Sunday, January 23, 2011

मराठी कविता,चारोळ्या


मराठी कविता,चारोळ्या

*************************** 
***************************


***************************
***************************


***************************
******************************

Friday, January 21, 2011

शहाणपण देगा देवा

          शहाणपण देगा देवा



सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे चित्रपट म्हणजे भन्नाट मनोरंजन. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ आणि ‘लालबाग-परळ’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर महेश मांजरेकर ‘शहाणपण देगा देवा’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन येताहेत. ‘अश्‍वमी फिल्म्स’ आणि ‘मीराह एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास आलेल्या ‘ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट कंपनी’ची निर्मिती असलेला ‘शहाणपण देगा देवा’ हा पहिलाच चित्रपट आहे. आपल्या चित्रपटांतून मराठी अस्मिता जपणारे महेश मांजरेकर नेहमीच वेगळा विषय हाताळतात. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता दाटली आहे.
या चित्रपटात भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, किशोर कदम, संतोष जुवेकर, कमलाकर सातपुते, मनवा नाईक, क्रांती रेडकर आणि खुद्द महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ‘दे धक्का’, ‘मातीच्या चुली’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अतुल काळे व सुदेश मांजरेकर यांनी मिळून ‘शहाणपण देगा देवा’चे दिग्दर्शन केले आहे.
नावापासूनच वेगळेपण जपणार्‍या या चित्रपटात पाच वेड्यांची आणि त्यांना सुधारू पाहणार्‍या एका डॉक्टरची खळखळून हसायला लावणारी कथा यात रेखाटण्यात आली आहे. महेश मांजरेकर व अभिजीत देशपांडे यांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथेला खुसखुशीत संवादाची साथ संजय पवार व महेश मांजरेकर यांनी दिली आहे. प्रेक्षकांचे फुलटू मनोरंजन करणारा हा चित्रपट या वर्षअखेरीस दाखल होतोय.

Thursday, January 20, 2011

शिवकल्याण राजा




।।शिवकल्याण राजा।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

Wednesday, January 19, 2011

Sunday, January 16, 2011

कॉलेजमध्ये असताना.....

कॉलेजमध्ये असताना..

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास
-अनामिक

Saturday, January 15, 2011

मकरसंक्रांत SMS

मकरसंक्रांत


स्नेह आपुला तिळातिळाने वृद्धिंगत व्हावा,
स्वभावातला पाक साखरी त्यावरी चढवावा,
एकमेका द्यावा घ्यावा गोड काटेरी हलवा,
विश्वशांतीचा मेवा असला साक्ळणी खावा.

तिळगुळ घ्या
गोडगोड बोला
----------------
परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात
केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .
----------------

मराठी अस्मिता.. मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!

मकर संक्रांतीच्या गोड गोड हार्दिक शुभेच्छा...!!
----------------------------

मनात असते आपुलकी मणून स्वर होतो ओला ,
हलवा, तिळगुळ घ्या घ्या अन गोड गोड बोला !!!

नाते तुमचे आमचे हुळूवर जपायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक द्रूड
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेछा !!!

एक तील रुसला फुगला रडता रडता गुळाच्या पाकात पडला ,
खुदकन हसला ,हातावर येताच बोलू लागला ,
तील गुल घ्या नि गोड गोड बोला !!!!

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्याचा !!
शुभ मकरसंक्रांत

Saturday, January 8, 2011

बोक्या सातबंडे


मराठी चित्रपट:बोक्या सातबंडे


Producer: कांचन   सातपुते
Director: राज  पेंडुरकर
Story: दिलीप  प्रभावलकर


बोक्याबद्दल : 
बोक्या इतर मुलांसारखाच आहे.......खूप हुशार, खट्याळ, खोडकर..... पण तो नेहमी स्वतःच्या वेगळ्याच विश्वात असतो आणि त्याच्या आसपासच्या व्यक्तिंना मदत करण्याची त्याची इच्छा असते.


कलाकार :  ज्योति सुभाष ... आर्यन  नार्वेकर.चित्रा  नवाथे,दिलीप  प्रभावलकर
आर्यन  नार्वेकर.

चित्रा  नवाथे.

विजय  केंकरे.



माधवी जुवेकर 

ज्योति सुभाष ...दिलीप  प्रभावलकर ..
 

शुभांगी  गोखले  

Wednesday, January 5, 2011

स्वप्ने ही आपलीच असतात .....

स्वप्ने ही आपलीच असतात


स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात
फुलांसारखी
फुलवायची असतात
घरांसारखी
सजवायची असतात
कारण स्वप्ने
आपलीच तर असतात
रेशीम बंधाने त्यांना
बाधायची असतात
मनातल्या मंदीरात
पुजायची असतात
कधी कधी
अश्रुंच्या पुरात
वाहुन द्यायची असतात
आठवणींच्या जगात कोठेतरी
साकारायची असतात
पुर्ण झाली नाहित तरी
शेवटी स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात
-अनामिक

Monday, January 3, 2011

हापूस

हापूस
    25th June 2010






हापूस आंबा हा देवगडचा राजा जगातील प्रत्येक भागात त्याने आपले नाव केले आहे.
हीच कहाणी लक्ष्यात घेऊन नवीन चित्रपट हापूस आंबा चित्रित होतोय.
चित्रपट हा कोकण मधील शेतकऱ्यांची कहाणी सांगणार आहे.
सोन्या सारखा भाव असलेला हापूस शेतकर्याचे पोट का भरू शकत नाही.
हे सर्व तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.
चित्रीकरण हे कोकणातील सुंदर भागात झाले आहे.
अभिनेता मकरंद अनासपुरे याचा अभिनय बघण्य सारखा आहे.

Sunday, January 2, 2011

चारोळ्या

चारोळ्या


तो तुझ्या गावातला पाऊस
माझ्या गावात फिरकलाच नाही
आयुष्यातला वैशाख असा
अजून कुठं संपलाच नाही.


अपेक्षाभंगाचं दु:ख तरी कुठलं
अपेक्षाच नव्हती तर?
माझ्या मनाचं काय घेवून बसलीस
तुझ्या मनातच नव्हतं तर?


नसतेस कधी मागे
तू ही मला छळण्यात
ओठ असतात मुके आणि
भलतेच असते डोळ्यात.

अशीच सारखी तु माझी
कायमच परीक्षा पहातोस
खर सांग तु माझ्यावर नक्की
कितपत विश्वास ठेवतोस

कोण कुणाची परिक्षा पहातंय
हे तर सगळं जग पहातंय
विश्वासाचं म्हणशील तर तो
पानिपतात गेल्याचं माहितंय.

तू म्हटलेस "जा"
मी वळलो फक्त
"परत ये" म्हणतेस कां
पाहिले होते फक्त.


ठरावामध्ये ठरतं का कधी
अश्रुंचं येणं-जाणं
आठवणी मनात दाटल्या कि
आपसुक डोळ्यांत साठतं

दोघे ही अबोल राहीलो म्हणुन
शब्दांना वाट फुटलीच नाही
तु बोलशील तु बोलशील असं म्हणत
नि:शब्दता कधी ओसरलीच नाही

शुन्याला एकदा भेट म्हणतोस
शुन्यातुन आधी बाहेर पडु तर दे
वजाबाकी करुन निरुत्तर झाले खरी
पण एकदा तरी उत्तर तपासुन बघु दे

तुझा दुसरा प्रश्न आला
उत्तराच्या आधीच
मी तर निरूत्तर असतोच
पहिल्याच्या आधीच

चारोळी लेखक : डॉ. अशोक आणि निशिगंधा