Monday, November 7, 2011

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे.. विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व

'' एकटा पुरतो ना ?''


... आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.

मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.

अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.

अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले ,

' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता

पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''

बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,

'' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''

'' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''

'' आणि कोंबडे किती ?''

'' फक्त एक हाये ''

'' एकटा पुरतो ना ?''

उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला

पत्रकारही त्या हंशात सामील झाले.

0 comments: