Saturday, October 23, 2010

मराठी हास्यकट्टा 31

काही सुविचार ..


१. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
२. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
... ३. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
४. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
५. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो....

*******************
सेल्समन गणप्या : ओ सायब, घ्या की हो कायतरी इकत तुमच्यासाठी...

बंडोपंत : छे छे .. मला काही नकोय.

सेल्समन गणप्या : अवो मग ही झुरळांची पावडर तरी घ्या की.. एकदम झ्यॅक हाये.
...
बंडोपंत : ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम.
अहो, आज पावडर दिली तर उद्या डिओड्रंट मागतील.

*******************
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
' काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?'
अत्रे म्हणाले. 'अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
*******************
वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पावआणि अंडी घेऊन यायचो...
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!
*******************
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लासठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.
*******************
‘तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीय!’ तो म्हणाला.
‘पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते.’ ती ठसक्यात म्हणाली.
‘बरोबर आहे. सापळा कधी उंदराचा पाठलाग करतो का?’ त्यानं विचारलं.
*******************
दोन स्त्रियांशी विवाह का केला या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली २ मत.

पाहिलं मत : मक्तेदारी मोडली जाते.
...
दुसरं मत : स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते.
*******************
साहेब : अच्छा तर तुमचं नाव बंडू बोंबटे तर…
बंडू : होय साहेब.साहेब : तर तुम्ही म्हणताय तुम्ही फारच कार्यतत्पर आहात, म्हणून मी तुम्हाला नोकरी द्यावी.
बंडू : अगदी साहेब…
साहेब : बरं मिस्टर बोंबटे. मग मला सांगा. तुम्हाला एमएस ऑफीस माहितीये?
बंडू : पत्ता द्या सर. आत्ता जाऊन पोचतो तिथे.
*******************
शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?

बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.
*******************
एका खानावळीवर पाटी होती, खानावळ " घरची आठवण "
एक दिवशी मेंबर ओरडला, " मालक, भात कच्चा व पोळी करपलेली आहे. "
मालक म्हणाला उगीच नाही नाव, 'घरची आठवण' ठेवले.
*******************
शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.
*******************
बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.
*******************
विडंबन



खालील विडंबन म्हणजे, "मी माझा" प्रमाणे एका नव-याचे संक्षिप्त मनोगत "मी हिचा".
... आशा आहे तुम्ही सर्व छान आस्वाद घ्याल.


बायकोने लाटणे फ़ेकले
तरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाही
कि नव-याला ईजा होत नाही.



अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली,
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा नाही सोडलेली.



तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही,
कारण तुझ्या शरिराचा व्यास त्या
इवल्याशा मशिनवर मावत नाही.


जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या
सिमा पार होत होत्या.
*******************
परीक्षेच्या RESULT नंतर:

जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
... आई: सगळी देवाची कृपा
बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू
आणि...
जर नापास झाला तर….

शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . .. पण .
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू

खरंच....
सगळे बदलतात पण मित्र नाही..
*******************
अतीभयानक पीजे ........

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??...........
.
.
.
मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....
*******************

0 comments: