Showing posts with label मी. Show all posts
Showing posts with label मी. Show all posts

Sunday, March 4, 2012

मी न शब्दात माझ्या


मी न शब्दात माझ्या
मी न बोलात माझ्या
म्हणती श्वास ज्यास
तोही न कह्यात माझ्या !

ग्रीष्मातल्या ऊनासाठी
क्षण ओले मी वेचिलेले
कोरडे का जाहले सारे
ओंजळ-स्पर्शाने माझ्या !

... अनुकूल न पडले फासे
पटावरती आयुष्याच्या
जिंकूनही "तो एक डाव"
जिंकण्यात का हार माझ्या !

छबी हसरी दावूनी दु:खा
फसविते मी रोज तयांना
वाट थोपविल्या अश्रूंची
जाते या मनातून माझ्या !

सोहळे माझ्या सुखांचे
सजले होते कधीकाळी
मोसम तो मी जगलेला
आज ना आठवांत माझ्या !
-अनामिक 

Sunday, March 14, 2010

मी

मी

मी आणि माझी दोन मन
नेहमी आम्ही भांडतो  असतो
 एखाद्या प्रश्नावर १० वेळा  विचार करतो
त्या प्रश्नाचा उत्तर तिघपन शोधतो
कधीतरी प्रश्न प्रश्नच राहतो
तिघ आम्ही एकाच मुलिवर प्रेम करतो
तरी त्या दोघात कोण तरी विरोधात असतो
त्या दोघांचा भान्दनात मी मात्र एकता असतो
मी अणि माझी दोन मन.
-अनामिक 

Wednesday, October 8, 2008

असाच आहे मी


असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा

वाऱ्याबरोबर दुर 
फिरायला जाणारा

हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला

असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला
-अनामिक 

Monday, October 6, 2008

मी असाच आहे

मराठी कविता

मी असाच आहे
अनोळखीशी ओळख करणारा
पण निखळ मैत्रीवर विसावणारा
मी असाच आहे
कोणाच्या ध्येयासाठी
ध्यास पणाला लावणारा
मायेच्या आशेसाठी
आनंद वर्षाव करणार
डोळ्यातील अश्रू
ओठांवर ठेऊन हसणारा
मी असाच आहे
पाउसाच्या रिमझिम
सरीवर ओलाचिब भिजणारा
हळूच कोणाच्या आठवणीत मावळणारा
दिलेला शब्दासाठी
बेधुंदीने कर्तुत्व निभावणारा
मोठे तर सर्वच असतात
पण मनाने मोठे असणारा
शब्दांची भाषा नको मला
पण त्यांच्या भावनाने सर्वाना जाणणारा
कारण मी असाच आहे.
-अनामिक 

Thursday, September 25, 2008

मी आहे हा असा आहे

मी....

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
-अनामिक