Thursday, September 18, 2008

आयुष्याच्या वाटेवर चालताना मी पुष्कळदा चुकलो,
त्या चुकांचे मापदंड भरत गेलो, पण कधी नहारलो.
हरन्यातून खूप काही शिकत गेलो, चालत गेलो,
कुठे मिळाले यश तर कुठे मिळाले अपयश.
यश तर होते मुंगीसारखे अपयश पाहता पहाडासारखे,
अपयशाच्या पहाडाला कशी न घाबरलो..
मुंगी बनून पहाड चढलो पण कधी न हरलो.
पहाडातून वाट शोधात चालत गेलो.
काटे रुतली रुतल्या काचा,जखमी झाले मन
त्या जखमांची पर्वा न करता,बांधून पट्ट्या चालत गेलो.
पट्ट्या फाटल्या,रक्त वाहिले, पण मी न फाटलो.
नात्याचेही बांध फुटले, तुटले सखे सवंगडी
मग सोबतीला कोणी न उरले पडलो एकाकी
रडलो, थांबलो, पुन्हा चालत गेलो पण कधी न हरलो.
दुरून दिसली वाट नवीन,सुंदर आणि सुरेख चालत गेलो.
अपयशाला मागे टाकून याशाजवळ पोहचलो.
नात्याचेही बांध बांधिले, जुळविले सखे सवंगडी.
आता आयुष्याच्या या सुंदर वाटेवरती ना उरल्या काचा ना राहिले काटे

0 comments: