सुट्टीत गंमत भारी
होती शाळा माझी न्यारी.
माझ्याही आहेत अनेक आठवणी
शाळे मधल्या गमतीच्या
खेळामधल्या मस्तीच्या
सहलीतल्या सफरीच्या
ह्रदयात त्या रुजल्या आहेत
कायमच्या घर करुन बसल्या आहेत
जरी...
दिवस आता बदलले आहेत.
आठवणी विसरत नसतात
संस्कारां बरोबर येत असतात
घडवायचे असते जिवन आपुले
शाळेला कधी विसरायचे नसते.

Saturday, September 13, 2008

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु.
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे.
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल........................!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल................!

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल....................!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा.
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील.
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक.,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल .....

Friday, September 12, 2008

रोज आठवण यावी असे काही नाही,
रोज भेट घ्यावी असेही काही नाही,
मी विसरणार नाही याला "खात्री" म्हणतात,
आणि तुला याची खात्री असेल तर
याला "मैत्री" म्हणतात........