मैत्री! एक गोंडस नाव,
एका नात्याचं.
रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात
हे मैत्री किती तऱ्हांनी बागडत असतं
आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून
धरून ठेवावं
कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी
सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून
नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी,
एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक,
आहे आहे म्हणेपर्यंत
रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून
चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला
सुरक्षित जपून ठेवायचं
काम चोख बजावतं
आपलं मन.
आणि जसा जसा
आयुष्याचा किनारा
जवळ येऊ लागतो,
तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
प्रेमाची उब देणारी ती झुळुक मीच असेल.............
0 comments:
Post a Comment