Showing posts with label मन. Show all posts
Showing posts with label मन. Show all posts

Sunday, May 7, 2017

मन हे चंचल

मन हे चंचल | मन हे चपळ | न राहे स्थिर | एकापरि || रजतम दोषांचे | सत्वसद्गुणांचे | षड्रिपूविकृतिंचे | अधिष्ठान ते || 
मन अवघे आकाश | तोडी सारे भवपाश | दृश्यादृश्याचा भास | दाखवि ते || 
मन हे दर्पण | व्यक्तित्वावलोकन | आत्म्यासह जीवन | पूर्णरूप || 
भौतिकतेचा मारा | व्यापक हा जगपसारा | अध्यात्माचाही गाभारा | पेलितसे ते ||
अध्यात्माची नीव | ईशाची जाणिव | प्रयासी हा जीव | त्याचसाठी|| 
मन स्थिर निर्मळ | होवो निश्चल विमल | भगवंताचे सकल त्यात | दर्शन होवो||
सज्जनांच्या संगती | मनाची निवृत्ति | आत्मचैतन्याची विर्गती | साध्य होवो || 
-इंद्रायणी सुनील श्रीगिरीवार

Monday, February 27, 2017

मन

मन ताजं व्हावं, म्हणून घरासमोरच्या आवारात फेरफटका मारायला आले . माझे घरही एका सुंदर डोंगराच्या पायथ्याशीच आहे. हिरव्यागार गवतावर  चालताना आजूबाजूचा जुनाच निसर्ग नव्याने पाहण्याचा प्रयत्न सुरू होता. संध्याकाळी घरट्याकडे परतलेल्या आणि परतणाऱ्या पक्षांची टेहळणी चालू होती.
निसर्गामधील माझ्या कुतूहलाचा विषय ठरलेला हमिंगबर्ड सतत लक्ष वेधून घेत होता. एकाच फुलावर पुढे जाऊन क्षणात मागे परतण्याच्या त्याच्या हालचालींनी तो नेहमीसारखाच कुतूहल निर्माण करत होता.
मला तो नेहमी विसरभोळा वाटतो. जणू त्याला फुलाच्या कानात काहीतरी सांगायचे असते आणि थोडं सांगून झाल्यावर पुढे जातो अन उरलेलं सांगायला पुन्हा मागे येतो. इवलासा रंगीत पक्षी; पण त्याचा वेग आणि चंचलता भुरळ पाडणारी, वेड लावणारीच.
काही महिन्यांपूर्वी, त्याला कॅमेराबंद करताना त्याने माझी अगदी दमछाक केली होती. त्यावेळी तीन-साडेतीन तासांचा आटापिटा करून त्याने मनाजोगता ‘शॉट‘ दिला होता. हे सर्व चालू असतानाच संध्याकाळचा थंड वारा मनाला सुरेल गाण्यांच्या आठवणींचे हिंदोळे देत होता.

या सगळ्या आठवणींमध्ये रमताना आणि निसर्ग न्याहाळताना पाच-दहा मिनिटं अगदी छान गेली आणि चालता-चालता अलगद एक थेंब अंगावर पडला, तो पुढे येणाऱ्या आनंदाची चाहूल घेऊनच! अलबत, तो पावसाचाच थेंब होता. क्षणातच थेंबांच्या सरी झाल्या आणि सरींचा पाऊस झाला.

पाऊस, पावसाची सर आणि एक सुखद अनुभव. प्रत्येकाचा पावसातला, पावसाबद्दलचा काही ना काही अनुभव असतोच; तसाच हा माझा अनुभव..

ढगांना आलेली करडी काळीभोर छटा,
त्यातून डोकावणारी विजांची चमकदार, क्षणभंगुर; पण विस्मयकारक अशी नक्षी,
अंगावर अलवार विसावणारे टपोरे थेंब, तो त्यांचा शहारे आणणारा स्पर्श..
सो सो करणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला साथ देणारा ढगांचा गडगडाट
आणि या आविष्काराला कोणतीही उणीव भासू अन्ये, म्हणून मृदूपणे दरवळणारा मातीचा सुगंध... हे सारं जणू पंचमहाभूतांच्या प्रीतीभेटीची एक अनोखी निसर्गभेटच!

पायवाटेवरून वाहणारं, पायात रुंजी घालणारं पाणी,
त्यातच, स्वत:ची जाणीव करून देणारा खळखळणारा निर्झर,
क्षणात कायापालट झालेला डोंगरावरचा हिरवा शालू,
अन तिच्यात जरी भरल्यासारखं उठावदार अस्तित्व दाखवणारा धबधबा..
पाना-पानांना आलेला चंदेरी रंग आणि त्यावरून ओघळणारे थेंब, जणू कारंजेच..
पावसाच्या पाण्याने न्हाऊन निघालेली झाडं, जणू नुकतीच न्हालेली सुंदर तरुणी..
जिचं सौंदर्य उजळलं असावं आणि तिच्या केसांतून अजूनही मोत्यांचे थेंब ओघळत असावेत, तसं पानांवरून ओघळणारं पाणी
अन सुष्टीचीही मोहून टाकणारी जादू पाहून तजेलदार झालेलं मन..!

या अनुभव-साक्षात्कारात रमून झाल्यावर मी भानावर आले.  मनाचा थकवा दूर पळून गेला होता आणि नवा उत्साह निर्माण झाला होता. आता आवारातून घराकडे जायला पाऊल पुढे टाकलं.......रानु

Tuesday, October 5, 2010


पान जरी कोरं असलं,तरी...




पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात
म्हणून मानत चालणार्या भावनेचा खेल आपल्याला कळत नाही
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....
-अनामिक 

Saturday, March 13, 2010

मन


मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळ त नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो...........

Tuesday, September 16, 2008

माझं मन
सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितल तर एकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही .
चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडल तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही.
माझं मन हे असं का ? कुणालाच उमजत नाही .
निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितिही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही
कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच समजत नाही .