चारोळ्या
क्षण वेचावेत असे की
मन हरवून जावे
हरवलेल्या मनातून
क्षण साठवीत यावे
--**--
मी कमी बोलतो म्हणून
शब्द कागदावर उतरतात
बोलायला गेलो तर
वेडे ओठातूनच परततात
--**--
मनामध्ये असू द्यावा
एक आठवणींचा कप्पा
म्हणजे हव्या तेव्हा मारता येतात
दूर गेलेल्यांशी गप्पा
--**--
तू अस पाहिलास की
वाटलं पाऊस पडायला हवा
मी अंग चोरताना
तुझा धिटाइचा स्पर्श घडायला हवा
--**--
तू माझ्या जवळ येतेस
पण मनापर्यंत पोचत नाहीस
तिथे मुक्याने प्राजक्त बरसात राहतो
तो तू कधी वेचत नाहीस
--**--
खपली देखील एकेकाळी
जाख्मेचाच भाग होती
फरक एवढाच की तेव्हा
तिथे वेदनेला जाग होती
----**--------
दुरून गावे फारच
सुंदर आणि सुबक दिसतात
गल्ली बोळातून फिरताना कळते
की ती किती विस्कटलेली असतात
-----********-------------
आपण त्याला महत्व द्यावे
ज्याला आपण आवडतो
नाहीतर आपण आपल्या आवडीसाठी
संपूर्ण आयुष्य दवडतो
-----********-------------
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशेब करून तर बघा
किती जगलो या एवजी कसे जगलो
हा एक प्रश्न मनाला विचारून तर बघा
0 comments:
Post a Comment