शाळा
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.
इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .
पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .
पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.
मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .
शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .
काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.
शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी
-अनामिक
0 comments:
Post a Comment