Wednesday, July 4, 2012

मराठी चारोळ्या

मराठी चारोळ्या

सागराच्या लाटांची एक ,
वेगळीच गम्मत असते 
जेंव्हा आपण जातो किनार्यावर,
तेंव्हा ती स्वागत करते आणि 
जेंव्हा आपण निघतो किनार्यावरून,
तेंव्हा ती"परत या माझ्या भेटीला"
असे नकळत सांगून जाते

****************************
पावसाच्या सरी..
पसरल्या सार्‍या अंगणी.
ओल्या मातीत भिजलेल्या...
ओल्या तुझ्या आठवणी...

****************************
ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो..

****************************
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला.....
होता जरा शहारा, वेडा खुला बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला....

****************************
... संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला....
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...

****************************
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि ..
मन तुटायला हि वेळ लागत नाही 
वेळ लागतो फक्त ...
ते गुंतलेले मन आवरायला आणि
तुटलेले मन सावरायला

****************************
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखावावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानि मी चिंब भिजुन जावे.

****************************
 -अनामिक
  ****************************

0 comments: