Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Monday, December 23, 2024

मैत्री

मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज ~ चंद्रशेखर गोखले
-----------------
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.

मैत्री ही एक प्रामाणिक आणि तरल संकल्पना. जिथे आपलं मत व्यक्त करायला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं तीच खरी मैत्री. प्रत्येकाने मैत्रीचं वेगवेगळं रुप पाहिलं आहे. जीवाला जीव देणारा घनिष्ठ मित्र असावा असं प्रत्येकालाच वाटतं. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं समर्पण मैत्रीमध्ये अभिप्रेत असतं. 'मी माझा' हा माझा चारोळी संग्रह खूप गाजला. या चारोळ्या लिहिल्या तेव्हा मी खूप एकटा पडलो होतो. वाईट प्रसंगांमध्ये साथ देणारं कुणीच नव्हतं. तेव्हा मनात बरेच चित्रविचित्र विचार यायचे. मी बराच वेळ चितन, मनन करण्यात घालवायचो. मी तेव्हा खूप उदास आणि निराश झालो होतो. त्यावेळीच मैत्रीचं खरं मूल्य कळलं आणि मनातले विचार कागदावर उतरवले.

माझ्या आयुष्यातील मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर पत्नी ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आजपर्यंत पावलोपावली तिने मला साथ दिली आहे. आपल्याला समजून घेणारी व्यक्तीच खरा मित्र बनू शकते हे मी अनुभवलं आहे. आयुष्यातली सगळी नाती आपल्याला जन्मापासूनच मिळत असतात. मैत्रीचं एकच नातं निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. त्यामुळे आपला जिवलग मित्र कसा असावा हे ठरवता येतं. मैत्री ही खूप छान भावना आहे असं मला वाटतं. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधनं नसतात. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री होऊ शकते. मैत्री जितकी जुनी आणि दणकट तितकीच नाजूकही असते. त्यामुळे ती काळजीपूर्वक जपावी लागते. माझ्या मते पती-पत्नीची मैत्री हे सर्वोच्च नातं ठरू शकतं. कारण पती-पत्नी एकमेकांना आणि कुटुंबाला समजून घेणारे असतील तर सध्या अस्तित्वात आलेली विभक्त कुटुंबपद्धती लुप्त होईल आणि सशक्त समाज निर्माण होईल.

आजकालच्या चित्रपटांमध्ये मैत्रीची बरीच छान रुपं पहायला मिळतात. 'अजब प्रेम की गजब कहानी', 'वेक अप सिद' अशा चित्रपटांमधून मैत्रीचं सुरेख चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून घनिष्ठ मैत्रीची उत्तम उदाहरणं पहायला मिळतात. आजच्या पिढीमध्ये मैत्री खोल रुजलेली आहे. पूर्वी मैत्री करण्यासाठी तितकसं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं. आजच्या पिढीला ते स्वातंत्र्य मिळालं आहे आणि तरुणाई त्याचा उपभोगही घेत आहे. आजकाल मुलामुलींमध्ये निकोप आणि निखळ मैत्री पहायला मिळते. समाजानेही त्यांच्या मैत्रीला मान्यता दिली आहे. काही ओंगळ प्रकार सोडले तर मैत्रीचं फुललेलं नातं पहायला मिळतं. मैत्री केवळ आनंद आणि समाधान देणारी असते असे नव्हे तर मैत्रीतून बरंच काही शिकायला मिळतं. दृष्टी विस्तारित होते. विचारांच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे मैत्री हे आयुष्याचं सर्वस्व आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

आजकाल मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मैत्री निभावणं सोपं झालं आहे असं म्हणता येईल. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्कात राहता येतं. अशा मनमोकळ्या आणि निकोप मैत्रीची सुरूवात घरापासूनच झाली तर किती मजा येईल ! 'जीवाला जीव देणारे मित्र' असा शब्दप्रयोग बरेचदा केला जातो. पण, ती मैत्री खरोखरच इतकी अतूट आहे का याचा विचार करणंही आवश्यक असतं. 'नुसतं बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही' हे सूत्र मैत्रीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. कारण केवळ एकत्र वावरणारी मुलं-मुली मैत्री निभावू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये मैत्रीचे सूर जुळणं आवश्यक असतं. मैत्री ही निर्व्याजच असली पाहिजे. त्यामध्ये काही स्वार्थ असेल तर त्याला मैत्री म्हणताच येणार नाही. चोवीस तास एकत्र राहिलं म्हणजे मैत्री झाली असं म्हणता येणार नाही. तो केवळ सहवास ठरू शकतो. याउलट वर्षानुवर्षे एकमेकांना न भेटणार्‍या मित्रांमध्येही अतूट नातं टिकून असतं. मी माझ्या बर्‍याच मित्रांना वर्षा-दोन वर्षांनी भेटतो. पण, या कालावधीत आमच्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडलेला नसतो. एकमेकांना भेटण्यातील आतुरता आणि आपुलकी तितकीच टिकून असते. मनामध्ये मैत्रीचा अंश कायम असतो. त्यामध्ये कोणताही फरक पडत नाही.

