Sunday, April 22, 2012

आई ......ती गेली तेव्हा....


आई
(आईच्या स्मरणार्थ  मी  लिहिलेली  कविता )

ती  गेली  तेव्हा दुखा:चा पाऊस कोसळत होता !!
आयुष्याच्या कटू प्रवासाची तो चाहूल देत होता !!

आता फक्त आठवणींचा वारा दुमदुमत होता मनी !!
आणि  केविलवाण्या हृदयाला जाऊन भिडत होता !!
 ओसंडून वाहणारा डोळ्यातला पाऊस सुद्धा थांबत नव्हता !!

आयुष्यातला हिरव रान कोरडं झालं होतं !!
त्या मायेच्या अस्तित्वाला परकं झालं होतं !!

आता फक्त होता तो आठवणींचा झरा !!
हुंदके देऊन रडणाऱ्या डोळ्यांना
तिच्या प्रेमाचा ओलावा !!

----------विद्या  ---------
              8/4/2012
              8:02 pm

Saturday, April 21, 2012

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे


कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

-अनामिक

Wednesday, April 11, 2012

कोणी गेलं म्हणून, आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...


कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं......

आठवणींच्या वाटांवरून आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...
आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही,
रात्रतुझीच आहे.

त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...
तुझ्याच वेड्या श्वासांकडे थोडं जगणं मागायचं असत...
-अनामिक

Tuesday, April 10, 2012

थंड थंड हिवाळा संपला


थंड थंड हिवाळा संपला, गरम गरम उन्हाळा असा पेटला,
आटोपून परीक्षेचा भार, मग गावाला जायचा बेत आखला,

गावाला जायची मजाच वेगळी असायची,
ओसाड रस्ता आणि घनदाट झाडीच दिसायची,

काय काय करायचे तिकडे, हे ठरलेलेच असायचे,
कड़क उन्हात मित्रांच्या जोडीने नुसतेच भटकायचे,

वर्षभरात केलेली मस्ती मग त्याना सांगायची,
आणि नंतर नदीकाठी जाउन मजा लुटायची,

शहरातून आलोय म्हणून वेगळाच रुबाब असायचा,
प्रत्येक खेळामध्ये कसा दबदबा असायचा,

रात्री जेवणाची वेगळीच असायची मेजवानी,
आणि झोपताना सोबत आजीची गाणी,

सुंदर निसर्गाच्या सानिध्यात गार झोप लागायची,
आणि पहाटेची सुर्यकिरने चटकन डोळ्यावर यायची,

शहरात उशिरापर्यंत झोपनारे तिकडे लवकर उठायचो,
बाबा आणि आजोबांसोबत मग नदीवर आंघोळीला जायचो,

तो सुंदर उन्हाळा आता कुठेतरी हरवलाच आहे,
ह्या दगदगीच्या आयुष्यात जणू कोणीतरी पळवलाच आहे,

आता ऑफिसच्या कामात हे सारे विसरलोच आहे,
म्हणुनच का कुणास ठाउक हा उन्हाळा जास्तच गरम भासतो आहे...
-अनामिक

Sunday, April 8, 2012

आई


ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
_____________

चित्रपट : निवडुंग
गीत : ग्रेस
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर

(माझ्या आयुष्याच्या कटू आठवणीना उजाळा देऊन हृदयाशी भिडुन गेलेली हि कविता ........विद्या )

Saturday, April 7, 2012

पाऊस

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा
-ग्रेस

Friday, April 6, 2012

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे



राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?

कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे

गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची
आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे
वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे
_________________

गीत : वा. रा. कांत
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित वसंतराव देशपांडे

Thursday, April 5, 2012

माझी शाळा

माझी शाळा.....


शाळेचे ते दिवस आठवले की ...
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं....
Highway जवळ
ची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं....
... शाळा आमची छान होती ...
Last bench वर आमची team
होती ....
Cricket च्या वेळी ground वर
cheating व्हायची ...
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन
मधल्या वडा-पाव साठी ....
साला नेहमीच line असायची ...
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो ...
प्रतिज्ञेच्या वेळी हातालाटेकू
देऊनही ....
प्रतिज्ञा म्हणायचो ...
प्रार्थनेच्या वेळी मात्र....
सगळ्यांसारखे ...
नुसतेच ओठ हालवायचो ....
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन .... मुद्दामचभिजत
जायचं ...
पुस्तक भिजू नये म्हणून ....
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं....
शाळेतून येता येता ... एखाद्या डबक्यात
उडी मारून ...
उगीचच सगळ्यांच्या अंगावर
पाणी उडवायचं ....
Black -board वर
बोलणार्या मुलांमध्ये ....
Monitor नेहमीच आमचं नाव
लिहायचा ...
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे ...
हातावर duster चा व्रण असायचा....
प्रयेत्येक Off -period ला P.T.
साठी ....
आमचा आरडाओरडा असायचा ...
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा....
तो बर्फाचा गोळा संपवायचा....
मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही....
कधी कोणी link नाही लावायचं...
प्रत्येक महिन्यातून एकदातरी ...
डोक्यावरचे केस कापायचो ...
आणि आज-काल सारख्या प्रत्येक
वाक्यात ....
शिव्या सूद्धा नाही द्यायचो ...
इतिहासात वाटतं ....
होता शाहिस्तेखान ...
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ....
गणित... भुमितीत होतं ... पायथागोरस च
प्रमेय ...
भूगोलात वाहायचे वारे .... नैऋत्य...
मॉन्सून ...
का कुठलेतरी ... वायव्य....
हिंदीतली आठवते
ती "चिंटी कि आत्मकथा"
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा ...
शाळेतल्या gathering चा dance...
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा...
तो मराठी चा तास ....
दरवर्षी नवीन भेटायचे ....
Uniforms
आणि वह्या पुस्तकांचा set.....
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ....
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात....
desk वर pen ने त्या "pen fights"
खेळणं ....
exams मधल्या ...
रिकाम्या जागा भरणं ... आणि जोड्या
जुळवणं ...
चिखलातल्या त्या football
च्या matches ...
कबड्डीत ... पडून धडपडून ....
हातापायांवर आलेले scraches ...
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा....
मला पुन्हा लहान व्हायचं ....
हसायचं .... खेळायचं ....
मला पुन्हा शाळेत जायचं ..
-अनामिक

Wednesday, April 4, 2012