माझी पहाट....
.
- गणेश के.
पहाटेच्या वाऱ्यात असतो तेंव्हा गारठा...
मात्र मी चालत राहतो....
अंधुकश्या प्रकाशात तुझ्याशी
बोलत राहतो.....
बोलता बोलता असे किती नाले , नदी -डोंगर
सरत जातात....
मग परत फिरताना
तुझ्या त्या आठवणी फक्त उरत जातात....
आता आंब्याला मोहर आलाय
अन कोकिळा हि गातेय..
पण तू आता नाहीस सोबत
हीच एक कमी राहतेय...
मग त्या विहिरीच्या काठावर बसतो
समोर झाडाखाली केवड्याचा सडा पहात राहतो,
सुगंधाच्या नशेत मग
तुझ्या विरहाचा साप असा डसत राहतो....
मलाही मग राहवत नाही
त्या फुलांचा मी गजरा करतो...
मग रम्य अश्या आठवणी काढत
रोजच्या सारखा गजरा तुझ्या कबरेवर सारतो...
असंच माग फिरतो
तुझी आठवणी नि डोळ्यात अश्रू घेऊन,
तुझ्या शपथेन बांधलेल्या
जीवनाची आणखी एक पहाट घेऊन........
0 comments:
Post a Comment