लहानपणापासून केल्या गेलेल्या संस्कारांनुसार 'पोटात माया असली पाहिजे' असं म्हटलं जातं. मैत्रीच्या बाबतीत मात्र हे गणित थोडं वेगळं आहे. मैत्रीमध्ये प्रवाही रहायचं असेल तर ती व्यक्त झालीच पाहिजे. ती व्यक्त केल्याने भावनांना मूर्त स्वरुप प्राप्त होतं. मैत्री अनेक पद्धतींनी व्यक्त करता येते. आपण कोणती पद्धत अवलंबतो यावर मैत्रीचं पुढचं गणित अवलंबून असतं. पूर्वीच्या आणि आताच्या मैत्रीत बराच फरक आहे. वाङमयात आणि साहित्यात मैत्रीच्या कथा वाचायला मिळत असल्या तरी पूर्वीच्या मैत्रीमध्ये थोडा मोजकेपणा होता. मैत्री जपून केली जायची. मैत्री करण्याआधी बर्‍याच बंधनांचा विचार करावा लागायचा, मोकळं होण्याची मुभाही नव्हती. मैत्रीमध्ये मात्र मोकळं होणंच अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने आजची मैत्री खर्‍या अर्थाने आदर्श ठरते. ती उथळ झाली आहे असं काही जणांचं म्हणणं असतं. पण, उथळपणाचं हे प्रमाण नगण्य आहे. कॉलेजमध्ये असताना आमचा ग्रुप खूप दंगा घालायचा, मस्ती करायचा. 'झुकझुक गाडी' म्हणून हा ग्रुप प्रसिद्ध होता. आम्ही एका टाळीने सगळ्या मित्र-मैत्रिणींना गोळा करायचो आणि एकमेकांना धरून सगळीकडे झुकझुक गाडीप्रमाणे पळायचो. तेव्हा लोक आम्हाला नावं ठेवायचे. पण, आमच्यासाठी ती एन्जॉयमेंट होती. अभ्यास, असाईनमेंट यासाठी सगळे मित्र-मैत्तिणी एकमेकांवर अवलंबून असायचे. सुख-दु:ख, आनंद अशा कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. म्हणूनच आमच्यामध्ये सशक्त बंध निर्माण झाले. आजकाल अशीच सशक्त मैत्री पहायला मिळते. मुलं-मुली एकमेकांबरोबर मोकळेपणाने वावरतात. इतर लोक त्यांना नावं ठेवत असले तरी एकमेकांच्या मैत्रीची महती केवळ त्यांनाच माहिती असते. शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यापैकी कोणती बाजू निवडायची हे आपल्यावर अवलंबून असतं. स्वातंत्र्य मिळालं र जबाबदारी पार पाडता यायला हवी आणि जबाबदारी अंगावर घेतली तर स्वातंत्र्यही अनुभवता आलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाचा दृष्टीकोन संस्कारांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने मैत्रीचं भावविश्व उलगडता येतं. हा दिवस साजरा करावा की नाही, याबाबत बराच उहापोह केला जातो. पण, तो साजरा करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. वास्तविक वर्षाचे ३६५ दिवस मैत्रीचेच असतात. पण तरीही एखाद्या विशिष्ट दिवसाला मैत्री दिन मानायला काय हरकत आहे? मैत्रीचं स्वरुप खूप सुंदर असलं तरी काही ठिकाणी ते खटकतंही. भारत-पाकिस्तान संबंधांबाबत असंच काहीसं म्हणता येईल. हे दोन देश वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यांच्यामध्ये ओढून-ताणून मैत्री निर्माण केली जात आहे. वास्तविक मुळातच जिथे द्वेष असेल तिथे मैत्री होणं शक्य नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तानसारखे दोन शत्रू मित्र होऊ शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे.

(अद्वैत फीचर्स)

चंगो

Wednesday, March 1, 2017

कविता

अतिशय सुंदर कविता :

भाग्यवान  होती  आमची  पिढी जिने मोबाइल शिवाय मैत्री  अनुभवली.

काॅलेजला जाताना एखाद दिवस रिकामा असायचा.

रोजच्या न विसरणारया गोष्टीमध्ये मोबाइल  नसायचा.

९ ते ५ काॅलेजनंतर ते विश्व संपायचे.

काॅल्स आणी मेसेजेस न करताही दुसरया दिवशी अचूक भेटायचो.

कुणी नाही  आलं तर १ रुपया घेऊन पिवळा डब्बा गाठायचो.

अड्डा बदलला तर तशी बाकीच्यांच्या गाडीवर चिट्ठी सोडायचो.

दिवसभर प्रत्येकाची तेव्हा तोंडाची टकळी चालू असायची.

कुणी गेम्स किंवा whatsapp  अशी विस्कळीत स्थिति नसायची.

गप्पांमधले पॅाजेस तेव्हा गाण्यांनी भरुन निघायचे.

