Showing posts with label मराठी लेख. Show all posts
Showing posts with label मराठी लेख. Show all posts

Thursday, March 13, 2025

जोशी कुटुंब

जुनी पोस्ट 

हे व्हायरल झालेले पिशव्यावाले जोशी काका आणि काकू. मी अनेक दिवस त्यांच्याकडून जेवणाचा डबा घेतो. दोघं अफाट आहेत. काका ८७ वर्षाचे आणी काकू ८२. काका सुंदर शिवणकाम करतात आणी काकू अत्यंत रूचकर जेवण बनवतात. आज डब्यात पालकाच्या पुर्या होत्या. परिस्थिती मध्यमवर्गीय पण पुरेशी. एक मुलगा व एक मुलगी येऊन जाऊन असतात, त्यांची काळजी घेतात. दोघांची लग्न झालेली, सुस्थितीत. पण ही दोघं एकमेकांना धरून आहेत. 'स्वयंपुर्ण' आणी 'स्वाभिमानी'. काकू डबे देतात, काका हात पाय चालू रहावेत यासाठी कापडाच्या पिशव्या शिवतात आणी आठवड्यात दोन वारी ठराविक जागी जाऊन विकतात. 
सिन काय झाला कि काही दिवसांपूर्वी कोणीतरी पिशव्या विकत घेताना त्यांचा फोटो काढला आणी सोशल साईट्सवर टाकला. काकांना पत्ताच नाही. लिहिणार्या माणसाने लोकांनी काकांपासून श्रम प्रतिष्ठा व जगण्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पोस्ट टाकली पण लोकांनी त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. फोटोत गोड हसणारे काका व्हायरल झाले. आता काकांच्या घरी लोकांची रीघ लागलेय, फोन खणाणतायत. कोणी त्यांच्या पोरांना नावं ठेवतायत, कोणी २०० पिशव्यांच्या ऑर्डर्स देतायत, परदेशातून फोन येतायत, मदतीची तयारी दाखवतायत. काका सांगत होते सगळ्यात भारी म्हणजे दुबई च्या एका ग्रुहस्थांनी त्यांना व्रृध्दाश्रमात ठेवण्याची तयारी सुरू केली. सिरीयल मधले दोन तीन नट येऊन गेले, पेपर वाले आले, न्यूज वाले आले. सगळी गंमत चाल्लेय. 

आता यात त्यांना आणि त्याच्या मुलांना मनस्ताप होतोय खरा, पण मला आपला समाज अजूनही किती संवेदनशील आणी जिवंत आहे हे बघून भरुन आलयं. एक कुटुंब म्हणून आपण अजुनही किती बांधलेले आहोत. कोण कुठल्या जोशी काकांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकांनी धाव घ्यावी हि कसली भारी गोष्ट आहे. 
आता या ठिकाणी जरी आमचे काका काकू स्वयंपूर्ण असले तरी दुसरे कुणीतरी काका खरच गरजवंत असतील.. त्यांना मदत व्हायलाच हवी. त्यामुळे यावेळेस जसं आपण मदतीचा हात पुढे केला तसाच प्रत्येक वेळी करायला हवा.
We rise by lifting each other.

**बाकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उभयतानी कुंठल्याही पध्दतीची पैशाची मदत किंवा निधी संकलन अपेक्षिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने किंवा नावावर कोणीही पैसै गोळा करत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब काकांच्या खालील नंबरवर संपर्क साधावा.**

- #बोलेगोड

सिध्देश्वर जोशी 8291036120

18 march 2020

Saturday, March 19, 2022

post 3

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत
गाण्याची मैफल रंगलेली असावी...सकाळी दहा वाजता उठून दोन
वेळा चहा झालेला असावा...हवा बेताची गार
असावी...हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून
टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी...
ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे...
आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद
घातल्यासारखा स्वाद घालावा...

दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी...आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे...यथेच्छ भोजन व्हावे...मस्त पान जमावे...इब्राहिमी जर्द्याचा तोंडात
गिलावा व्हावा...गार पाणी प्यावे...आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही.
त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की,
संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस
नवर्यासारखा फिरायलादेखील जातो; विश्वास
ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणीदेखील घेऊन देतो!

-पु.ल.
(माझे खाद्यजीवन : हसवणूक)

post 2

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'

अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.

मनाचा एवढा हळवेपणा नवरा - बायकोच्या नात्यामध्ये नाही हो येत. तिथे मित्रच असावा लागतो. कारण इतर कुठल्यही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्या बरोबर मानसिक, शारिरीक, कौटुंबीक आणि सामाजीक बंधन पण येतात. ह्या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळे कसली बंधनही नाहीत. आणि किंबहूना ती तशी नसावीतही. वाट्टेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो मोकळे होउ शकतो. तिथे स्त्री - पुरूष, जात - पात काही नाही आडवे येत. मनसूबा बनून जातो आणि मन आनंदी होतं.

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं अस मी समजतो. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आनंद आनंद म्हणजे काय हो, अहो अशी नाती जोडणं असे मनसुबे जुळवणं हाच आनंद.
लक्षात ठेवा तोडणं सोप आहे पण जुळवणं आणि टिकवणं कठीण.
- पु. ल


Friday, June 25, 2021

संग्रहित

विलक्षण योगायोगाची
एक भावुक सत्यकथा

💕❣️
 कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी..

 मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

*‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’*

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

     *~ श्री. धनंजय देशपांडे, लातूर*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 

चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

           ~ बी. रघुनाथ
✨✨✨

Wednesday, June 24, 2020

शिक्षण

सगळीकडे  कसा आनंदी आनंद सगळे एकमेकांना प्रोत्साहन देताय ' सगळे सगळ्यांची काळजी घेताय , एकमेकांना समजून घेताय , त्यात काही अपवाद तर आहेच आणि नेहमीच असतात , ते कोणीच टाळू शकतच नाही ,
मग आता काय झाले ,नाही म्हणजे मी जे वरती लिहिले आहे ते अजून पण सगळे करतातच आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात।
प्रश्न असा आहे ।।
जीवन इतके सोपे झाले आहे का , जीवनाचे महत्व कमी झाले आहे का ,का आपण सगळे जीवनाचे महत्व अगदी रसातळाला नेऊन ठेवले आहे , विचार करण्याची गोष्ट आहे ,
माणसाचा जन्म किती योनी तुन गेल्यावर मिळतो माहीत नाही, अरे पण माणूस म्हणून जन्म झाला ना मग  का ।। त्या जन्माला पण काही भावना आहेत ,मोठे होण्याची जिज्ञासा आहे , प्रेम व्यक्त  करण्याची इच्छा आहे ।। आणि ते जीवन आपल्या  शरीराच्या रूपाने    आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे । 
मग का ,मग का आणि मग का ।।आपण त्याला आडवतो,
संकट सॉरी संकटे अजून पण त्सुनामी वेगाने येतील मग काय त्या जीवनाला संपवून टाकायचे ।।
इतके सगळे आपण कमजोर आहेत ।। नाही।।
विचार करण्याची क्षमता खूप खूप कमी झाली आहे ।। ती वाढवण्यासाठी कोण काय प्रयत्न करतोय , जो तो आपल्या तच busy । माझी कंपनी ,माझा boss माझे प्रमोशन माझे incerment माझे पैसे ,माझे प्रॉपर्टी ,अहो ते तर हवेच ।।पण वेळ ,वेळ वेळ दिलाच जात नाही ज्या गोष्टीला द्यायला पाहिजे।।।
आधी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरातल्या सगळ्यांना adjestment करायची सवय होती नकार पचवायची सवय होती आता विभक्त ,मला  हे पाहिजे म्हणजे पाहिजे ।। खर सांगू का नकार पचवायची क्षमता पूर्ण पणे संपली आहे , जो तो पाळतोय कुठे जातोय माहीत नाही।।
काल आमचा हिरो सुशांत ।।
काय कमी होते  त्याच्याकडे , उभारता कलाकार होता ,टॅलेंट होते ,पैसा भरपूर होता , मग का ।।
आहे त्या परिस्थितीत जगण्याची ।एन्जॉय करण्याची जीवन समृद्ध करण्याची , कला विकोपाला गेली असेच वाटते आता ।।
परीक्षांची निकाल लागतात तेव्हा हमखास  बातम्या येतात नापास झाला , कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या ।। कोण जबाबदार याला ।। आत्महत्या करणारा ,  आई बाबा ,की आजची शिक्षण पद्धती।। 
Positive रहा ह्याचे शिक्षण दिलेच जात नाही ।।
मनाचा कमकुवतपणा काढून टाका तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ठरवले तर काहीही करू शकतात तुमच्यात शक्ती आहे तुम्ही ठरवले तर तीच पूर्व दिशा असेल असे का समजावले जात नाही, सांगितले जात नाही मन वळवण्याचा प्रयत्न का केला जात नाही ।।।
चूक कोणाची आपल्या सगळ्यांची आहे असे माझे मत आहे ।।
आता सरकार वर येतो नेहमी अभ्यासक्रम बदलत असतात ।।
मग।।
Depression । निराशा । एकटेपण वाटायला लागले ।। lost lost वाटायला लागले ।।
जीवन संपवण्याचे विचार डोक्यात यायला लागले ।। आणि अजून काही निराशात्मक त्याला अभ्यासक्रमात काही धडे आहेत का । नाही  नाही नाही ।।
हीच ती वेळ आहे, अश्या प्रकारचे शिक्षण लहानपणापासूनच द्यायला हवे असे नाही का वाटत ।।
 बुद्धी स्ट्रॉंग करा, संकटाला सामोरे जायची शिकवण  द्या ।। कठोर बनायला शिकवा
आणि हे सगळे अभ्यासक्रमात समाविष्ट करा ।।
बघा कसा फरक पडतो ।।
सगळे जग सुखी होईल ।।
लेखक
शेखर अरुण लोहकरे
9822329328
श्रीराम । 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, June 9, 2020

Friday, June 5, 2020

कुंकू

♦️🛑♦️ कुंकू कसे लावावे ? ♦️🛑♦️

🛑लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे.

🛑उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.

🛑कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ.

