Tuesday, September 14, 2010

MARATHI JOKES

एका छायाचित्रकाराला रस्त्यावर खूप गर्दी जमलेली दिसली.
त्या ठिकाणी अपघात झाला होता.
छायाचित्रकाराला अपघाताचे छायाचित्र घ्याचचे होते,पण त्याला गर्दीतून आत शिरता येईना.
मग त्याने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरवात केली,
''मला आत जावू द्या! ज्यांचा अपघात झाला आहे, त्यांचा मी नातेवाईक आहे !"
लोकांनी त्याला आत जाऊ दिले. त्याने पाहिले तर, एका गाढवाला अपघात झाला होता.

---**----

गंपूने आपली जुनी सायकल दुरुस्तीला नेली.
सायकलवाला : ही सायकल अगदी खराब अवस्थेत आहे. ती दुरुस्त करणं अशक्य आहे.
गंपू : पण, नेपोलियन म्हणतो की, जगात काहीच अशक्य नाही...
सायकलवाला : मग त्याच्याकडेच घेऊन जा दुरुस्तीला!
--**----
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.

आपटे : काय, बापट आज अगदी खुशीत आहेस.

बापट : अरे म्हणजे काय, असणारच. त्या गोगटेला लॉटरीचं तिकीट लागलंय.
आपटे : काय सांगतोस? मग त्यात तू इतकं खुश होण्यासारखं काय आहे?

बापट : अरे त्याला ते लॉटरीचं तिकीटच सापडत नाहीये.

----
घोर कलियुग -
मुलगा - बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो.
बाबा - मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या. . .
मुलगा - नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!
--------

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक .
बायको : Aiyyaaaaaa... सासूबाई !!!!!

--**------
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा - माहितीये रे....... ... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!

------**-----------
एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी

पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?

तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..

अधिकारी : का बरं ?

...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

------**-----

ती : अहो, परवा 'राशीरंजन'मध्ये शरद उपाध्यांनी सांगितलं म्हणे
की स्वर्गात पतीपत्नींना एकत्र प्रवेश देत नाहीत म्हणून!
तो : उगाच का त्याला स्वर्ग म्हणतात?!!!
---**--


चिंगू शाळेत दररोज उशीरा यायचा. एक दिवस वर्गातल्या बाई त्याच्यावर भयंकर चिडल्या.
बाई : चिंगू.. तू दररोज वर्गात उशीरा येतोस. त्यामुळे मला वर्गही उशीरा सुरु करावा लागतो.
चिंगू : बाई एक विनंती करायची होती.
बाई : काय?चिंगू : प्लीज, तुम्ही तुमच्या वेळेत वर्ग सुरू करा. उगाच माझी वाट बघू नका.

---------------------------
गुणगुणे सर : काय रे, वाजले किती? आणि तू वर्गात उगवलायस किती वाजता?लेक्चर सुरू होऊन पंचवीस मिनिटं होऊन गेली. हे चालणार नाही.बंड्या : पण सर...गुणगुणे सर : (रागाने) पण काय... स्वत:ला बादशहा समजोस की काय तू?बंड्या : तसं नाही सर. मी वेळेवर निघालो होतो. पण बाईकच स्टार्ट होईना.गुणगुणे सर : अरे मूर्खा...मग सरळ बसने यायचं ना.बंड्या : हो सर...मी बसनेच येणार होतो. पण तुमची लाडकी लेक ऐकेचना.

------------


बंद असलेल्या घरात !"घरात चोरण्यासारखे काही नाहीये,त्यामुळे चोरट्यांनी आपला वेळ वाया घालवु नये.बंद घरात भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे,चावले तर जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील.

-----------------

बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?

राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.
----------------



टिचर : पिंट्या, सांग पाहू, तुझा जन्म कुठे झाला?

पिंट्या : थिरुअनंतपुरम, टिचर
टिचर : शाब्बास मग आता थिरुअनंतपुरमचं स्पेलिंग सांग पाहू
पिंट्या : अं...अं...!! मला वाटतं टिचर, माझा जन्म बहुधा गोव्याला झाला असावा.

--------------
पीजे रिर्टन्स

गंपू: बाबा, तुमचं लग्न झालंय का?

बाबा: हो.
गंपू: कोणाशी?
बाबा: अरे वेड्या, कोणाशी म्हणजे काय? तुझ्या आईशी!

गंपू: बरं आहे तुमचं, तुम्ही घरातच सेटिंग लावलीत!!

-------------


पत्नी : काल रात्री झोपेत तू मला खूप शिव्या देत होतास.
पती : तुझा काही तरी गैरसमज होतोय..

पत्नी : कसला गैरसमज? मी माझ्या कानांनी ऐकलंय..
पती : पण मी झोपेत नव्हतोच!
-------------

९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले,

स्वर्गलोकीचा थाटमाट आणि अप्सरा बघून खुश झाले.

मग थोडे हळहळले,
'अर्रर्र... त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर ३० वर्षे आधीच इथे आलो असतो...'
---------------------


गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु...."70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------------

मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!

-------------

एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------

अतीभयानक पीजे रिर्टन्स

पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?...............
मिथुन 'चक्रवरती'आणिपाल 'भिंतीवरती'
---------------
झंप्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ....
शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?
चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला उशीर झाला ..
शिक्षक: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??
झंप्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो .

-------------
३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो. पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते.. ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते.. पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का?? ? ? कारण, ती म्हणते, "ई...,केक ला मुंग्या लागल्यात ...!!"

---------
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील??? "माऊ माऊ"!!

------------
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ????? . .
अरे टॉम अँड जेरी सुरु होते ..
------------
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो.
दुसर्‍या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो.
खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!

------


दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!


----------
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?

------------
पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय? ..... ...... ...... .....

मिथुन 'चक्रवरती'

आणि

पाल 'भिंतीवरती'

-----------

अतीभयानक पीजे रिर्टन्स

एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
. .. कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!


------------
नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे.

-------
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,''ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सरम्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''

---------

ट्रिंग ट्रिंग हॅलो हॅलो, प्रकाश आहे का? नाही. मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.




चारोळ्या



क्षण वेचावेत असे की
मन हरवून जावे
हरवलेल्या मनातून
क्षण साठवीत यावे
--**--
मी कमी बोलतो म्हणून
शब्द कागदावर उतरतात
बोलायला गेलो तर
वेडे ओठातूनच परततात
--**--
मनामध्ये असू द्यावा
एक आठवणींचा कप्पा
म्हणजे हव्या तेव्हा मारता येतात
दूर गेलेल्यांशी गप्पा
--**--
तू अस पाहिलास की
वाटलं पाऊस पडायला हवा
मी अंग चोरताना
तुझा धिटाइचा स्पर्श घडायला हवा
--**--
तू माझ्या जवळ येतेस
पण मनापर्यंत पोचत नाहीस
तिथे मुक्याने प्राजक्त बरसात राहतो
तो तू कधी वेचत नाहीस


--**--


खपली देखील एकेकाळी
जाख्मेचाच भाग होती
फरक एवढाच की तेव्हा
तिथे वेदनेला जाग होती



----**--------

दुरून गावे फारच
सुंदर आणि सुबक दिसतात
गल्ली बोळातून फिरताना कळते
की ती किती विस्कटलेली असतात
-----********-------------
आपण त्याला महत्व द्यावे
ज्याला आपण आवडतो
नाहीतर आपण आपल्या आवडीसाठी
संपूर्ण आयुष्य दवडतो
-----********-------------
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशेब करून तर बघा
किती जगलो या एवजी कसे जगलो
हा एक प्रश्न मनाला विचारून तर बघा

Saturday, September 11, 2010

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी 


आपल्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.


पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.

या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या महाराष्ट्नत फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली

Friday, September 10, 2010

विठोबा

विठोबा


विठोबा म्हटले की दोन्ही होत कमरेवर ठेवून वीटेवर उभे असलेले सावळे ध्यान
डोळ्यापुढे येते. पण या संकल्पनेला छेद देणारी चार हातांची आणि मिशी असलेली
विठ्ठलमूर्ती अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीभान येथे आहे. संशोधकांच्या अभ्यासाचा
विषय ठरलेली ही अनोखी विठ्ठलमूर्ती अशा प्रकारची एकमेव मूर्ती असल्याचे
सांगितले जाते.
.....................

ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाश्यापासून अवघ्या १२ मैलावर
एक छोटेखानी गाव आहे, टाकळीभान नावाचे. या गावात एक साधेसुधे विठ्ठलमंदिर आहे.
पण यातील मूर्ती थेट यादवकाळाशी नाते सांगणारी. विठ्ठल या देवतेच्या उगमाचा शोध
घेणारी... जगभरातल्या इतर मूर्तीपेक्षा संपूर्णतः वेगळी.
या मूर्तीमध्ये विठ्ठलाची ओळख असणारे दोन हात कमरेवर आहेतच. पण तिला आणखी दोन
हात असून त्यातील एका हातात शंख तर दुस-या हातात चक्र आहे. एवढेच नाही तर या
विठ्ठलाला मिशाही आहेत. विठ्ठलाचे विष्णूरुपात घडणारे हे दर्शन अन्यत्र कुठेच
का होत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
यादवकाळात भानू नावाच्या राजाची टाकळीभान ही राजधानी होती. मुळातच
गवळी-धनगरांचा लोकदेव असणारा हा विठ्ठल या यादवकुलीन राजाचे कुलदैवत. या भानू
राजाला विठ्ठलाने विष्णूरुपात दर्शन दिले अशी लोककथा मंदिराचे पुजारी राजेंद्र
भागवत सांगतात. मंदिरातील पुजेची जबाबदारी असणारी त्यांची ही सातवी पिढी आहे.
पण मंदिर त्याच्याही आधीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अहमदनगरच्या वस्तुसंग्रहालयाचे संचालक असणा-या सुरेश जोशी यांनी या विठ्ठलावर
संशोधन केले. ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनीही आपल्या पुस्तकात या
विठ्ठलमूर्तीचा उल्लेख केलाय. ते म्हणतात, की गवळी-धनगरांचा लोकदेव असणा-या
विठ्ठलाला यादवकुळातील राजांनी विष्णु-कृष्णरूप प्राप्त करून दिले. त्यामुळे
विठ्ठलस्वरुपाच्या घडणीच्या विचारात टाकळीभानच्या चतुर्भुज मूर्तीचा अभ्यास
महत्त्वपूर्ण ठरतो.

विठ्ठलाच्या गळ्यात वैजयंती माळ असून जानवेही कोरलेले आहे. कमरेवर मेखला असून
तिने दुटांगी धोतर नेसले आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर शाळुंकेसह शिवलिंग आहे.
त्यामुळे शिव-विष्णूच्या समन्वयाच्या प्रक्रियेत ही मूर्ती घडली असल्याचे
स्पष्ट होते. पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे इथे मकरकुंडले नाहीत. तसेच पंढरपूरात
जशी रुख्मिणी रुसून लांब राहिली आहे, तशी इथे नाही. इथे ती विठ्ठलाच्या बाजुलाच
उभी आहे. या सा-या वैशिष्ट्यांमुळे विठ्ठलाच्या आद्यमूर्तींमध्ये या मूर्तीचा
संदर्भ टाळता येत नाही.


