Friday, December 23, 2011

काही शब्दांच्या व्याख्या

काही शब्दांच्या व्याख्या



वक्तृत्व : दोन मिनिटात सांगता येणा-या कल्पनेकरिता दोन तास घालविणे.

शेजारी : तुमच्या गोष्टींची तुमच्यापेक्षा अधिक माहिती जशीच्या तशी सांगणारा नारदमुनी.

बेकार पदवीधर : हातात ब्याग घेऊन प्रवास करणारा एस.टी. चा राखीव प्रवासी.

पुढारी : जनतेच्या जीवावर स्वताःचे भले करून घेणारा डोमकावळा.

मुंबई : माणसांनी गजबजलेले मनोहर संग्रहालय.

विद्यार्थी : परीक्षादेवीचा लाडका पुत्र.

फ्याशन : शिंप्याच्या हातून चुकून झालेला बदल.

रोगी : अशी आग आहे, जिच्यावर डॉक्टर पोळी भाजतात.

वकील : गुन्हेगारांचा बाप......नरकात दाखल होण्याचे फर्स्ट-क्लासचे तिकीट.



ईश्वर : कोणालाही भेट न देणारा अभिमानी म्यानेजर.

नृत्य : पद्धतशीरपने लाथा झाडण्याची कला.



शिक्षक : निमुटपणे देशकार्य करणारा गरीब प्राणी.

जीवन : मरण येईपर्यंत काहीतरी भानगडी करत घालवायचा काळ.

मन : नेहमी चोरीस जाणारी वस्तू.

0 comments: