राजू : आई गं, आमचे गुरुजी ज्ञानेश्ववर आहेत.
आई : असे का म्हणतोस राजु?
राजू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडुन कविता पाठ करुन घेतली.
***********************
डॉ. श्रीराम लागू एका उपहारगृहात गेले. तिथे एक तरुण सुंदरी त्यांना म्हणाली, “तुम्हाला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.”
डॉ. लागू खूष होऊन म्हणाले, “तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं आहे का?”
“हो”,
... “मग त्यावेळी तुम्ही मला पाहिलं असणार”, डॉ. लागू हसले.
“असेल बाई” ती म्हणाली, “ते नाटक पहायला तुम्ही कुठं बसला होता?”
डॉ. लागू कोसळले, ते बराच वेळ उठले नाहीत.
***********************
पुणेरी झणझणीत झटका……
पुण्यात एका हॉटेलमध्ये दोन उतारू उतरले.
हॉटेलची व्यवस्था पाहून पुणेरी खवचटपणा करण्याची त्यांना लहर आली.
... …
त्यांनी मॅनेजरला विचारले, ‘‘तुमच्या गोठ्याचे भाडे किती ?’’
‘‘एका बैलाला तीनशे रुपये, दोन बैलांचे पाचशे फक्त’’ मॅनेजर म्हणाला !
***********************
शिक्षक मुलांना जीवनातील उच्च मुल्ये काय ती समजावून सांगत होते.
शेवटी त्यांनी मुलांना प्रश्न केला, "समजा, रस्त्यात गाढवाला काही लोक विनाकारण मारीत आहेत आणि मी त्यांच्यापासून गाढवाला वाचवल. तर या कृत्याला तुम्ही काय म्हणाल ?"
त्यावर बंडू तात्काळ म्हणाला, "बंधुप्रेम !"
***********************
शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
.
.
“जमिनीवर!!”
***********************
पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?
मंग्या : अरे बहिणीशी रे …
पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
…
मंग्या : बहिण तुझी आहे….
**************
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..
*****************
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"
*****************
नवरा- जर मला लॉटरी लागली तर काय करशिल?
बायको- अर्धे पैसे घेइन अन या नरकातुन निघुन जाईल.
.
.
.
.
.
नवरा- मला दहा रूपयाचं बक्षिस लागलय, हे पाच रूपये घे अन निघ .
*****************
एक डॉक्टर एका लहान मुलाच्या घरी जातात.
त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात.
त्यावेळी त्याचं लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात, “ती बघ तिकडे चिमणी.”
लहान मुलगा : ओ चिमणीचे मामा, खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझा.
*****************
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता, हे समजल्यावर त्याची आई संतापलीच.
त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, ”तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?”
त्यानं उत्तर दिलं, ”पाहिलं.”
...
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, ”काय पाहिलंस?”
” आपले बाबा!!!!”
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास
होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू..
.
.
... ... ... .
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट
करावं लागंल.
0 comments:
Post a Comment