सर्वात मुख्य म्हणजे ज्या संतांच्या रचनांनी आपण विठ्ठलाची उपासना करतो त्यातील
अनेक संतांनी विठ्ठलाच्या या चतुर्भुज रुपाचे वर्णन केले आहे. त्यामुळे हे
चतुर्भूज रूप संताना माहित होते असे म्हणण्यास जागा आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
संत भेटी अजि मज ।
तेणे जाला चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थळी सहज ।
दोन्ही सुक्ष्मी वाढल्या ।।
संत नामदेव म्हणतात,
चतुर्भुज विठ्ठल । कै देखोन डोळा ।।
भक्तांचा जिव्हाळा । जीव माझा ।।
संत बंका महाराज म्हणतात ,
कर कटावरी । पाऊले साजरी ।।
शंख चक्र करी । मिरवले ।।
संत तुकाराम म्हणतात,
शंख चक्रांकित भूषणे ।
जडीत मेखला चिद्ररत्नाने ।
पीतांबरी उटी शोभे गोरेपण ।
लोपले तेणे रवितेज ।।
संतांनी वर्णलेल्या या रुपाची विठ्ठलमूर्ती असेल की हे त्यांच्या भावविश्वातील
विठ्ठलाचे वर्णन आहे, हे ठामपणे सांगता येत नाही. पण तरीही हा चतुर्भूज विठ्ठल
काहीतरी वेगळे सांगत टाकळीभानमध्ये वर्षानुवर्षे उभा आहे एवढे मात्र निश्चित.
पंढरपूर्वकाळात महाराष्ट्र-कर्नाटकात विठ्ठलोपसना सुरू होती. परंतु अशा
प्रकारचे चतुर्भूज रूप कुठेही आढळत नाही. मध्य प्रदेशातील भेलसे येथे उदयगिरी
लेण्यात अशा प्रकारची एक मूर्ती सापडते. इ.स.४१०-१६ च्या आसपासची ही भेलसे
येथील मूर्ती विठ्ठलाशी कसे नाते सांगते हे अद्याप उलगडलेले नाही. पण
विठ्ठलाच्या उत्क्रांतीत पंढरपूरचे महात्म्य वाढत गेले आणि हे चतुर्भूज ध्यान
लोप पावले असे मत जोशी यांनी व्यक्त केले आहे.


विठ्ठल या दैवताचा उगम अद्यापही सापडलेला नाही. त्याच्या पंढरपूरनिवासाआधी तो
कसा उत्क्रांत झाला त्याचा शोध अद्यापही संपलेला नाही. त्यामुळेच विठ्ठलाचा
अभ्यास करणारे अनेक देशी-विदेशी संशोधक या मूर्तीचा अभ्यास करताहेत. कदाचित या
अभ्यासातून विठ्ठलाच्या या रुपाचे कोडे उलगडू शकेल.
नाम्याची खीर चाखणारा, चोखोबाची गुरे राखणारा, जनाईचे दळणकांडण करणारा आणि
कोट्यवधी वारक-यांचे श्रद्धास्थान असलेला विठोबा सर्वत्र दोन हातांच्या मानवी
रुपात दर्शन देतो. पण इथेच असा त्याच्या परमेशरुपात का बरं उभा आहे ? याचे
संशोधन फक्त विठ्ठलाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासावार प्रकाश टाकेल.
कारण शेवटी दगडातला देव त्याला घडवणा-या माणसाची गोष्ट सांगतो, हे विसरता येत
नाही.

Thursday, September 9, 2010


सिद्धिविनायक, प्रभादेवी


महागणपती, टिटवाळा

 
पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्यभाविकांचं श्रद्धास्थान आहेइथे आल्यावर लग्न जुळतं अशी एकसार्वत्रिक श्रद्धा आहे.


उद्यान गणेश, शिवाजी पार्क


गिरगाव गणेश, फडकेवाडी

मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहावर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचंश्रद्धास्थान.

वजिऱ्याचा गणपती, बोरिवली


बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारी एका 
शिलेत हास्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिकाभक्तांच्या गर्दीचंठिकाण.

वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व



मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवतगेली सत्तर वर्षअंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय.

फडके रोड मंदिर, डोंबिवली

                                    
पूर्व उपनगरांतलं हे सर्वाधिक प्रसिद्ध मंदिरतुलनेने 
खूपच नवं असलंतरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते.

 फडके रोड मंदिर, डोंबिवली


डोंबिवलीचं हे ग्रामदैवतयाच्या साक्षीने मराठी माणसाने डोंबिवलीतसाहित्य-संस्कृतीची ध्वजा फडकवलीनववर्षाच्या प्रसिद्धस्वागतयात्रेची सुरुवात इथूनच.


Sunday, September 5, 2010