खरंच तू कशी ?.......
खरंच तू कशी ?................
तू अशी तू तशी, खरंच तू कशी ?
तू अशी लडिवाळ
तू प्रेमाचा वेल्हाळ
वाणी तुझी रसाळ
म्हणून का तू मला पाडलंस फशी ?
तू मैत्र अन प्रेमाचा मळा
तू मम जीवीचा जिव्हाळा
तू प्रेममयी घुंगुरवाळा
काय तुझी मी वर्णू महती अशी ?
तू दीपस्तंभाची ज्योती
तू सृजन्मनाची प्रीती
तुजसवे उमलती सरी नाती
कळले आता मनास ओढ तुझी का अशी ?
---**----
.... सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....
..... सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा
तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला
तुजवर रचलेल्या कवितांमधून
जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?
---**-----
तेव्हा आले सगळे बघायला !!
होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,
आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,
जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,
जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,
आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?
---**----
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वात पाहत असेल ,,,
माझ्याकडे पावसाचा पहिला थेंब पडला आहे
तुझ्याकडे पण पडला असेल
आठवला मला तो आपल्या भेटीचा पहिला क्षण
कदाचित तुला पण आठवला असेल ,,,,,,,,,
रप रप ना-या आवाजात
तो तुला काही तरी विचारित असेल
आकाशात ढग दाटलेत
तसेच मनात आठावानिचे काहुर माजले असेल ,,,,,,,,,,,
तुझा मनात त्याला
खुप काही सांगायचे असेल
परन्तु तोपर्यंत तो कसा थांबेल
कारण ,,,,,,,,,
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वात पाहत असेल ,,,,,,,,
1 comments:
aha hah hah bharunch aal ekdam
Post a Comment