Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

Tuesday, March 13, 2012

मुंबई

मुंबई मुंबई मुंबई

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय
८ रूपयाला वडापाव आणि ...१० रु ला चाय
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय
आणायची ९० रु किलोची चिकन सांगायच बोकडाच मिळतच नाय
अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय ………..

सकाली सकाली ९ वाजता उठायच
बिना तोंड धुता खिडकित यायच
शेजारच्या पोरीला शाळेत जाताना
हळूच म्हणायच हाय
तीने रागात पाहिल तर
म्हनायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच रोंग़ नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय

रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्त
बाइक वाल्यांची किर किर
फेरीवाल्यांची दादागिरी
सड्लेली कोथिम्बिर
कच्च कुच्च वडापाव
आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन
पर प्रान्तियानाच म्हनाय्च भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय

पान्या साठी पलायच , ग्याससाठी रांगा
कामाला जान्या अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आत मधे
आणि बाहेरच लटकतात पाय
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय

काही ही असुद्यात
पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती
तीच आमची ताय आणि तीच आमची माय
आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय
आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय
गरिबाच पोट आणि दुधावरली साय...
-अनामिक

Saturday, June 19, 2010

मुंबई

मुंबई चमकत्या सिनेतारकांची
लुकलुकणाऱ्या चमचमणाऱ्या स्वप्नांची
रोज रोज प्रगत होणाऱ्या संस्कृतीची
त्यातूनच उद्भवणाऱ्या अधोगतीची!!!!

स्वप्नं पाहणाऱ्या एका राजाराणीची
हाताला काम हवं असलेल्या नोकराची
पोटाला हव्या असलेल्या भाकरीची
मराठी माणसाने दिलेल्या बलिदानाची !!!!!

अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या घातपाताची
माणुसकी म्हणून माणसाने माणसाला केलेल्या मदतीची
हिजडे बनून बघत राहणाऱ्या राजकारण्यांची
अभेद्य हिंममत असणाऱ्या मुंबईकरांची !!!!!

फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांची
वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांची
इतर कोणत्याही देशात नसलेल्या लोकसंख्येची
सर्वात भयानक ढसाळ अशा राजकारणाची!!!!!

गुजराथी मारवाडी व्यापाऱ्यांची
परप्रांतीय असलेल्या कामगारांची
भ्रष्टाचाराने ग्रासित नोकरशाहीची
मराठी माणसावर होणाऱ्या असीमित अत्याचारांची !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
-अनामिक