Thursday, October 6, 2011

दसरा

दसरा



’दश-हरा’ म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला ’विजयादशमी’ असेही म्हणतात.संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात हा सण विविध प्रकारे साजरा होतो. केवळ भारतातच नव्हे तर भारताबरोबरच हा सण जावा, सुमात्रा व जपानमधेही साजरा केला जातो. नेपाळचा तर हा राष्ट्रीय सण आहे.

या दिवशीचे आणखी एक विशेष असे की याच दिवशी द...ुर्गामातेने महिषासुराचा वध केला.सलग नउ दिवस चाललेले हे युद्ध दहाव्या दिवशी संपले….तोच हा दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणुन द्यायचे आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करायची. मनातले राग, दु:ख सगळ काही दहन होणाऱ्या रावणाच्या पुतळ्याबरोबर तिथेच सोडायचे आणि एक नवी प्रसन्न सुरुवात करायची. अज्ञातवास संपवून निघालेल्या पांडवांनी याच दिवशी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली हत्यार बाहेर काढून त्यांची पुजा केली होती. ह्यादिवशी सिमोल्लंघन केले जाते…….पुर्वी राजे याच दिवशी नवे प्रदेश काबिज करण्यासाठी निघत असत.

सौजन्य: Talyatil Ganpati (सारसबाग पुणे)

0 comments: