कर्जाचा बोजा काय कमी होईना
ह्यातही घोटाळ्यावर खापर
नेत्यांचा नुसता दिखावा सुरु
शब्द फार आणि कामाची नुसती बोंब त्यांची फक्त
दुष्काळात होरपळून शेतकऱ्यांचे जीव गेले किती
नेत्याचं नुसतं जखमेवर मीठ चोळणं उरलं
आश्वासनांचा नुसता पाऊस
येथे खेळ खंडोबा चाले
पाणी मात्र उद्योग धंद्यान साठी मिळे
चारा छावणी नाव फक्त
जिथे आसरा घेतात गुरं आणि माणसं
तरीही त्यातही घोटाळे तोंड वर करून बोले
दुष्काळाच्या झळा संपता संपेना
~ विद्या पालकर
0 comments:
Post a Comment