Sunday, June 12, 2011

सर बरसू लागे..वारा उधाणू लागे..

पाऊस
सर बरसू लागे..वारा उधाणू लागे..
वेड्या सरींच्या संगे..
ऋतू हा हिरवा..|

नभ भरून येई.. मेघ मल्हार गाई..
वीज ताल हो देई..
पाऊस कविता..|

अशा सुरेल दिनी..दाटे आनंद मनी..
अशी मोहक गाणी..
सरींनी गायली..|

अशी मैफिल जमे..मोर तालात नाचे..
सूर नभात भिणे..
मंजुळ मुरली..|

वर डोंगर माथी..झरे गीत हे गाती..
धबधबे ही ओती..
सुरेल तानांचे..|

पाट वाही झुळझुळ..त्याचे सूर देई भूल..
खळाळून उठे ताल..
सुरमयी तराणा..|

अशा सुरेख रचना..भारावून टाकी मना..
सूरगंधर्व घराणा..
नभातून जन्मतो..||

0 comments: