Wednesday, June 30, 2010



ती दिसली.....


भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....


तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....


तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....


खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....


म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....


तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....


कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....


इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....


नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....


-   कमलेश गुंजाळ

कमलेश गुंजाळ BLOG
--***-----



होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..


कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...


नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा


पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा


कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............ !


पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा............ .!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,


होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा........


----***---------
हंबरून वासराले चाटते जवा गाय, 
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
 
आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी..... पिठामंदी 
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ..........
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
 
 
कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या .......... रं काट्या कुट्या 
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
 
 
बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान .....ग शिकून शान.....
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
 
 
दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या.......
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
 
 
नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान, 
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
 
 
गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी 
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी.........̱ग तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी  ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
हंबरून वासराले चाटते जवा गाय, 
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले............ .......
- कवी नारायण सुर्वे
----------------------*********-------------------






मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा
मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!


का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??
आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!


मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा
मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!


का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??
आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!


एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी
मी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??


भले आजही तुला जिवंत मी दिसेनही
मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "
Abhijit Nagle
BLOG

------**--------
गर्वसे कहो,We Are मराठी…………


लटकणारा
चेहरा आणी कपाळावर आठी,
गर्वसे कहो,We Are मराठी,
आमची मुंबई,मराठी मुंबई,
अशी घोषणा देऊन फसलो,
नि आमची मुंबई,
भलत्याच्याच हातात देऊन बसलो………




गल्ल्यावरचा मद्रासी अण्णा,
गालातल्या गालात हसतो,
नि मराठी माणूस,
टेबलावरती फडके मारत बसतो………..




आमच्या प्रांतात आम्हीच उपरे,
नाही आधार कुणाचा पाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी,
मराठी माणूस देवाला भितो, कर्जाला भितो,
एवढा दोघांनाही भित नाही,
तेवढे इंग्रजीला भितो…………….




कुणी 'अरे' म्हटलेकी की तोंडातून 'कारे' निघून जाते,
पण कुणी BASTARD म्हटलं,
की सगळी हवाच निघून जाते……………




मराठी भाषेला जाऊन एकदा प्रश्न केला,
मुंबईतून गेलीस तशी महाराष्ट्रातून जावे,
असा विचार मनात नाही आला???
त्यावर ती म्हणाली,
काल होती बहिणाबाई आणी मुक्ताबाई,
आज असे कुसूमाग्रज आणी पुं.लं. माझ्या वारी,
थांबले त्यांच्याचसाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी…………….




बोलता बोलता अचानक उठली अन् म्हणाली,
छंद झाला, हौस झाली, कवीता झाली,
पण पुरत नाही ती पोटासाठी,
आता निघाले जरा खळगी भरण्यासाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी……………






----**----------




बहारो फुल बरसावो...


तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..


तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..


बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..


तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..


म्हणतात प्यार मे
दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..


बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..


नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..


खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..


एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..


अरे खाट
तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....


बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..


--------***-----------










रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….




आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..




अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….




झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….




माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..




विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना…………………




शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना……………




सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….


-------***------------


माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा...
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा...
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ, प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा..
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?




कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा
-----------***----------


जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही


फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही


तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही


कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही


दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही


जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…


- एल्गार, सुरेश भट






------***--------


हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही


आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…


- एल्गार, सुरेश भट


--------***-----------

Tuesday, June 29, 2010

माकड आणि माणूस
एकदा एक माकडीण बाजारात गेली
चोरून कैरी अन् डाळ घेऊन आली
माकडभाऊ बसले होते छान ऊन खात
भसाडया आवाजात कुठलेसे गाणे गात
माकडाला म्हणाली - बसलाय कायउठा!
गुळ चांगला किसा अन् वेलदोडा कुटा
माकड: अगं  बयेकाय झालयं काय तुला
सकाळच कोवळं ऊन खाऊ दे ना मला
माकडीण: आता तुमचा पुरे झाला आराम
तुम्हाला काही करायला नको काम
माकड: काम मला सांगतेहे अतीच झालं
चार पिढ्यांनी माझ्या कधी काम नाही केलं
"म्हणे आराम पुरे", "तू येडी का खुळी?"
ब्रेकफास्ट राहिलाय माझा मला दे चार केळी
माकडीणसकाळ पासून कससंच होतंय मला
म्हणून तेवढं स्वयंपाकाचं सांगते तुम्हाला
करा बेत शिरापूरी बटाटयाची भाजी
जोडीला भरलेली वांगी करा ताजी
चांगलचुंगलं खावसं वाटतंय मला
आबंट-तिखट चव लावा माझ्या जिभेला
सासूबाईंचे पाय जेव्हा झाले होते भारी
मामंजींनीच उचलली जबाबदारी सारी
तुमचाही पुरे आता पोरकटपणा
झाडावरून उडया मारत राहता दणादणा
माकड: काय बोलतेस तू...काही समजत नाही
पाय भारी - चकरा काही उमगत नाही
पित्त झालंय तुला म्हणून हा त्रास होतो
आत्ता जाऊन तुझ्यासाठी मोरावळा घेऊन येतो
माकडीणअहो संसाराच्या वेलीवर उमलणार आहे फूल
इवलाश्या पावलांची लागली मला चाहूल
माकड: कसले वेल कसले फूल काहीही बोलतेस
मला अशी सारखी कोडयात टाकतेस
वेल अन् फूलमला काय घेणे देणे
मला फक्त माहित गोड फळे खाणे
माकडीण: आता कसे सांगू तुम्हालाकाही समजत नाही
अहो तुम्ही बाबा होणार अन् मी होणार आई
घरात आपल्या छोटेसे बाळ आता येणार
त्याच्या माकडलीलांनी घर आपले भरणार
माकडाची टयुब जरा उशीरानेच पेटली
घरातच त्याने मग कैरी डाळ वाटली
शेपूट तोंडाला लावून माकडीण हसली
कैरीला खाता खाता मनात म्हणत बसली
माणूस काय अन् माकड काय
माणूस काय अन् माकड काय
'वरून ताकभात ओळखणे यांना माहितच नाय
यांना माहितच नाय!

Thursday, June 24, 2010



*खालील विनोद नक्की वाचा व कायम हसत रहा.*
अतीभयानक पीजे रिर्टन्स
------------------------
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------
एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
.
..
कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!
---------------------
पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
......
......
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------
मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------
दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
आली बाबा !!
------------------------
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्‍या दिवशी
पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
------------------------
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------
गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------
TECHNOLOGY IMPACT:
Baba aaplya mulala sangat asatat," Karatya tula kiti vela sangitale ahe ki
tuza janma zala hota, tula konatyahi website warun download kele navhate."
-----------------------
पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------
जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
--------------------------
३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का??
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात ...!!"

Wednesday, June 23, 2010


कृष्ण कमळ





ह्या फूलाला नाव कुणी दिल माहित नाही पण आहे मात्र अगदी योग्य. म्हणजे कृष्णासारख कमळ किंवा कमळातला कृष्ण.
कृष्णासारख कमळ…
कमळाची पाकळी पाहिलीत तर ती नैवेद्द घेण्यासाठी आपण जसा हाताचा द्रोण करू तशी असते. मधे फुगीर बाहेर गेलाला भाग आणि कडा जराश्या आत वळलेल्या. तश्याच पाकळया या फुलाच्या बाहेरील बाजूला असतात.
कृष्ण आणि कमळ यांचा एक संबंध म्हणजे कॄष्णाला `कमलनयन असलेला` असं ही म्हट्ल जात.कमळाच्या पाकळीच्या आकारासारखे ज्याचे डोळे लांबट आहेत तो कमलनयन.
पद्मनाभ ,पद्महस्त ही पण कृष्णचीच नाव आहेत.




कृष्ण काळा.पण आपला देव! मग त्याला `काळ` कस काय म्हणायच ? म्हणून तो निळा.
ह्या फुलाचा रंग ही निळा. कृष्णासारखा. कमळ, ते ही निळं!
हा निळा म्हणजे आकाशी निळा नाही तर गडद, काळपट निळा.जांभळाच म्हणा हव तर. कृष्णप्रिय मोरपिसामधे एक जांभळी छटा असते तशी छटा.
कमळातला कृष्ण …
मोरपिसाला जसे धागे,रेषा-रेषा असतात अगदी तश्याच या निळ्या कमळाच्या पाकळाच्या आत बारिक लांबर्‍ पाकळ्या दिसतात .मोजणी केल्यास साधारणपणे १०० असतात.ते कौरव.त्याच्या आतल्या बाजूला ५ पांडवही दिसतील.आणि मध्यावर तीन लोक (स्वर्ग, मृत्यू , नरक) माथ्यावर पेलणारा श्री कृष्ण.
कौरव,पांडचासहीत उभा असलेला कृष्ण या कमळात पहायला मिळतो .म्हणून हे कृष्ण कमळ.
अस ही म्हणतात की मधला कृष्ण आणि बाजूने गोल फेर धरलेल्या त्या शेकडो गोपिका.


