Tuesday, July 6, 2010

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली..



कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,


स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥


आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥


वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली
...॥४॥




तू अशीच आहेस,


एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....


तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....


तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....


तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...


तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी .....


तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ......




तिला मी शोधतो
आहे.....


"परि" नसली तरी "खरी" असावी ती...
सुसंकृत, भारतीय परंपरा जपणारी.


आपल्या संस्कृतीचा अभिमान असणारी.
"मी मराठी भाषिक"असं अभिमानानं सांगणारी.


समजूतदार अणि माझी प्रिय मैत्रिण होणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;


मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एवढं सगळे गुणं "असणारी"सापडणे कठीणयं हो!


पण शोधात आहे.तुम्हाला कोठे सापडली तर मला कळवा लगेचं



Related Posts:

  • जीवनजीवनगाणे गातच रहावेझाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावेजीवनगाणे गातच रहावे ! सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वालाहृदये हालता वरखाली ताल म… Read More
  • आठवण "तुझी आठवण येतानागंध तुझा घेउन येते,हरवलेल्या स्वप्नांनारंग तुझा देउन जाते.. तुझ्या पैजणांची रुणझुणकानांमध्ये दाटुन येते,मी मिटुन घेतो डो… Read More
  • खरंच तू कशी ?....... खरंच तू कशी ?................तू अशी तू तशी, खरंच तू कशी ? तू अशी लडिवाळतू प्रेमाचा वेल्हाळवाणी तुझी रसाळम्हणून का तू मला पाडलंस फ… Read More
  •                                          &nbs… Read More
  • मैत्री सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणारआपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणारयोगायोगानेच आपली ओळख झालीवाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली मैत्रीच्या झाडात… Read More

0 comments: