Showing posts with label आयुष्य. Show all posts
Showing posts with label आयुष्य. Show all posts

Tuesday, December 13, 2016

आयुष्य

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..
आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे !
"सुखासाठी कधी हसावं लागंत, तर
कधी रडावं लागतं,
.
.
.
कारण सुंदर
धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं"...

Saturday, January 26, 2013

Friday, July 6, 2012

सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी


सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी
ओठान्तले मोती नकळत, शब्दांत ओविले मी

अश्रूतला सूर मज, कळला उशिरा जेव्हा
डोळ्यांच्या ओल्याव्यास आधी ,खूप तुडविले मी

परतीच्या वाटेला मी, पाठ फिरविली अशी
मग दूर जाता -जाता असे,मार्ग हरविले मी

आज पावेतो आयुष्याचे, गूढ सुटेना मजला
आता नकळत जाळ्यांचे, फास सोडविले मी

जे पाश मजला हवे ,त्यांनीच दूर लोटिले
मग ती बंधने इथे, कधी न जुळविले मी

आजचाच चंद्र हा, अर्धाच इथे दिसतो मज
कधी काळी पुनवेत त्याचे, वर्तुळ घडविले मी

नितळ निर्झर निरंतर, वाह्तोच हा रोज झरा
घालून बांध आज तयाच्या ,सुरास अडविले मी

इथे सारेच नियम माझे ,तरीही अनघाच आज
चिरीमिरी आयुष्यात, प्रारब्धासहि फितविले
-रजनीकांत दुसने 

Sunday, May 27, 2012

आयुष्य

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.देशपांडे

Wednesday, April 11, 2012

कोणी गेलं म्हणून, आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...


कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं......

आठवणींच्या वाटांवरून आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...
आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही,
रात्रतुझीच आहे.

त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...
तुझ्याच वेड्या श्वासांकडे थोडं जगणं मागायचं असत...
-अनामिक

Thursday, April 5, 2012

माझी शाळा

माझी शाळा.....


शाळेचे ते दिवस आठवले की ...
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं....
Highway जवळ
ची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं....
... शाळा आमची छान होती ...
Last bench वर आमची team
होती ....
Cricket च्या वेळी ground वर
cheating व्हायची ...
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन
मधल्या वडा-पाव साठी ....
साला नेहमीच line असायची ...
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो ...
प्रतिज्ञेच्या वेळी हातालाटेकू
देऊनही ....
प्रतिज्ञा म्हणायचो ...
प्रार्थनेच्या वेळी मात्र....
सगळ्यांसारखे ...
नुसतेच ओठ हालवायचो ....
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन .... मुद्दामचभिजत
जायचं ...
पुस्तक भिजू नये म्हणून ....
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं....
शाळेतून येता येता ... एखाद्या डबक्यात
उडी मारून ...
उगीचच सगळ्यांच्या अंगावर
पाणी उडवायचं ....
Black -board वर
बोलणार्या मुलांमध्ये ....
Monitor नेहमीच आमचं नाव
लिहायचा ...
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे ...
हातावर duster चा व्रण असायचा....
प्रयेत्येक Off -period ला P.T.
साठी ....
आमचा आरडाओरडा असायचा ...
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा....
तो बर्फाचा गोळा संपवायचा....
मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही....
कधी कोणी link नाही लावायचं...
प्रत्येक महिन्यातून एकदातरी ...
डोक्यावरचे केस कापायचो ...
आणि आज-काल सारख्या प्रत्येक
वाक्यात ....
शिव्या सूद्धा नाही द्यायचो ...
इतिहासात वाटतं ....
होता शाहिस्तेखान ...
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ....
गणित... भुमितीत होतं ... पायथागोरस च
प्रमेय ...
भूगोलात वाहायचे वारे .... नैऋत्य...
मॉन्सून ...
का कुठलेतरी ... वायव्य....
हिंदीतली आठवते
ती "चिंटी कि आत्मकथा"
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा ...
शाळेतल्या gathering चा dance...
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा...
तो मराठी चा तास ....
दरवर्षी नवीन भेटायचे ....
Uniforms
आणि वह्या पुस्तकांचा set.....
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ....
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात....
desk वर pen ने त्या "pen fights"
खेळणं ....
exams मधल्या ...
रिकाम्या जागा भरणं ... आणि जोड्या
जुळवणं ...
चिखलातल्या त्या football
च्या matches ...
कबड्डीत ... पडून धडपडून ....
हातापायांवर आलेले scraches ...
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा....
मला पुन्हा लहान व्हायचं ....
हसायचं .... खेळायचं ....
मला पुन्हा शाळेत जायचं ..
-अनामिक

Saturday, March 10, 2012

आयुष्य


किती क्षणाचं आयुष्य असतं.
आज असतं तर उद्या नसतं.

म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं.
कारण इथं कुणी कुणाच नसतं.

जाणारे दिवस जात असतात
येणारे दिवस येतच असतात.

जाणा-यांना जपायचं असतं
येणा-यांना घडवायचं असत
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं...!
-अनामिक 

Tuesday, March 6, 2012

जीवन यालाच म्हणायच असत


कधी कधी जीवनात इतक
बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे
टोचतानाही खळखळून हसाव
लागत, जीवन यालाच
म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने  भरलेल्या डोळ्यांना पुसत,
आणखी हसायच असत.

Friday, February 24, 2012

आता तरी हसून घे


आता तरी हसून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

माहीत आसते सर्वाना फुलणारे
फूल हे सुकनारेच असते
किती ही ते जपले तरी

कोमेजनारच असते
आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

काही बरोबर आणलेल नसत
काही बरोबर नेता येत नाही
इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला
क्षणभर सुख ही देता येत नाही
देण्यात ही सुख आसते
ईतके तरी समजावून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

काहीच आपल्या हातात नसत
काहीच आपण करत नाही
किती ही योजना आखल्या
तरी तसे काही घडत नाही
कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे

कोणावर तरी प्रेम कर
आपला त्याला मानून घे

आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

तुला काय वाट ते तूच
सारे करत आसतेस
नशिबात जे आसते तसेच
सारे घडत असते
मीळतय जे आत्ता तुला
ते तर उपभोगून घे

काळजी सोड नशिबवर स्वत:वर हसून घे
शहाणपण ठेव बाजूला
मनप्रमाणे जगून घे

आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे.....
-अनामिक 

Wednesday, February 15, 2012

जीवन हे मोजकच असतं


जीवन हे मोजकच असतं, 
ते हसत हसत जगायचं असतं, 
जुळलेलं नातं कधी तोडायचं नसतं, 
सुख दुःखाने आयुष्य हे भरलेलं असतं, 
कुठं काही हरवतं तर कुठं काही सापडतं, 
त्यातुनच हरवलेलं शोधायचं असतं, 
पाठ फिरवुन घाबरायचं नसतं, 
कारण आयुष्य हे आयुष्य 
असतं ते सगळ्यांनी जगायचचं असतं। 
-अनामिक

Monday, January 16, 2012

कारण हे वयच असं असतं

कारण हे वयच असं असतं....


कारण हे वयच असं असतं....
 पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते..
रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते....
कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात...
पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात...
सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....कारण हे वय असंच असतं.....

कुठून येतं फुलपाखरू??
कुठे निघुन जातं ??
चिमटीत उरतो रंग
तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं....
भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं.....कारण हे वयच असं असतं....

सप्तरंगी स्वप्नांचे दिवस..
वाऱ्यासारखे निघून जातात..
जगाने दिलेल्या जखमांवर..
हळूवार फुंकर घालतात..
जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..?
कारण हे वयच असं असतं..
-अनामिक

Wednesday, January 4, 2012

जीवन हे असच असतं


मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
... आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं.

एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...

जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं....
-अनामिक 

Wednesday, November 23, 2011

आयुष्य जास्त सुंदर वाटत



आयुष्य जास्त सुंदर वाटत......
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…….

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत……….

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत………

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत………..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…..
-अनामिक

Monday, October 3, 2011

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...


खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...
काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.
-अनामिक

Saturday, July 30, 2011

पुन्हा नवी सुरूवात....

 पुन्हा नवी सुरूवात....
    - शशांक नवलकर


पुन्हा नवी सुरूवात....
आयुष्याची नवी सुरूवात....
प्रथम करावी की शेवटी....

नेहमी काहीतरी वेगळंच ठरतं
श्वासही थांबतातच शेवटी...
पण अगदी शेवटालाही......

नवीन श्वासो-श्वास...चालूच
खरच म्हणतो कधी कधी...
संपवावं सारच काही....

पण काहीना काही सूरू होतंच...
प्रत्येक ओळीचा शेवट....
एक नवी सूरूवात असतेच...

पण मग नवी कविता सुचणार कशी...

Sunday, May 22, 2011

आयुष्य कधी असंही जगावं लागतं..

आयुष्य

आयुष्य
कधी असंही जगावं लागतं,
खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,

कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबावं लागतं,
इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं,

तीव्र इच्छा असून देखील नाही म्हणावं लागतं,
...खूप प्रेम असुन देखील नाही असं दाखवावं लागत,

असं इतरांना हसवता हसवता कधी खूप रडावं लागतं,
कधी असही जगावं लागतं !!!!
-अनामिक

Friday, May 20, 2011

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..

मैत्री

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते
आनंद दाखवण्यासाठी
हसायची गरज नसते

दु:ख दाखवण्यासाठी
...आसवांची गरज नसते
न बोलता ज्याच्यामध्ये सगळेच
कळते ती म्हणजे मैत्री!!!!!!!!!!!!!!!!!!!   
-अनामिक

Tuesday, April 5, 2011

Saturday, February 5, 2011

आयुष्य जास्त सुंदर वाटत.....


आयुष्य जास्त सुंदर वाटत





आयुष्य जास्त सुंदर वाटत..

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत....


नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला
आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत...


भविष्याचे
चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून
पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....


कायमच मागण्या
करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत.....


हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या
खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...


चारचौघात
एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत...


आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण
कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....


आकाशातले
तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य
तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत..
-अनामिक 

Tuesday, November 30, 2010

जन्माला आला आहेस थोड जगुन बघ...



जीवनाचे कोडे??
जन्माला आला आहेस
थोड जगुन बघ..!
जीवनात दुःख खुप आहे
थोड सोसून बघ..!
चिमुटभर दुखानी
कोसुनं जाऊ नकोस ..!
दूखाचे पहाड़
चडून बघ ..!
यशाची चव
चाखून बघ ..!
अपयश येते
निरखून बघ ..!
दाव मंडन सोपे असत जीवनाचे घोडे
खेचून बघ ..!
घरटे बंधने सोपे असते थोडी मेहनत
करून बघ ..!
जगन कठिन असत मरण सोपे असत डोन्हितल्य वेदना
ज़ेलून बघ ..!
जीने मरने एक कोड असते जाता जाता एवढ
सोडवून बघ ..!
-अनामिक