Showing posts with label स्वप्नं. Show all posts
Showing posts with label स्वप्नं. Show all posts

Sunday, March 14, 2010



स्वप्नं


हरवलेली स्वप्नं


मी,
गारव्याला झाडाखाली
ती,
विस्कटलेल्या चेहऱ्याची
गालावर आसवांचे डाग
हातात टोपली....
माझ्याजवळ आली
इकडं तिकडं घोटाळली
काय हरवलं असावं?
तिचं ते धांडोळण
बघता बघता
माझी नजर
पायाकडं
बरीच चाल
चाललेले पाय
काय शोधत फिरताहेत....?
मी विचारलं
तिचं उत्तर....
हरवलेली स्वप्न!