Showing posts with label बालपण. Show all posts
Showing posts with label बालपण. Show all posts

Wednesday, March 29, 2017

बालपण

कुठे गेले ते बालपण ?

ते अंगणात धुडूधुडू धावणे |
देवघरासाठी फूले गोळा करणे |

शाळेत न जाण्यासाठी नको ती नाटके |
आणि गेल्यावर बाईँच्या छडीचा मार खाणे |

शाळेतल्या मित्रांबरोबर खेळायला जाणे |
लवकर आलो नाही म्हणून आईचे रागावणे |

बाबांचा खांद्यावरून फेरफटका मारणे |
रस्त्यावरील खेळण्यासाठी नुसता हट्ट धरणे |

रात्रीत रंग भरणाऱ्या त्या आजीचा गोष्टी ऐकणे |
गोष्टींतल्या शंका न राहून विचारणे |

सायंकाळी ताईबरोबर अभ्यासाला बसणे |
नाही केला म्हणून तीचे ते ओरडणे |

दमल्यावर आईच्या मांडीवरच झोपणे |
नाही येत म्हणून तीचे ते बोबडे गुणगुणने |

खरचं कुठे गेले ना ते बालपण ?
***

Friday, February 1, 2013

बालपण खरच छान असतं

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं .....

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

-श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने !!

Saturday, February 18, 2012

मामा तुझं गाव



मामा तुझं गाव..
लहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं
दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय
इथे शेजारीच राहतो माझा मामा
आणि अलीकडे पलीकडे अश्या दोन मावश्या
एवढी जवळ प्रेमाची नाती आली आणि
तेवढीच दूर त्याची गोडी गेली

लहानपणी आठवतंय,
मामाचं गाव सोडून जाताना
त्याच्या अंगणातला छोटा दगड खिशात घेतलेला
उर भरून आठवण आली की डोळे भरून साठवायला

त्याची छोटी पोरं, केलेली मजा.. त्या दगडात दिसायची
कडी, कोयंडे घासताना तुझ्या बागेतल्या झोपाळ्याचा आवाज यायचा
आणि आठवण काढताना कधी कधी मुद्दाम वाजवायचा

खरं सांगू मामा,
खूप खूप आठवण यायची तुझी
जेव्हा मैलोनमैल लांब होतास
आणि आज जेव्हा चार हातांवर आहेस तर ती आस नाही
आठवड्यातून एकदा भेटायचा पण त्रास नाही

दुराव्यातला गोडवा तो हाच का
उगाच आलास इतक्या जवळ तू मग
लांब असतानाच्या तुझ्या आठवणी त्रास द्यायच्या
पण तुझ्या आठवणींनी दिवस रंगवून द्यायच्या
अगदी त्या रंग भरायच्या पुस्तकासारख्या...!!!!
-अनामिक

Sunday, July 3, 2011

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

बालपणीच्या   कविता 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार,
शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हॆलो हॆलो करायला छोटासा फोन

बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्याच्या फुलातून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

कित्ती कित्ती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
-अनामिक

Sunday, March 14, 2010



बालपण


!! बालपणात जायचयं !!
देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं
देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!


शाळेत काही चुकलं तर्‌,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!


चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!


बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!४!!


लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन्‌ तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!५!!


तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं

Saturday, September 20, 2008

शाळे समोरुन जाताना
बालपण मनात गवसत
वर्गात डोकाऊन पहाताना
आठवणींनी मन भरतं
मागे वळुन पहाताना
वाटत तिथेच आहोत आज
तेच सर्व मित्र अन्
तोच बसायचा बाक
आठवणी असतात अभ्यासाच्या
मार दिलेल्या गुरु़जींच्या
मधल्या सुट्टीत गंमत भारी
होती शाळा माझी न्यारी.
माझ्याही आहेत अनेक आठवणी
शाळे मधल्या गमतीच्या
खेळामधल्या मस्तीच्या
सहलीतल्या सफरीच्या
ह्रदयात त्या रुजल्या आहेत
कायमच्या घर करुन बसल्या आहेत
जरी...
दिवस आता बदलले आहेत.
आठवणी विसरत नसतात
संस्कारां बरोबर येत असतात
घडवायचे असते जिवन आपुले
शाळेला कधी विसरायचे नसते.