Tuesday, September 9, 2008

"पुरवतो मी आज तुझा हट्ट!"
कुणी तुला चंद्र म्हणतं
कुणी तुला फुल म्हणतं
प्रत्येक जण आपापल्यापरीनं
तुझ्या सौंदर्याचं वर्णन करतं
कोणासाठी तु आहेस जलपरी
तर कोणासाठी एक स्वप्नसुंदरी
आज तुझा जुना हट्ट मी पुरा करणारं
तुझ्या सौंदर्याचं वर्णन आज मी ही करणार......
केस तुझे रेशमी इतके
रेशीमही ज्याच्या शोधात भटके...
डोळ्यात तुझ्या मी हरवलो प्रथमदर्शनी
शोधतो आहे आजही स्वतःला.....
ओठांचा तर तुझ्या काय सांगु थाट
माझ्या प्रत्येक भावनेला फुटते तिथेच,
शब्दरुपी वाट......
तेज तुझ्या चेहऱ्यावरले पाहुन
सुर्यालाही लागे स्पर्धेची चाहूल.
जाण न प्रिये तु माझी व्यथा
काय सांगू तुझ्या सौंदर्याची कथा
तेज तुझ्या चेहऱ्यावरले पाहुन
सुर्यालाही लागे स्पर्धेची चाहूल.
जाण न प्रिये तु माझी व्यथा
काय सांगू तुझ्या सौंदर्याची कथा .

0 comments: