ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....
तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....
तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....
खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....
म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....
तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....
कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....
इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....
नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....
- कमलेश गुंजाळ
कमलेश गुंजाळ BLOG
--***-----
होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..
कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...
नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा
पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा
कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............ !
पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा............ .!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,
होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा........
----***---------
हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी..... पिठामंदी
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ..........
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या .......... रं काट्या कुट्या
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान .....ग शिकून शान.....
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या.......
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी.........̱ग तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले............ .......
- कवी नारायण सुर्वे
----------------------*********-------------------
मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा
मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!
का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??
आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!
मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा
मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!
का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??
आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!
एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी
मी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??
भले आजही तुला जिवंत मी दिसेनही
मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "
Abhijit Nagle
BLOG
------**--------
गर्वसे कहो,We Are मराठी…………
लटकणारा
चेहरा आणी कपाळावर आठी,
गर्वसे कहो,We Are मराठी,
आमची मुंबई,मराठी मुंबई,
अशी घोषणा देऊन फसलो,
नि आमची मुंबई,
भलत्याच्याच हातात देऊन बसलो………
गल्ल्यावरचा मद्रासी अण्णा,
गालातल्या गालात हसतो,
नि मराठी माणूस,
टेबलावरती फडके मारत बसतो………..
आमच्या प्रांतात आम्हीच उपरे,
नाही आधार कुणाचा पाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी,
मराठी माणूस देवाला भितो, कर्जाला भितो,
एवढा दोघांनाही भित नाही,
तेवढे इंग्रजीला भितो…………….
कुणी 'अरे' म्हटलेकी की तोंडातून 'कारे' निघून जाते,
पण कुणी BASTARD म्हटलं,
की सगळी हवाच निघून जाते……………
मराठी भाषेला जाऊन एकदा प्रश्न केला,
मुंबईतून गेलीस तशी महाराष्ट्रातून जावे,
असा विचार मनात नाही आला???
त्यावर ती म्हणाली,
काल होती बहिणाबाई आणी मुक्ताबाई,
आज असे कुसूमाग्रज आणी पुं.लं. माझ्या वारी,
थांबले त्यांच्याचसाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी…………….
बोलता बोलता अचानक उठली अन् म्हणाली,
छंद झाला, हौस झाली, कवीता झाली,
पण पुरत नाही ती पोटासाठी,
आता निघाले जरा खळगी भरण्यासाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी……………
----**----------
बहारो फुल बरसावो...
तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..
तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..
बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..
तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..
म्हणतात प्यार मे
दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..
बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..
नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..
खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..
एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..
अरे खाट
तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....
बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..
--------***-----------
रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….
आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..
अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….
झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….
माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..
विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना…………………
शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना……………
सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….
-------***------------
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा...
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा...
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ, प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा..
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा
-----------***----------
जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…
- एल्गार, सुरेश भट
------***--------
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही
जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही
मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…
- एल्गार, सुरेश भट
--------***-----------
1 comments:
या कवितेविषयी बराच घोळ घातला गेला आहे. याला कारण जितेंद्र जोशी नावाच्या कुणा गायकाने या कवितेचे मूळ सांगतांना बर््याच थापा मारल्या आहेत. ही कविता मुळात नारायण सुर्वे यांची नाहीच. ती हिंदीतून अनुवादीत झालेली कविताही नाही. मराठवाड्यातल्या पाचपोळ नावाच्या कवीचे हे गाणे आहे. डिसेंबर २००५ च्या धुळे येथील विद्रोही साहित्य संमेलनात हे गाणे विद्रोही शाहीरी जलसा या कलापथकाने सादर केले. त्या नंतर हे गाणे दक्षिण महाराष्ट्रात खुपच लोकप्रिय झाले. हे एक लोकप्रिय लोकगीत बनल्याने याच्या कॉपीराईट इ. विषयी कोणी फारशी काळजी घेतली नाही. आता काही गायक हे गाणे चोरून त्याच्या सिडीज बनवित आहेत. पण दुर्दैवाने या गाण्याच्या मूळ निर्मात्यांना याचे श्रेय देण्याचे बेमालून टाळले जात आहे. असल्या उठवळ व उचल्या लोकांपासून मराठी ब्लॉगवाल्यांनी सावध रहायला हवे. नाहीतर मराठी साहित्याचा सारा इतिहासच खोटा लिहीला जाईल.
अविनाश कदम, मुंबईसेंट्रल, मुंबई
Post a Comment