मन, कान आणी डोळे दर ५ मिनीटांनी फोन नाही शोधायचे.

भेटल्यावर तेव्हा खर्या अर्थाने एकमेकांची सुखदुःखे कळायची.

आता दिवसभर  whatsapp  करुनही दुःखे स्वतःकडेच ठेवायची.

मोठमोठ्याने टाळया देऊन हसणे आता smilyवरच भागते.

Technology  व satellite असुनही wavelength जुळणे क्वचितच होते.

खरेच भाग्यवान होती आमची पिढी जिने
मोबाइल शिवाय मैत्री अनुभवली.

आताचे विशेष दुःख हेच की ही कविता मित्र मैत्रिणीला whatsapp वरच ऐकवली!!

Tuesday, December 20, 2016

मित्रा


मित्रा, 
एका जागी नाही असे फार थांबायचे 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे 

दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक 
तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक 
रक्त इमानी तयाने असे नाही भुलायाचे 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे 

घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल 
जन्मगाठ जिवघेणी तुला तोडावी लागेल 
निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे 

होय, कबूल; तुलाही हवा कधीचा निवारा 
गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा 
पण पोरक्या उन्हात, सांग कोणी पोळायचे? 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे
~ सुधीर  मोघे

Sunday, August 7, 2016

मैत्र दिन



मी कोण सांग ना
तुझंच मन तुला देणारा...
ती सर पुन्हा मागते का
तो हळवा थेंब ओघळणारा...



मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday, September 30, 2011

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा ?

आठवण
   

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....

नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणींना एकदा एकत्र मिळून वेचू...

पण तेव्हा सारं काही बदललेलं असेल...
कुणीतरी बोलावतय म्हणून भेट लवकर सुटेल...

लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणींचा हाच झरा त्या दिशेने वाहणार नाही...

आज सोबत आहोत मनासारखे जगून घेऊ ...
जीवनभर पुरतील  अश्या आठवणी साठवून घेऊ ....!!!!

-अनामिक

Saturday, June 25, 2011

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी

 अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी 

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

Friday, May 20, 2011

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..

मैत्री

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते
आनंद दाखवण्यासाठी
हसायची गरज नसते

दु:ख दाखवण्यासाठी
...आसवांची गरज नसते
न बोलता ज्याच्यामध्ये सगळेच
कळते ती म्हणजे मैत्री!!!!!!!!!!!!!!!!!!!   
-अनामिक

Tuesday, April 12, 2011

Sunday, August 22, 2010

मैत्री

सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार
आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
योगायोगानेच आपली ओळख झाली
वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली

मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
काय सांगू काय नाही असं व्हायचं
तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं

आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो

एके दिवशी नको तेच अघटित घडले
तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
एकदा भांडणाचा उद्रेक झाला
तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला

आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
प्रेमाने "दाद्या" म्हणशील म्हणून रोजच मरतोय
एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
कधी तरी माझी आठवण काढशील का ग
मानलेल्या या भावाला आठवशील ना ग

असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...
-अनामिक 

Sunday, March 14, 2010



मैत्री


मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारा


मी आहेच असा सतत बोलनारा
मित्राना नको ते प्रश्न विचारनारा
प्रश्न विचारुन त्याना सतवनारा
उत्तरे संग म्हणुन
तगादा लावणारा


मी आहेच असा मस्त जगनारा
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा
आपल्यातच आपलपन जपनारा
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा


मी आहेच असा मनासारख जगनारा
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारा


मी आहेच असा सर्वांच ऐकनारा
आई वडील याना देव माननारा
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा

Saturday, March 13, 2010

मैत्री


आयुष्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,


मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,


एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,


सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी



मैत्री


मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे

मैत्री


मैत्र! एक गोंडस नाव,
एका नात्याचं. रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात
हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं
आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक,
आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.
आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो,
तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा.


मैत्री

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा....



मैत्री
चांगला मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांना मिळतोः
गर्दीतल्या थोडयांशीच आपला सूर जुळतो ....


सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करत
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरत ...


सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यक्तीत होत आहे...


आपनातं कायम राहो हीच सदिच्छा
जीवनातील पत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्या !!



मैत्री


इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.



मैत्री


मैत्री करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा


मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा


मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा


मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!

Sunday, February 14, 2010

कधी मिळतो मदतीचा हात,
हिच मैत्रीची सुरुवात

मैत्री म्हणजे
प्रत्येक पायरीवर एक हळुवार फ़ुंकर

मैत्री म्हणजे
प्रत्येक वळणावर एक भक्कम आधार

मैत्री म्हणजे
मायेची जिव्हाळ्याची साठवण
मनाने दिलेली मनाची आठवण

हा मैत्रीचा धागा नीट जपायचा असतो
कारण .....................
काही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटुन जातात

जशी बोटांवर रंग ठेवुन
फ़ुलपाखरु हातुन सुटून जातात


Monday, February 8, 2010



मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१


मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३


तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा...