Tuesday, February 28, 2012

मराठी चारोळ्या



नात्यामध्ये गुंतायचा नसतं,,
नात्याला आपण गुंफायचा असतं..!!
होवून कोळी जाळ आपणच विणायचं असतं,,
कोळ्या सारखाच मात्र मुक्त फिरायचं असतं..!!

......................................

झरे आणि डोळे यांना वाहने फक्त माहित असते
फरक एवढाच कि ,
झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत
आणि डोळे ......
कुणाच्या तरी"आठवणीत"
.....................................

जीवनाच्या वाटेवर
कऴयाँचे बंध फुटून जातात.
वाहून जाते सहवासाचे पाणी.
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरुन राहतो
कारन भीजत राहतात त्या "आठवनी"...!

.............................................

जे जुडते ते नाते जी जडते ती सवय
जी लागते ती ओढ जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो सहवास
आणि ज्या निरंतर राहतात त्या "आठवनी"...!!

0 comments: