Saturday, June 25, 2011

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी

 अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी 

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

Saturday, June 18, 2011

खरंच तिला इच्छामरण हवं आहे...

खरंच तिला इच्छामरण हवं आहे



काल एका गर्भातल्या नव अर्भकाने
इच्छा मरणाची व्यक्त केली होती
इच्छा मरणाची बातमी तिने
आईच्या गर्भातचं ऐकली होती

अर्भकाने बाप्पाला विनंती केली की
तिला इच्छा मरण हवे आहे
जन्मल्यावर आपटून आपटून मरण्यापेक्ष्या
आईच्या गर्भातच शांतपणे डोळे मिटायचे आहे

ती रडक्या स्वरात म्हणाली की मला बाबांची भीती वाटते
बाबांनी आईला सांगितले होते " मला मुलगाच हवा आहे !!
मुलगी झाली तर आईला आणि मला सोडणार नाही
बाळ मुलगी असेल तर हे जगंच पाहून देणार नाही "

माझ्या बाबांनी आजीने आजोबांनी
आईला मुलगाच झाला पाहिजे म्हणून खडसावले आहे
मुलगी झाली तर माझ्या आईला मात्र असंच
टोचून टोचून असह्य जगायचं आहे

"" देवा ! त्यापेक्ष्या तु मला गर्भातच इच्छामरण दे !!
तु मला तथास्तु म्हणताच माझा श्वास बंद होणार
देव ही हसत म्हणाला " बाळा मीच तुला हे विश्व दाखवणार
तर मी कसा तुला मातेच्या गर्भात मरण देणार ? "

गर्भातलं बाळ मात्र देवापुढे हट्टाला पेटलं
इच्छामरण द्यावे म्हणून गळ घालू लागलं
देवालाही त्या बाळाचं कुतूहल वाटलं
मानवाच्या अमानुष कृत्याचं आश्चर्य वाटलं

देव ऐकत नाही म्हणून बाळाने
आईलाच विनंती करण्याचे ठरविले
हळूच आईच्या स्वप्नांत जाऊन आईचे चुंबन घेतले
"आई !ई " असा गोड आवाज देत आईच्या कुशीत विसावले

"आई माझा तुला त्रास नको म्हणून मला
गर्भातच विष देशील का ?
बाळाचं हे ऐकताच आईला रडूच कोसळले
बाळा तु मला हवी आहेस म्हणत तिला हृदयाशी कवटाळले "

" पण आई माझा जन्म झाल्यास मुलगी म्हणून बाबा मला मारतील
नाही तर तुला दोष देवून तुझं जगणं कठीण करतील
मला हे जग नाही पहायचं आहे
क्रूर माणसांची तोंडं पाहण्याआधी मला गर्भातच मरायचं आहे ""

"" आई !! मला तु गर्भातच संपव
मृत जन्मलेली मुलगी पाहता बाबा ही खुश होतील
आजी आजोबा ह्यानाही नातू हवाच आहे ना
मीच गेल्यावर सर्वांचे चेहरे आनंदी होतील "

" आई खरंच मला गर्भातच इच्छामरण हवं आहे गं
तु बाबांना सांग की मी स्वप्नात येवून गेली
तुम्हा कोणालाच त्रास नं देता मी हे
सुंदर जग गर्भातूनच अनभवून देवाघरी गेली ""

!!!! खरंच तिला इच्छामरण हवं आहे !!!

Sunday, June 12, 2011

सर बरसू लागे..वारा उधाणू लागे..

पाऊस
सर बरसू लागे..वारा उधाणू लागे..
वेड्या सरींच्या संगे..
ऋतू हा हिरवा..|

नभ भरून येई.. मेघ मल्हार गाई..
वीज ताल हो देई..
पाऊस कविता..|

अशा सुरेल दिनी..दाटे आनंद मनी..
अशी मोहक गाणी..
सरींनी गायली..|

अशी मैफिल जमे..मोर तालात नाचे..
सूर नभात भिणे..
मंजुळ मुरली..|

वर डोंगर माथी..झरे गीत हे गाती..
धबधबे ही ओती..
सुरेल तानांचे..|

पाट वाही झुळझुळ..त्याचे सूर देई भूल..
खळाळून उठे ताल..
सुरमयी तराणा..|

अशा सुरेख रचना..भारावून टाकी मना..
सूरगंधर्व घराणा..
नभातून जन्मतो..||

Saturday, June 11, 2011

मराठी लोकांची हिंदी

पहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुम?
पहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा!!

घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!
सरबत मे लिंबु पिळा क्या!!

इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!!
कंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!

अरे बाबा गाडी सावली मे लगा!!
 ए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!

केस एकदम बारीक कापो भैया!!
खाओ पोटभर खाओ लाजो मत!!

Sunday, June 5, 2011

मराठी हास्यकट्टा 22

पुरुषाबरोबर सुखी राहायचे असेल, तर त्याच्यावर थोडेसे प्रेम करा आणि त्याला खूप समजून घ्या.
स्त्रीबरोबर सुखी राहायचे असेल,........
तर तिच्यावर खूप प्रेम करा आणि
तिला समजून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका!.......
.
... .
.
भलेभले थकले महाराज!!!!!! ............ ....

कोणत्याही भांडणातला शेवटचा शब्द स्त्रीचा असतो... ...
.
.
त्यानंतर पुरुषाने काहीही उच्चारले,

.
तर ती नव्या भांडणाची सुरुवात असते!!!!!
*********************
बाई :- कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? विद्यार्थि :- आई ने सांगितले बस बघुन रस्ता ओलांड , पण अर्धा तास झाला बसच गेलि नाहि म्हणुन उशिर झाला.
*********************
नवरा : पैसे.. पैसे.. पैसे... कशाला हवे असतात गं तुला इतके पैसे? खरं तर तुला पैशापेक्षा
जास्त अकलेचीच गरज आहे. समजलं.

बायको : अहो ते कधीच समजलंय मला. पण जी गोष्ट तुमच्याकडे मुळीच नाही. ती कशी बरं
मागणार मी?
*********************
गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात. तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील. अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?

*********************

एकदा शाळेत शिक्षक मुलाला विचारतात. "सांग धनुष्यबाण कोणी मोडले?" त्यावर तो मुलगा बोलतो "खरचं सांगतो सर मी नाही मोडले". तेवढ्यात वर्गात हेडमास्तर येतात. शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला धनुष्यबाण कोणी मोडले ते माहीत नाही. त्यावर हेडमास्तर बोलतात, "जावू द्या हो, जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल".

*********************
सरांनी वर्गात मुलांना गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं. बाळ्या नुसताच बसून होता. सरांनी त्याला विचारलं : सर : काय रे, मी तुला गवत खाणाऱ्या गाईचं चित्र काढायला सांगितलं होतं ना? बाळ्या : हे काय काढलंय. सर : अरे पण हा कागद कोरा आहे ! बाळ्या : पण सर, गाईने गवत खाल्लंय, त्यामुळे गवत संपून गेलंय. सर : अच्छा, मग गाय कुठे आहे? बाळ्या : काय सर, गवत खाल्ल्यावर गाय इथे कशाला थांबेल. ती दुसरीकडचं गवत खायला निघून गेली आहे !!!
*********************
चिंटुन दंगा केला म्हणुन त्याला बाकांवर उभा केला होता. तरीहि त्याचा दंगा चालुच होता. चिंटु बडबड बंद कर अन गपचुप बस गुरुजी ओरड्ले. त्यान बडबड बंद केली व बाकांवर बसला. बाकावर का बसला? उभा रहा गुरुजी ओरड्ले पण सर तुम्हीच म्हणाला ना की गपचुप बस म्हणुन मी बसलो....
*********************
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
*********************
मुलगा : बाबा बाबा... लग्न करायला किती खर्च येतो हो?
बाबा : माहीत नाही बाळा. पण मी अजूनही तो भरतोय.
*********************
मृत पावलेल्या बीन लादेन ने अल्लाला परत फोन लावला,
" तू मला धोका दिलास, ६ वर्षापूर्वी तू मला फोनवर म्हणाला होतास तुला दीर्घायुष्य लाभेल...

अल्ल्ला : मूर्खा, माझ बोलण पूर्ण व्हायच्या आताच तु फोन कट केलास,
मी म्हणत होतो, तुला दीर्घायुष्य लाभेल पण भारतात लपलास तरच...
*********************
प्रियकर : प्रिये मी तुला माझ्या हृदयाच्या एका कप्प्यात बंद केले आहे...
प्रेयसी ( लाडात ) : अरे सोन्या...., बंद कशाला केलंयस.. मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
प्रियकर : नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून.

*********************
हौसाबाईना वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी घौडदौडीचा सल्ला दिला.
.
.
.
.
...महिनाभर रपेट केल्यावर त्यांनी वजन मोजलं तर चक्क २० किलोने कमी .......घोड्याचं..
*********************
बंड्या ची लाडावलेली गर्लफ्रेण्ड धावतपळत
येते आणि म्हणते, 'अरे, मी पर्स घरी विसरलेय आणि मला हजार रुपये हवेत... दे
ना पटकन!' त्यावर बंड्या उत्तरतो, 'हे घे पन्नास रुपये.. चटकन रिक्षा करून
घरी जा आणि पर्स घेऊन ये!
June 5 at 8:05pm

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे




श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे..
- बालकवी
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे;
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे!

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा!
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!

फडफडा करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;
सुंदरा हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती!

खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले, पत्री खुडती!

देवदर्शना निघती ललजा, हर्ष माझ्या ह्रदयात!
वदनी त्याच्या वाचुन घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

Friday, June 3, 2011

पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

Rain

प्रत्येक क्षणामध्ये काही तरी आपले असते,
दु:खात जरी रडलो, तरी सुखात हास्य असते ..!

विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो,
ग्रीष्मात जरी उकडलो तरी पहिल्या पावसांत गारवा असतो..

"आपल्या आयुष्यातही पावसाची सर"
नवीन चैतन्याचा गारवा, आपलेपणाचा ओलावा,
आणि सुखाची नवी हिरवळ पसरवो, हिच "श्री" चरणी प्रार्थना!!

पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!