एका मंदिरात दूर्मिळ अस चित्र मी पाहिल आहे-- ह्या कृष्णकमळाचा हार परीधान केलेले भगवान श्री कृष्ण. ते ही मोरावर बसलेले! निळ्या रंगांच्या सर्व छटा त्यात होत्या. तो निळी कांती असलेला निलकांत,निळी कमळं, निळा मोर.
सुरेख निळी निळाई! केवळ अवर्णनिय!


हिंदूंनी जसा या फूलाचा संबंध त्यांच्या देवाशी लावला तसाच ख्रिश्चनांनी ही या Passion Flower वर केलेल्या कथा आहेत.येशू ख्रिस्ताला सूळावर चढवले त्या वेळाचा अनुभव (Passion for suffering) कथन करण्यासाठी आणि तो अधिक श्रवणिय करण्यासाठी या फूलाच्या रचनेचा उल्लेख केला जातो. अधिक माहिती जलावर मिळते.


एकदा असच रेल्वे स्टेशनच्या बाहेर फूटपाथवरच्या गजरेवालीला सांगितल की “मिळाल तर आण कधी तरी ”.
मग दोन तीन दिवस पुन्हा पुन्हा चौकशी केली.
"बाये , त्येच काय माळरान आस्त व्हय गुलाबावानी? लई नाजूक आस्त त्ये. येल अस्ती बग त्येची.तोडून आनायच म्हन्जी जिव नसल्यागत होईल बग"गजरे वाली उत्तरली.
माझ्या आग्रहाखारत आणली ही ५-६ फूल. आणि म्हणाली ," पैश्ये नको ग.मी नाय मोजले या कमळाला पैश्ये. आशीच आनली इचारून बाजूवालीला. घे तूले कमळं"
खरोखरच माना टाकल्या होत्या त्या नाजूक फूलाने. मला अपराधी वाटल जरा






खरतर कमळाच देठ कस जाड असतं. या कमळाच हिरव देठ फूलासारखच नाजूकस. आणि हे फूल `कमळ `असल तरी पाण्यातल नाही तर वेलीवरचं!
रंग जितका आकर्षक तितकच याचा वास ही मोहक असतो. काहीसा मंद.अगदी जवळ जाऊन घेतला तर तरच येणारा. पण मनाला धुंद करणारा.पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा.
म्हणूचच या फूलाचे आयुर्वेदातही महत्व आहे. थकवा,अस्वस्थता घालवण्यासाठी आणि रक्त दाबावर उपाय म्हणून या फूलाचा वापर केला जातो.मानसिक ताणावरच्या औषधात ही या सुगंधी फूलाचा वापर होतो.
अस असल तरीही गुलाबाचे गालिचे, शेवंती ताटवे, झेंडूचे रान, मोग-याच्या बागा, सूर्यफूलाची शेती पहिली आहे पण कृष्ण कमळाचे असे घाऊक उत्पादन नाही पाहिले.
आणि जस गणपतीला जास्वंद, हनुमानाला रूई, देवीला वासाची फूले किंवा शिवाला बेल आणि दत्ताला तुळस वाहिली जाते,तस वनमाळी कृष्णाला अमूक हेच फूल आवडत अस काही वाचण्यात आल नाही.
तरीही हे कमळ श्रीकृष्णाचच!

Tuesday, June 22, 2010

Saturday, June 19, 2010

मुंबई

मुंबई चमकत्या सिनेतारकांची
लुकलुकणाऱ्या चमचमणाऱ्या स्वप्नांची
रोज रोज प्रगत होणाऱ्या संस्कृतीची
त्यातूनच उद्भवणाऱ्या अधोगतीची!!!!

स्वप्नं पाहणाऱ्या एका राजाराणीची
हाताला काम हवं असलेल्या नोकराची
पोटाला हव्या असलेल्या भाकरीची
मराठी माणसाने दिलेल्या बलिदानाची !!!!!

अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या घातपाताची
माणुसकी म्हणून माणसाने माणसाला केलेल्या मदतीची
हिजडे बनून बघत राहणाऱ्या राजकारण्यांची
अभेद्य हिंममत असणाऱ्या मुंबईकरांची !!!!!

फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांची
वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांची
इतर कोणत्याही देशात नसलेल्या लोकसंख्येची
सर्वात भयानक ढसाळ अशा राजकारणाची!!!!!

गुजराथी मारवाडी व्यापाऱ्यांची
परप्रांतीय असलेल्या कामगारांची
भ्रष्टाचाराने ग्रासित नोकरशाहीची
मराठी माणसावर होणाऱ्या असीमित अत्याचारांची !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
-अनामिक 

Tuesday, June 15, 2010