Showing posts with label मराठी चित्रपट. Show all posts
Showing posts with label मराठी चित्रपट. Show all posts

Saturday, January 9, 2016

पाय कुठे चालले


पाय कुठे चालले 
वाट काय बोलते 
एक दिशा बोलवते 
अन मागे ही ओढते ।

माया की छाया ही
जोजवते सावली 
पंखांना बळ देऊनिया 
हाक देते माऊली।

पंथ दिला ओढ दिली 
वाट तूच दाखवली
मायेतून गुंतवले 
तूच पुन्हा साद दिली।

जन्माच्या चक्राची
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया 
हाक देते माऊली।

नाव तुझे सुर तुझा
कंठातुन दाटला
भक्तिचा सोहळा मी 
डोईवर थाटला।

माऊली।
लेकराच्या डोळी
भोळ्या विठ्ठलाची बाहुली
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया 
हाक देते माऊली। 
~ गजर चित्रपट
‪#‎वारी‬



Monday, May 28, 2012

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली

सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
किंकिण कांकण
रुणझून पैजण
सजली नटली नवरी आली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

नवऱ्यामुलाची आली
हळद हि ओली
हळद हि ओली लावा
नवरीच्या गाली
हळदीन नवरीच
अंग सारं माखवा
पिवळी करून तिला
सासरी पाठवा

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सासरी मिळूदे तुला
माहेरची माया
माहेरच्या मायेसंग
सुखाची गा छाया
भरुनिया आले डोळे
जड जीव झाला
जड जीव झाला लेक
जाय सासराला
आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी
ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली......
-गुरु ठाकुर 

Friday, January 21, 2011

शहाणपण देगा देवा

          शहाणपण देगा देवा



सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे चित्रपट म्हणजे भन्नाट मनोरंजन. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ आणि ‘लालबाग-परळ’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर महेश मांजरेकर ‘शहाणपण देगा देवा’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन येताहेत. ‘अश्‍वमी फिल्म्स’ आणि ‘मीराह एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास आलेल्या ‘ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट कंपनी’ची निर्मिती असलेला ‘शहाणपण देगा देवा’ हा पहिलाच चित्रपट आहे. आपल्या चित्रपटांतून मराठी अस्मिता जपणारे महेश मांजरेकर नेहमीच वेगळा विषय हाताळतात. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता दाटली आहे.
या चित्रपटात भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, किशोर कदम, संतोष जुवेकर, कमलाकर सातपुते, मनवा नाईक, क्रांती रेडकर आणि खुद्द महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ‘दे धक्का’, ‘मातीच्या चुली’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अतुल काळे व सुदेश मांजरेकर यांनी मिळून ‘शहाणपण देगा देवा’चे दिग्दर्शन केले आहे.
नावापासूनच वेगळेपण जपणार्‍या या चित्रपटात पाच वेड्यांची आणि त्यांना सुधारू पाहणार्‍या एका डॉक्टरची खळखळून हसायला लावणारी कथा यात रेखाटण्यात आली आहे. महेश मांजरेकर व अभिजीत देशपांडे यांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथेला खुसखुशीत संवादाची साथ संजय पवार व महेश मांजरेकर यांनी दिली आहे. प्रेक्षकांचे फुलटू मनोरंजन करणारा हा चित्रपट या वर्षअखेरीस दाखल होतोय.

Saturday, January 8, 2011

बोक्या सातबंडे


मराठी चित्रपट:बोक्या सातबंडे


Producer: कांचन   सातपुते
Director: राज  पेंडुरकर
Story: दिलीप  प्रभावलकर


बोक्याबद्दल : 
बोक्या इतर मुलांसारखाच आहे.......खूप हुशार, खट्याळ, खोडकर..... पण तो नेहमी स्वतःच्या वेगळ्याच विश्वात असतो आणि त्याच्या आसपासच्या व्यक्तिंना मदत करण्याची त्याची इच्छा असते.


कलाकार :  ज्योति सुभाष ... आर्यन  नार्वेकर.चित्रा  नवाथे,दिलीप  प्रभावलकर
आर्यन  नार्वेकर.

चित्रा  नवाथे.

विजय  केंकरे.



माधवी जुवेकर 

ज्योति सुभाष ...दिलीप  प्रभावलकर ..
 

शुभांगी  गोखले  

Monday, January 3, 2011

हापूस

हापूस
    25th June 2010






हापूस आंबा हा देवगडचा राजा जगातील प्रत्येक भागात त्याने आपले नाव केले आहे.
हीच कहाणी लक्ष्यात घेऊन नवीन चित्रपट हापूस आंबा चित्रित होतोय.
चित्रपट हा कोकण मधील शेतकऱ्यांची कहाणी सांगणार आहे.
सोन्या सारखा भाव असलेला हापूस शेतकर्याचे पोट का भरू शकत नाही.
हे सर्व तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.
चित्रीकरण हे कोकणातील सुंदर भागात झाले आहे.
अभिनेता मकरंद अनासपुरे याचा अभिनय बघण्य सारखा आहे.