ती- काहीही चालेल.
तो- पावभाजी आणि व्हेजपुलाव खाऊ या?
ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स येतात.
तो- मग नुस्तंच चहा-ब्रेडसँडविच?
ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?
ती- काहीही चालेल..!..
तो- मग आता आपण काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?
ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.
ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..
तो- मग कॉफी शॉप मध्ये तरी जाऊ या.
ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.
तो- मग तुच सांग, काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव..!!.
तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.
ती- काहीही. तुच ठरव.
तो- बसनं जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी. अन कस कसले वास येतात त्या बसमध्ये.
तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.
ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?
तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.
ती- किती दुष्ट तु? रिकाम्यापोटी मला चालायला लावतोस?
तो- ठीक. मग आधी जेवू या?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
ती- तुच ठरव..!
0 comments:
Post a Comment