Showing posts with label मराठी विनोद. Show all posts
Showing posts with label मराठी विनोद. Show all posts

Thursday, May 26, 2011

मराठी हास्यकट्टा-1

मराठी हास्यकट्टा


एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!

********************
चंगू : अभ्यासाच्या प्रवासात आपण फक्त चालत राहायचं असतं.. चालत राहायचं असतं..

मंगू : असं का रे?

चंगू : कारण ' वाट ' तर लागलेलीच असते...

********************
एक मुलगी चेहऱ्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवर उभी असते.
तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,
"ए, आती क्या खंडाला?"
... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"

********************
मराठी भाषा फारच अवघड आहे ................

गाड़ी बिघडली असेल तर म्हणतात गाड़ी " बंद " आहे .

आणि
...
पोरगी बिघडली असेल तर म्हणतात पोरगी " चालू " आहे .

********************
शिक्षक : अशी कल्पना करा की, तुम्ही कोट्यधीश आहात आणि तुमचे आत्मचरित्र लिहा.

शिक्षक : गंपू, तू का लिहित नाहीस?

गंपू : सेक्रेटरीची वाट बघतोय!!
********************
पिंट्या : ओ बाबा... ओ बाबा...ओ बाबा

बाबा : काय रे पिंट्या?

पिंट्या : एका गंभीर विषयावर बोलायचंय.

बाबा : शाळेत काही झालं का?

पिंट्या (गंभीरपणे): नाही, त्याचं काय आहे ना... तुमच्या बायकोशी यापुढे एडजस्ट करणं जरा कठीण आहे आता...
त्यामुळे मला माझी स्वत:ची बायको आणून द्याल तर बरं होईल म्हणतो...
********************
संता : वहिनींचं नाव काय रे?
बंता : गुगल कौर

संता : का रे?

बंता : अरे कारण तिला एक प्रश्न विचारला की ती किमान दहा उत्तरं देते.

********************
गंपू : डॉक्टरसाहेब, तुमची नर्सच्या हाताला गुण आहे.

तिचा हात लागताच मी खडखडीत बरा झालो.

डॉक्टर : माहिती आहे मला... थप्पडीचा आवाज बाहेर ऐकू आला...

Thursday, November 4, 2010

मराठी विनोद

मराठी विनोद
पु . लं. देशपांडे यांचे विनोदी किस्से


१)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".


२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .


३)
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"


४)
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद


" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."


५)
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.


त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.


त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर
पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न
लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर
येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.


६)
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी
सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".


ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही
ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"


७)
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध
क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात
लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."


८)
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी
सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं
मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना!
आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही
माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं
असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती
'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"


९)
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते.
प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना,
त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी
कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ
करीत होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे
सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"


१०)
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील
ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले,
'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात.
कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर
हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर
इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि
त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो
विसरला नव्हता.


११)
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे
'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय __हिस, तुझ्या
पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु
फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच__!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली.
तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली
स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं
दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"


१२)
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे
शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर
पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं
मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा.
कयाssssळs!'


१३)
हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा
होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले,
'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं
लिहालया हरकत नाही.'


१४)
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना
आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज
झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं
काय?' पु.ल. उत्तरले.


१५)
कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक
मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती,
काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने
आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर
काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले,
'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं
लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.


१६)
'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे
त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.


१७)
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे
एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन
घेतलय!!


१८)
एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी
'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"


१९)
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या
बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे.
एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"


२०)
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता
देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची
सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन
देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"


२१)
पु.लं. चा वाढदिवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.


हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?


पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"


घरात हशा पिकला होता !


२२)
एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की


माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.


माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.


तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील,
ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"


२३)
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात
बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज
पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"


२४)
एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी
त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर
बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.


ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही
इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."


पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"


२५)
डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त
पु.लनी पाठविलेले पत्र.


"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी,
जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या
सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."


२६)
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर
मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते
सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी
व्याख्या आहे"


२७)
आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा
आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू
’उपदेश-पांडे’ आहेस."


२८)
भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची
कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास
नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी
बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"


२९)
पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,
पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर
त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि
ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?


३०)
पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही
समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.


३१)
एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत
ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"


३२)
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला
पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून
म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"


३३)
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या
दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने
निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले...
'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा
पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले
आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच
'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट
केला.


३४)
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून
कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते
एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर,
मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम
ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या.
कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन
प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू
नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.


३५)
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन
आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'


३६)
सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना
जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना
इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला
इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'


३७)
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.


’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम
करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या
स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला
कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन
म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच
येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"


३८)
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे
वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं
रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर
स्वरुपच पालटलं.


गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि
प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली
प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत


३९)
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी
इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती.
परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली
असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि
मग मला सगळा उलगडा झाला !'
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ
फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं
नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी
घातलेला नाही !


४०)
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं
श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला
शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू
होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट
चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट
सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या
सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या
तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं.
पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं
नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं
नाही का ? अहो, हे आपले... '
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं
म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते
समजल.


४१)
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा
राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि
त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं
ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून
इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार
हशा पिकला.
४२)
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या
मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत
पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं.
' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं
उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.


४३)
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला
शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '




४४)
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न
पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? '
सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी
विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई
सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर
वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात




४५)
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून
गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे
लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना
खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '


चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो.
त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'




४६)


पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा
हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा
चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'


४७)
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी
ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही
दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम
वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.


४८)
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , ''
चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन
छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे
केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या
छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे
शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे
वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून
गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा
केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले
, कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा
पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले
होते तेव्हा !




४९)
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू
इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''


'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''


फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु .
लं . ना दाद द्यायच्या ...


बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ
नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे
यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर
साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत '
साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा
( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना
भेटण्याचा दिवस असायचा .


50)
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "

Tuesday, September 14, 2010

MARATHI JOKES

एका छायाचित्रकाराला रस्त्यावर खूप गर्दी जमलेली दिसली.
त्या ठिकाणी अपघात झाला होता.
छायाचित्रकाराला अपघाताचे छायाचित्र घ्याचचे होते,पण त्याला गर्दीतून आत शिरता येईना.
मग त्याने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरवात केली,
''मला आत जावू द्या! ज्यांचा अपघात झाला आहे, त्यांचा मी नातेवाईक आहे !"
लोकांनी त्याला आत जाऊ दिले. त्याने पाहिले तर, एका गाढवाला अपघात झाला होता.

---**----

गंपूने आपली जुनी सायकल दुरुस्तीला नेली.
सायकलवाला : ही सायकल अगदी खराब अवस्थेत आहे. ती दुरुस्त करणं अशक्य आहे.
गंपू : पण, नेपोलियन म्हणतो की, जगात काहीच अशक्य नाही...
सायकलवाला : मग त्याच्याकडेच घेऊन जा दुरुस्तीला!
--**----
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.

आपटे : काय, बापट आज अगदी खुशीत आहेस.

बापट : अरे म्हणजे काय, असणारच. त्या गोगटेला लॉटरीचं तिकीट लागलंय.
आपटे : काय सांगतोस? मग त्यात तू इतकं खुश होण्यासारखं काय आहे?

बापट : अरे त्याला ते लॉटरीचं तिकीटच सापडत नाहीये.

----
घोर कलियुग -
मुलगा - बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो.
बाबा - मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या. . .
मुलगा - नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!
--------

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक .
बायको : Aiyyaaaaaa... सासूबाई !!!!!

--**------
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा - माहितीये रे....... ... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!

------**-----------
एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी

पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?

तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..

अधिकारी : का बरं ?

...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

------**-----

ती : अहो, परवा 'राशीरंजन'मध्ये शरद उपाध्यांनी सांगितलं म्हणे
की स्वर्गात पतीपत्नींना एकत्र प्रवेश देत नाहीत म्हणून!
तो : उगाच का त्याला स्वर्ग म्हणतात?!!!
---**--


चिंगू शाळेत दररोज उशीरा यायचा. एक दिवस वर्गातल्या बाई त्याच्यावर भयंकर चिडल्या.
बाई : चिंगू.. तू दररोज वर्गात उशीरा येतोस. त्यामुळे मला वर्गही उशीरा सुरु करावा लागतो.
चिंगू : बाई एक विनंती करायची होती.
बाई : काय?चिंगू : प्लीज, तुम्ही तुमच्या वेळेत वर्ग सुरू करा. उगाच माझी वाट बघू नका.

---------------------------
गुणगुणे सर : काय रे, वाजले किती? आणि तू वर्गात उगवलायस किती वाजता?लेक्चर सुरू होऊन पंचवीस मिनिटं होऊन गेली. हे चालणार नाही.बंड्या : पण सर...गुणगुणे सर : (रागाने) पण काय... स्वत:ला बादशहा समजोस की काय तू?बंड्या : तसं नाही सर. मी वेळेवर निघालो होतो. पण बाईकच स्टार्ट होईना.गुणगुणे सर : अरे मूर्खा...मग सरळ बसने यायचं ना.बंड्या : हो सर...मी बसनेच येणार होतो. पण तुमची लाडकी लेक ऐकेचना.

------------


बंद असलेल्या घरात !"घरात चोरण्यासारखे काही नाहीये,त्यामुळे चोरट्यांनी आपला वेळ वाया घालवु नये.बंद घरात भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे,चावले तर जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील.

-----------------

बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?

राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.
----------------



टिचर : पिंट्या, सांग पाहू, तुझा जन्म कुठे झाला?

पिंट्या : थिरुअनंतपुरम, टिचर
टिचर : शाब्बास मग आता थिरुअनंतपुरमचं स्पेलिंग सांग पाहू
पिंट्या : अं...अं...!! मला वाटतं टिचर, माझा जन्म बहुधा गोव्याला झाला असावा.

--------------
पीजे रिर्टन्स

गंपू: बाबा, तुमचं लग्न झालंय का?

बाबा: हो.
गंपू: कोणाशी?
बाबा: अरे वेड्या, कोणाशी म्हणजे काय? तुझ्या आईशी!

गंपू: बरं आहे तुमचं, तुम्ही घरातच सेटिंग लावलीत!!

-------------


पत्नी : काल रात्री झोपेत तू मला खूप शिव्या देत होतास.
पती : तुझा काही तरी गैरसमज होतोय..

पत्नी : कसला गैरसमज? मी माझ्या कानांनी ऐकलंय..
पती : पण मी झोपेत नव्हतोच!
-------------

९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले,

स्वर्गलोकीचा थाटमाट आणि अप्सरा बघून खुश झाले.

मग थोडे हळहळले,
'अर्रर्र... त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर ३० वर्षे आधीच इथे आलो असतो...'
---------------------


गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु...."70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------------

मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!

-------------

एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------

अतीभयानक पीजे रिर्टन्स

पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?...............
मिथुन 'चक्रवरती'आणिपाल 'भिंतीवरती'
---------------
झंप्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ....
शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?
चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला उशीर झाला ..
शिक्षक: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??
झंप्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो .

-------------
३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो. पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते.. ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते.. पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का?? ? ? कारण, ती म्हणते, "ई...,केक ला मुंग्या लागल्यात ...!!"

---------
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील??? "माऊ माऊ"!!

------------
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ????? . .
अरे टॉम अँड जेरी सुरु होते ..
------------
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो.
दुसर्‍या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो.
खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!

------


दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!


----------
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?

------------
पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय? ..... ...... ...... .....

मिथुन 'चक्रवरती'

आणि

पाल 'भिंतीवरती'

-----------

अतीभयानक पीजे रिर्टन्स

एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
. .. कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!


------------
नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे.

-------
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,''ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सरम्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''

---------

ट्रिंग ट्रिंग हॅलो हॅलो, प्रकाश आहे का? नाही. मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.



Thursday, June 24, 2010



*खालील विनोद नक्की वाचा व कायम हसत रहा.*
अतीभयानक पीजे रिर्टन्स
------------------------
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------
एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
.
..
कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!
---------------------
पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
......
......
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------
मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------
दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
आली बाबा !!
------------------------
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्‍या दिवशी
पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
------------------------
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------
गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------
TECHNOLOGY IMPACT:
Baba aaplya mulala sangat asatat," Karatya tula kiti vela sangitale ahe ki
tuza janma zala hota, tula konatyahi website warun download kele navhate."
-----------------------
पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------
जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
--------------------------
३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का??
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात ...!!"

Friday, May 28, 2010

Wednesday, May 26, 2010

*चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.*

*बंटू : अरेरे बिच्चारी.*

*चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.*

*बंटू : तुला कसं रे कळलं.*

*चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी
चप्पल करकरीत नवीन आहे.*

******

*गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?*

*मंजू : झेब्रा.*

*गणपुले सर : असं का बरं?*

*मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना*

*चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.*

*बंटू : अरेरे बिच्चारी.*

*चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.*

*बंटू : तुला कसं रे कळलं.*

*चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी
चप्पल करकरीत नवीन आहे.*

******

*गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?*

*मंजू : झेब्रा.*

*गणपुले सर : असं का बरं?*

*मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना*

Tuesday, May 25, 2010





अतिभयानक पीजे
--------------
एक बाई दुसर्या बाईला विचारले
प.बा.:तुम्ही गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला


-----------------------------


जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
-------------------------------


प्रियकर प्रेयसीला प्रेमाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..
आणि मग..
मग काय..
.
प्रेयसी झाडू लागली
--------------------------------


हॉलीवुड चित्रपटाची मराठी नावे
DIE ANOTHER DAY=नंतर कधीतरी मर
SUPERMAN=लई भारी मानुस
SCORPION KING=तात्या विंचू
THE MUMMY =आई
THE MUMMY RETURNS=आई परत आली..
----------------------------------


बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत...
-------------------------------------


Kareena kapur ani tushar kapur eka building chya top,mhanje 13th floor var rahat astat. dusre sagle actors 1st te 12th floor var rahtat. sagle lift vapartat. pan tushar kapur ani kareena kapur nahi vaparat.... kaa???


karan.. 'Jeena sirf mere liye'
-------------------------------


बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!
------------------------------


नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?
नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
नवरा : मी तुला अफ्रीकेहून परत आणेन

Saturday, May 8, 2010