Wednesday, June 25, 2014

चारोळी

मधे..
थोडं अंतर राहुदे
क्षणभर तुला
डोळेभरून पाहुदे

============

तसा वाद नेहमीचा...
माझा माझ्याशी चालणारा
तुझा निसटता कटाक्ष...
मनाला छळणारा…

======

तू...
कानात सांगितलेली गोष्ट
मला अजून
ऐकू येते स्पष्ट…

============

कोणी विचारलं तू कसा आहेस?...
तर काय उत्तर द्यायचं मला कळत नाही
कळत नाही म्हणण्या पेक्षा या प्रश्नाचं उत्तर
मलाच कधी मिळत नाही…
==================

आभाळभर पाखरं
आणि ओंजळभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे…

===============

तू म्हणालीस आपण पाहिलेली स्वप्नं
उधार राहिली तुझ्यावर....
मी म्हटलं ठीक आहे हे ही ओझं
ठेऊन देईन आठवणीन्च्या ओझ्यावर.

===============

मनाची तहान....
पाण्याने भागत नाही
हे बरं की मनाची तहान
सगळ्यांनाच लागत नाही.

=================

आपलंच मन असून आपल्याला
मनापर्यंत पोहोचता येत नाही
ते कसं आपल्याला सारखी बोच लावतं
तसं त्याला जाऊन काही टोचता येत नाही

=================
 चंद्रशेखर गोखले 
fb @ https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7

2 comments:

Pawan Gadgil said...

तुमच्या चारोळ्या आणि कविता फार सुंदर आहेत. मी आता तुमचा पुर्ण ब्लाँग वाचतोय. खरचं खुप छान. भावना बोलक्या झाल्याशा वाटत आहे

विद्या said...

हा मराठी साहित्य प्रसार करण्यासाठी ब्लॉग आहे आणि कवी चंद्रशेखर गोखले यांची website : http://changoonline.com/index.html