🛑अ: कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या (चेहर्‍याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.

🛑आ:  कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते.

🛑इ. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.

🛑कमळ हे साकारस्वरूप, कुंकू हे शक्तीस्वरूप, तुळस हे श्रीकृष्णतत्त्वस्वरूप, तर बेल हे शिवस्वरूप आहे.

🛑कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते.

🛑कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्‍या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होऊन वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.

🛑ब्रह्मतत्त्व.

साभार.....🙏

Saturday, May 9, 2020

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

या लेखाचा संपादित अंश आजच्या eSakal मधे प्रसिध्द झाला आहे.

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर
 -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी
भ्रमणध्वनी : 9960487995

सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतो... वाचन हा तसा एकमेव आनंद त्या
काळात उपलब्ध होता. अर्थात्, त्या वेळेच्या आमच्या पिढीला आजही हाच ‘एकमेव आनंद
वाटतो’ हे कदाचित आमच्या पिढीचे माहिती आणि तंत्रज्ञान युगातले अज्ञान असावे.  असेल ते
असो - पण आजही वाचनाचा आनंदच खरा आनंद वाटतो! त्यावेळी म्हणजे पंचेचाळीस वर्षांपूर्वी
तर रेडिओ ऐकणेही चैनीची बाब होती. साथीला होती ती ग्रंथसंपदा! ती सुद्धा ग्रंथालयाच्या
कपाटात! खरे तर त्या काळी अभ्यासक्रमाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर वाचन करणे म्हणजे शुद्ध ‘उडाणटप्पूपणा'च होता! तो उडाणटप्पूपणा आमच्या पिढीने भरपूर केला. स्वत:चे एखादे आवडते पुस्तक असणेही दुरापास्तच! अशा काळात आमच्या गळतग्यासारख्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात माझ्या हाती ‘पॅपिलॉन’ पडले! पुस्तक नावापासूनच आगळेवेगळे. हेन्री शॅरियर नावाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका फ्रेंच व्यक्तीचे आत्मचरित्र. मराठीत त्याचा अनुवाद करणारे श्री. रवींद्र गुर्जर! इतकाच तपशील ज्ञात होता. पुस्तक एका झपाटलेल्या आघाशीपणाने वाचून काढले. पुन्हा वाचले, पुन:पुन्हा वाचले... ह्या प्रवासात हे पुस्तक परभाषेतली अनुवादित पुस्तक आहे हे देखील विसरून गेलो. लक्षात राहिले ते पॅपिलॉन आणि रवींद्र गुर्जर!

तसा आजच्या दृष्टीने तो स्वस्ताईचा काळ होता असे म्हणतात. (आम्हाला ही स्वस्ताई कधी
भेटलीच नाही. प्रत्येक काळ आम्हाला महागाईचाच वाटतो!) चांदोबा 50 पैसे आणि अमृत
(मासिक) 1.50 पै. इतके स्वस्त!. ते सुद्धा विकत घेणे कठीणच होते! सत्यकथा लायब्ररीत बसून आधी मुखपृष्ठावरून हात वगैरे फिरवून मग उघडायचे! आपण सत्यकथा वाचतो म्हणजे कुणी मोठे ज्ञानी आहोत असे वाटे! अशा काळात पॅपिलॉनने झपाटले होते!

वाटावळणांचा प्रवास चालूच राहिला. वाचनातही अनेक संस्मरणीय ठिकाणे भेटली; पण
त्यावेळेच्या पॅपिलॉनच्या वाचनाचा ठसा मात्र अमीट राहिला. नोकर्‍या बदलत-बदलत
अखेरीस गोव्यात शिक्षक झालो. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोवा-कोकण भागात भ्रमंतीही झाली. एक-दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणात- देवरुखला जाण्याचा योग आला. आयोजकांनी आम्हा पाहुण्यांची सोय एकत्र केली होती. बदलापूरचे ‘ग्रंथसखा’चे शिल्पकार श्री. श्याम जोशी प्रमुख पाहुणे होते. आदल्या दिवशीच्या रात्रीच्या वेळी आम्ही शेकोटीभोवती गप्पा मारत बसलो. श्याम जोशींनी आपल्याबरोबर आलेल्या स्नेह्यांची ओळख करून दिली. शांत, मितभाषी असे एक गृहस्थ श्याम जोशींच्या मागून पुढे आले. श्याम जोशी म्हणाले, ‘‘हे पुण्याचे प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर!’’ - झाले माझ्या डोळ्यांसमोरून
पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ झपाट्याने सरकू लागला. ‘पॅपिलॉन’ आणि ‘रवींद्र गुर्जर’ हे अद्वैत
असे अचानक नजरेसमोर साकारावे, त्या आश्‍चर्याच्या धक्क्यात मी होतो.

बघता-बघता पंचेचाळीस-पन्नास वर्षांचे अंतर तुटले आणि गुर्जरांशी खूप वर्षांची मैत्री असावी,
तशा गप्पा झाल्या. स्वत:विषयी अत्यंत कमी बोलणारे व्यक्तिमत्त्व, पण वाचन प्रवासात
‘पॅपिलॉन’नंतरही ते अनेक ठिकाणी भेटतच होते. तो सारा आलेख आठवत राहिलो. नंतरच्या
वाचनयात्रेत गुर्जरांची किती तरी पुस्तक वाचनात आली. ‘पॅपिलॉन’चा दुसरा भाग म्हणून
‘बँको’, पुझोचे 'गॉडफादर’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅपलीन’, ‘सेकंड लेडी’, ‘आईनस्टाईन’, ‘हाईनरिश
श्लीमान’वर लिहिलेले ‘सुवर्णयोगी’ अशी किती तरी...! नव्याने झालेल्या या भेटीला संवादांचे
धुमारे फुटले. रवींद्र गुर्जर हे अत्यंत साधे, सरळ, शांत, मितभाषी, पण सतत काही ना काही
उपक्रमांत गुंतलेले आढळले. वास्तविक पाहता त्यांचे शिक्षण बी.ए. (गणित), बी. जे.
(वृत्तपत्रविद्या), एम.ए.पीएच्.डी. (पुरातत्त्व) अशा वैविध्याने साकारले आहे. आयुर्वेद रसशाळा, विशाल सह्याद्री पुरवणी संपादक, संतकृपा/धर्मश्री प्रकाशन, डेक्कन कॉलेजमध्ये  पुरातत्त्व विभाग - संगणक विभागप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे; पण खर्‍या अर्थाने ते रमले ते अनेक दर्जेदार इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याच्या कामात. गेली चाळीस वर्षे ते ‘गायत्री साहित्य’ हे प्रकाशन चालवितात. या माध्यमातून कथा, कादंबर्‍या, धार्मिक, संस्कृत- अनुवाद. अशी सुमारे 100 हून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. इंग्रजी वाचनाचा आणि इंग्रजी सिनेमांचा प्रचंड नाद! अक्षरश: हजारो चित्रपट पाहिले आहेत. ह्या व्यासंगाबरोबरच पर्यटन, आपले स्वास्थ्य, संतकृपा, विश्‍व पांथस्थ, समर्थ संदेश, ग्रंथ भारती यांसारखी अनेक नियतकालिके आणि पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ग्रंथ आणि वाचन यांच्यावरील प्रेमामुळे ‘स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर' या वाचन संस्कृतीला वाहिलेल्या संस्थेचे ते मार्गदर्शकही आहेत.

माझ्यासारख्या इंग्रजी वाचनाची ‘फ्युएन्सी’ नसलेल्या वाचकावर रवींद्र गुर्जरांचे अनंत उपकार
आहेत. अन्यथा, ‘गॉडफादर’, ‘सेकंड लेडी’, ‘कोमा’, ‘पेलिकन ब्रीफ’, ‘आईनस्टाईन’, ‘चॅपलीन’,
‘बिटवीन शेड्स ऑफ ग्रे’.... यांसारख्या अभिजात इंग्रजी ग्रंथांच्या वाचनाला मुकावे लागले
असते. भाषांतर ही साहित्याची एक वेगळी शाखा आहे. आपल्या संस्कृतीशी, विचारपद्धतींशी,
जीवनशैलीशी अत्यंत अपरिचित असलेल्या परप्रांतीय, परभाषिक वाङ्मयाचा वेध घेऊन त्या
साहित्य-संस्कृतीचे मराठीत साधे, सरळ, सुबोध आणि ओघवते भाषांतर करणे म्हणजे केवळ
भाषा-अंतर नव्हे! इंग्रजीमधल्या लेखनातील सर्व कंपने, संवेदना आणि अर्थछटांचा संवेदनशील
वेध घेऊन पुन्हा मराठी भाषेत लिहिणे म्हणजे एक नवसृजनच आहे, असे मला वाटते. खरे तर
स्वलिखित साहित्यकृतीमध्ये आणि सुंदर, ओघवत्या, आशयसंपन्न आणि अर्थपूर्ण अशा
भाषांतरामध्ये कोणताही दर्जात्मक फरक करावा, असे मला वाटत नाही. आज मराठी भाषा
विविध अंगाने समृद्ध होत आहे. इतर भाषांतून मराठीमध्ये आलेल्या भाषांतरित साहित्याने
आपले स्वत:चे असे एक समृद्ध दालन सजविले आहे. ह्या दालनामध्ये अनेक चमकून
दिसणार्‍या कलाकृतींची भर रवींद्र गुर्जरांना घातली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध आणि
विकसित होण्याच्या ह्या प्रवासास गुर्जरांचे योगदान महत्त्वाचे आहे.

रवींद्र गुर्जर येत्या २९  एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने
त्यांच्या कार्याचा, विविध व्यासंगांचा, त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांचा वेध घ्यावासा वाटतो.
आयुष्याच्या त्या टप्प्यावरही त्यांच्या सुरू असलेल्या उपक्रमांची यादी मोठी आहे. संगीत व
नाट्यकलेचे चाहते असलेल्या गुर्जरांनी अक्षरश: हजारो कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे.
त्यांच्या अनुवादाचे हजारो वाचक देशात, परदेशात विखुरलेले आहेत. आजही अनेक
कार्यशाळा, मुलाखती, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला ह्या निमित्ताने समस्त मराठी विश्‍वात
त्यांचा संचार सुरूच आहे. बदलापूरच्या ग्रंथसखाचे निर्माते श्री. श्याम जोशी यांच्या समवेत
महाराष्ट्रभर वाचन संस्कृतीच्या अभिवृद्धी योजनांमधून ते कार्यरत आहेतच. ह्याच योजनेचा एक भाग म्हणून अगदी परवा ते गोव्यात येऊन गेले. वाचन संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी
फोंड्याजवळच्या बोरी (बा. भ. बोरकरांचे गाव) ह्या छोट्याशा गावात आम्ही चालवीत
असलेल्या लहानशा वाचनालयाला भेट देऊनही गेले. वाचन संस्कृती सर्वदूर पसरावी, अगदी
खेड्यापाड्यांतही सुजाण वाचक निर्माण व्हावेत, ह्या तळमळीतून वाचनसंस्कृतीला जे-जे पोषक आणि साह्यभूत आहे, त्यात भाग घेण्याची त्यांची धडपड विलक्षण आहे. गेल्या 100 वर्षांत गाजलेल्या मराठी पुस्तकांचे त्यांचे संकलन आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रभर
किमान 500 सांस्कृतिक केंद्रे आणि घरगुती वाचनालये सुरू व्हावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परभाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत यावे व मराठी
अनुवादाचे दालन अधिक समृद्ध व्हावे, या दृष्टीने ‘अनुवाद’ या विषयावर ते बहुमोल मार्गदर्शन
करतात. सुमारे 500 हून अधिक अनुवादक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

आज वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावरही रवींद्र गुर्जरांचा वाचन-लेखन प्रवास त्याच वेगाने
चालला आहे. जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्याच्या आस्वादाने त्यांचे मन अधिकच
आत्मलक्ष्यी बनते. मग 'मम आत्मा गमला' सारखी छोटी पण ‘स्व’चा शोध घेणारी पुस्तिका
आपसूकच साकार होते. गुर्जरांनी आपल्या भोवतीच्या साहित्याचा, संगीताचा, नाट्यसृष्टीचा,
चित्रपटसृष्टीचा मनमुराद आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावंतांचा सहवासही त्यांना लाभला.
मनात येईल, त्या उपक्रमांत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. डोळ्यांसमोर मात्र ‘वाचन
संस्कृतीची अभिवृद्धी’ हाच ध्यास ठेवला. आजही त्याच ध्यासाने ते कार्यरत आहेत. अशा अनेक
उपक्रमांत ते जरी ते मग्न असले, तरीही त्यांची हजारो वाचकांच्या मनातील प्रतिमा मात्र
‘पॅपिलॉन’कार गुर्जर! हीच आहे. एखाद्याच कलाकृतीच्या वाट्याला असे भाग्य येते. इतकी वर्षे
होऊन गेली.  रवींद्र गुर्जरांची 35 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली, तरीही माझ्या मनातले
‘पॅपिलॉन’ पंख मात्र रवींद्र गुर्जरांच्या नावाबरोबरच लयबद्ध हलल्यासारखे वाटतात!  पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे  ते पुस्तक आजही मी हाताळतो आहे, असे वाटते आणि जागतिक साहित्यातील पैलपाखरे मराठी माणसाच्या अंगणात उतरविण्याचे श्रेय रवींद्र गुर्जरांचे आहे, ह्याची साक्ष पटते.

Tuesday, May 5, 2020

Saturday, April 25, 2020

जात

#परशुराम श्रावण संवाद !
जातीचा संबध कर्माशी असतो ! ब्राम्हण चा मुलगा ब्राह्मण ..वैश्य चा मुलगा वैश्य नसतो!
https://youtu.be/Mo2f6iElKWY

परशुराम जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय होते !
विद्या

Monday, April 13, 2020

लेख

पाहिलात ना हा पोलीस अधिकारी... 
निःशब्द होऊन जातो आपण असं काही दिसलं की .. 

वाटतं याच्या तुलनेत आपण किती सुखात आहोत. आपल्याला घरातच तर राहायचं फक्त. 
इथे पहा.. दारात बसून जेवावं लागतंय कारण कर्तव्य साद घालतंय.. 

हक्काचं घर असून तो आत बसून जेऊ शकत नाही.. आपल्यामुळे घर संकटात टाकायचं नाही त्याला. 
ताटाखाली प्लास्टिकचा डबा घेतलाय आणि दोन घास पोटात टाकतोय कसेबसे.. 
नजर मात्र खिळलीये दारात उभ्या असलेल्या आपल्या चिमुरडीवर...
दारात उभं राहून चिमुकलीसुद्धा पाहतेय बापाला ! 
पण मोकळेपणाने उचलून सुद्धा घेऊ शकत नाही तो. 
जातील हेही दिवस असा दिलासा देतोय स्वतःला... 
घासासोबत गिळतोय एक आवंढाही !

हे त्याचं रोजचं जगणं झालंय आता. 
असाच जेवतोय फुटपाथवर, झाडाच्या सावलीत नाहीतर असा आपल्याच दाराशी निर्वासितांसारखा !
त्याची कशाविषयी तक्रार सुद्धा नाही कारण त्याला माहितीये माझ्यासारखे अनेकजण रोज यातूनच जातायत

कारण कोरोना नावाच्या महाराक्षसाशी दोन हात करायला तो उतरलाय मैदानात. 
 छातीचा कोट करून रोज तो उभा राहतोय रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी !
आपल्याला पिटाळतोय घरी आपण सुरक्षित राहण्यासाठी !
स्वतः मात्र उभा राहतोय रस्त्यांवर तुमच्या आणि कोरोनाच्यामध्ये भिंत बनून !

आपले दोन अश्रू त्याच्यासाठी देऊया.. 
त्याची ही मेहनत वाया जाणार नाही हे पाहूया.. 

लेखन :© पराग पोतदार


Friday, February 28, 2020

मराठी अभिमान गीत

मराठी अभिमानगीत : एक आनंदयात्रा
 
२८ फेब्रुवारी, २०१०! सकाळी ७ वाजता बिग एफ् एम् या रेडिओ वाहिनीवर कविवर्य सुरेश भटांचे शब्द निनादले.  ‘मराठी अभिमानगीत’ वाजलं आणि खाजगी रेडिओ वाहिन्यांवर मराठी गाणी वाजायला सुरूवात झाली. आनंदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. ज्या प्रश्नापासून हा प्रवास सुरू झाला होता, त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचून एक वर्तुळ पूर्ण झालं.
 
मराठी अभिमानगीताचं लोकार्पण झालं २७ फेब्रुवारी, २०१० - त्या सोहळ्याला काल दहा वर्षं पूर्ण झाली. सव्वा वर्षं लागलं या गाण्याच्या निर्मितीला. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर उभारलेला भव्य मंच! आठ हजारांचा जनसमुदाय! दिग्गजांच्या हस्ते मराठी अभिमानगीताच्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन होत होतं. डोळ्यांमधून आनंद ओसंडून वाहत होता. कौशलची सव्वा वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत होती आणि ते पाहताना मंदार आणि मी आनंदाने नि:शब्द झालो होतो. जे कुणाच्या कल्पनेतही नव्हतं, ऐकतांनाही जे अशक्यप्राय वाटत होतं, ते कौशलने पूर्ण करून दाखवलं, साकार करून दाखवलं. त्याची सगळी जिद्द, कल्पकता, आत्मविश्वास - सगळं मूर्त रूपाने हजारो लोकांना पाहायला - ऐकायला मिळालं.  

या गाण्याच्या आणि प्रकल्पाच्या निर्मितीच्या पहिल्या क्षणापासून कौशलने मला यात सामावून घेतलं. त्यामुळे माझ्यासाठी तर हा सगळा प्रवास अधिक जिव्हाळ्याचा होता आणि आजही आहे. मी, मंदार, महेशदादा, उन्मेषच नव्हे;  तर अनेकजण यात आपणहून सहभागी झाले.  हा प्रकल्प ‘माझा’ आहे, ही ‘माझी’ जबाबदारी आहे, या भावनेने प्रत्येकजण आला. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात  हा आपलेपणा निर्माण करायचं श्रेय अर्थातच कौशलला जातं. सव्वा वर्षं इतर कोणतंही व्यावसायिक काम न करता, कौशलने या एका गाण्यासाठी तन-मन-धन झोकून दिलं. हे  खरोखरंच सोपं नव्हतं. अतिशय धाडसी निर्णय होता तो. मंदार सावलीसारखा कौशलच्या पाठीशी उभा होता. महेश वर्देंसारखा अत्यंत शिस्तबद्ध मार्गदर्शक सोबत होता, तसेच  प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या प्रवासात अनेकजण सहभागी झाले.
 
तीन शहरांतल्या वेगवेगळ्या नऊ ध्वनिमुद्रणालयांत ‘मराठी अभिमानगीत’ आणि इतर दोन गाणी, वाद्यसंगीत आवृत्ती आणि समूहगान आवृत्ती ध्वनिमुद्रित झाली.  बारा ध्वनिमुद्रक, पासष्ट वादक, एकशे बारा प्रस्थापित गायक, तीनशे छप्पन समूहगायक आणि चौदाशे लोकांच्या सकारात्मक सहभागातून साकारलं ‘मराठी अभिमानगीत’! एखाद्या गाण्याची जन्मकथा, त्याची निर्मिती, त्याचा प्रवास कुतुहलाचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, चर्चेचा, अभिमानाचा विषय ठरू शकतो आणि लोक अत्यंत प्रेमाने त्यासाठी एकत्र येतात असा अनुभव देणारं हे गाणं आहे ‘मराठी अभिमानगीत’! कविवर्य सुरेश भटांच्या ‘मायबोली’ कवितेचं ‘मराठी अभिमानगीत’ का झालं? कसं झालं? या गाण्याने नेमकं केलं तरी काय? -  गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या निमित्ताने हे सांगितलं गेलं. मराठी अभिमानगीत झाल्यानंतर ‘हा सगळा प्रवास लिहून काढ’, असा अतिशय मोलाचा सल्ला कौशलने दिला होता. प्रत्यक्ष त्या कामात सहभागी असणे वेगळं आणि तटस्थपणे ते सगळं मांडणं, हे ही खूप जबाबदारीचं आहे, असं वाटत राहिलं. दडपणंही आलं आणि अशा अनेक कारणांनी ते लिहिणं मागे पडलं. 

आज मराठी अभिमानगीताच्या शतपट मोठा भव्य प्रकल्प आम्ही हातात घेतला आहे. या नव्या प्रकल्पाची सुरूवात होत असताना मराठी अभिमानगीताच्या आठवणींचा प्रवास नव्याने बळ देईल, प्रेरणा देईल, आत्मविश्वास देईल, असं वाटलं. म्हणून हा लेखनप्रपंच.  कौशल म्हणतो - ‘उत्तम करण्याचा नुसता विचार करत बसण्याच्या नादात प्रत्यक्ष  करणं राहून जातं, त्यापेक्षा सुरूवात करावी, वाट सापडत जाते.’  या नव्या वाटेवरून मराठी अभिमानगीताच्या आनंदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचं स्वागत!

शब्दांकन - अस्मिता पांडे.
छायाचित्र सौजन्य - संजय पटवर्धन

https://www.facebook.com/marathiabhimaangeet/

Thursday, February 27, 2020

मराठी भाषा दिन ४

मराठी भाषा दिन 
व्याकरण ?
भाषा संवाद ?
शुद्धलेखन?
अभिमान ?
मराठी संस्कृती??
मराठी व्यवहारात वापर? 

आज काल मराठी चित्रपटांची नाव इंग्रजी मध्ये असतात !
आज काल मराठी वाहिनी वरील कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी शब्द आणि हिंदी गाणी असतात! 

प्रमाण भाषेचं अस्तित्व तिचा वापर किती करतो यावर अवलंबून असतं!

मराठीत बोली भाषा ही आहेत ज्यांच व्याकरण ही लिहिलं नसेल पण त्याचं अस्तित्व टिकून राहिलं आहे आणि राहणार ते आवडी मुळे उदाहरण मालवणी कोकणातली बोली भाषा !

भाषा संवाद, कलाकृती ,नाटक ,चित्रपट ,साहित्य  आणि संस्कृती च दर्शन करते  आणि तेव्हाच तिचा प्रसार होतो !

🚩🚩 मराठी भाषा चिरायू होवो ! 🙏🚩🚩

 विद्या मनस्वी
२७ फेब्रुवारी २०२०

मराठी भाषा दिन ३

*मातृभाषेला आपण कुठवर गृहीत धरणार..*

आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी हा संवाद होतोय. माऊली ज्ञानेश्वरांपासूनची साहित्य परंपरा असलेल्या आपल्या मायमराठीच्या आपण कायमच ऋणात आहोत. तिचं उतराई होण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत राहुया. तुमच्यासोबतचा हा संवाद तुमच्या माध्यमातून अनेकांसोबत होणारा संवाद आहे. आजचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय, पाहताय.. ह्या पोर्टलवर तुम्ही आहात. ह्याचाच अर्थ तुम्हाला आपल्या भाषेविषयी, आजच्या दिवसाविषयी प्रेम आणि आदराची भावना आहे. म्हणूनच तुमच्याशी हा संवाद, जो तुम्हीही, इतरांसोबत करायचा आहे.

२७ फेब्रुवारी हा खरंच मराठी राजभाषा दिवस आहे की, केवळ एक सरकारी सोपस्कार?.. हो, सोपस्कारच.. कारण ज्या पद्धतीने प्रतिवर्षी तो राबवला जातो. त्याला अभियान वगैरे तर अजिबातच म्हणवत नाही. मग त्यातला मराठी 'अभिमान' वगैरे फार दूरची गोष्ट. १ जुलैला दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात नवीन रोप लावण्याच्या प्रघाताप्रमाणेच २७ फेब्रुवारी ह्या राजभाषा दिवसाची अवस्था झालेली आहे.

माझा शिक्षकांवर रोष नाहीय. पण, कित्येक शिक्षकांनाच हा दिवस का, कुणामुळे आणि कशासाठी साजरा केला जातो, हेच माहीत नसते. पुढे मग कुसुमाग्रज कोण, त्यांचं नाव काय, त्यांचं साहित्य, एकूण योगदान ह्याबद्दल तर बोलायचंच नाही. मागच्याच वर्षी मी व्याख्यानाला गेलो होतो एका महाविद्यालयात. तिथे कुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर यांची जयंती एकाच दिवशी असण्याचा आविष्कार तेथील प्राध्यापिकेने केला होता. प्राध्यापिका विज्ञानाची असली तरी असा शोध लावावा, हे नक्कीच अभिप्रेत नव्हते. माझ्या सवयीनुसार मी त्यांना थांबवले. चूक सांगितली. ती सांगताना वातावरण गंभीर न होऊ देता, ते हलकंफुलकं होईल, ह्याची काळजी घेतली. तरीही ते त्यांच्याच विद्यार्थ्यांसमोर त्यांना कमीपणा वगैरे आला. पण, माझे भाषाविषयक सूत्र काही मी सोडले नाही.

शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ सरकारी आदेशाचं पालन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. साजरा होण्यापेक्षा तो दिवस पाळला जातो, म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही. किंबहुना तेच अधिक सयुक्तिक ठरेल. इतपत वाईट अवस्था आहे. ह्याला काही मोजके अपवाद असू शकतील. पण, त्या अपवादांची संख्या फारशी समाधानकारक नक्कीच नाही. कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्याने ह्या निमित्ताने अनेकदा शाळा महाविद्यालयांना भेट देण्याचा संबंध येतो. दहा कॉलेजांमागे एखाद ठिकाणी अरविंद दोडे, प्रा. दीपक पवार, प्रा. नितीन आरेकरांसारखा मराठी भाषेविषयी आस्था असणारा कुणी अभ्यासू प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवून भाषेचा लळा लावणार्‍या प्रा. प्रज्ञा दया पवार, प्रा. वीणा सानेकर, प्रा. दीपा ठाणेकर, प्रा. वृषाली विनायक क्वचितच गवसतात. प्रा. दीपक पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे. त्यांची भाषेविषयीची रुची अभिमानास्पद आहे. अर्थात ही नावे प्रातिनिधिक असून ती केवळ उदाहरण म्हणून दिली आहेत.. प्रमाण सांगण्यासाठीच त्यांचे प्रयोजन आहे. महाराष्ट्रात अनेक सजग शिक्षक माझ्याही परिचयाचे आहेत. इथे सर्वांचीच नावे लिहिण्याला मर्यादा आहेत. मूळ मुद्दा हाच की, भाषेविषयी आस्था असणार्‍या शिक्षकांचे प्रमाणही यथातथाच आहे.

बरं, जे शिक्षक खरंच उत्सुक असतात, सक्षम असतात, त्यांना अनेकदा सरकारी उपक्रमांना (जनगणना, निवडणुका वगैरे) जुंपले जाते. त्याव्यतिरिक्त कार्यालयीन अथवा वैयक्तिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या बाबींकडेही गांभीर्याने पहायला हवे आहे. असे अपवाद बाजूला सारले तरी एरव्ही मात्र शाळामहाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाविषयीचा उत्साह आणि भाषेविषयीची उदासीनता असंच चित्र सर्रासपणे पहायला मिळतं. शिक्षकांमधली ही उदासीनता हीच आपल्या भाषेपुढील मुख्य अडचण आहे. उदाहरणासाठी पुन्हा पु.ल. आठवतीलच. पण, त्यांनी रेखाटलेले चितळे मास्तर मराठी भाषेला हवेच आहेत. स्वतःमध्ये भाषेविषयीची वत्सलता जपणारी शिक्षिका, भाषेकडे जबाबदारीने पाहणारा शिक्षकच पुढच्या पिढीकडे मराठीची पालखी नेऊ शकेल. असे शिक्षक, शिक्षिका महाराष्ट्रात आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकरवी भाषाविषयक उपक्रमांचे, कार्यशाळांचे आयोजन करवले पाहिजे.

वृक्षारोपण, भाषादिवस यांचे महत्त्व सणांपुरते मर्यादित रहायला नकोय. मी तुलना करणार नाहीय. पण, व्हेलेंटाईन ह्या एका दिवसासाठी सात दिवस आधीपासून वेध सुरू होऊन सात दिवस नंतरपर्यंत ते नेले जाऊन व्हेलेंटाईन पंधरवडा साजरा केला जाऊ शकतो. तर भाषा दिवसाचा पंधरवडा का होऊ शकत नाही? तरुणाईमध्ये ह्याविषयीची जागरुकता निर्माण करणे, ही खरी गरज आहे. भाषा टिकवण्यासाठी काय करावे, ह्या उपाययोजनांमध्ये तसे कुणाला फारसे स्वारस्य नसते. मात्र आहे ती भाषा, बोली लिहिण्याची तरी किमान काळजी आपण घेतो आहोत का?

आता आपण किमान काय करायला हवं, ह्या विषयी एक मुद्दा. २०२० सालात आज आपण आहोत. प्रगत तंत्रज्ञान, नवनवे शोध असं सगळं वातावरण आपल्या अवतीभवती आहे. वीसएक वर्षांपूर्वी मराठी लिहिण्यासाठी हस्तलिखिता व्यतिरिक्त टाईपरायटर, कॉम्प्युटर यावर मराठी लेखनासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत असे. आता मात्र आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईलमध्ये आपल्याला मराठी लेखन सहज उपलब्ध आहे. समाजमाध्यमे आज प्रत्येक भाषेची झाली आहेत, तशी ती मराठी देखील झाली आहेत. भाषेसाठीची लेखन साधने सुलभ सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. पण, ह्या सोपेपणात आपण भाषा जपण्यात यशस्वी होतो आहोत का?

ह्या प्रश्नाचं उत्तर खरंतर १००% होय, असंच यायला हवं. पण, ते तसं होत नाही. आपली भाषा, मातृभाषा म्हणून आपण तिला अगदी गृहीत धरतो. इतर कोणतीही भाषा लिहीत किंवा बोलत असताना त्या भाषेतील शब्दांची आपण किती काळजी घेत असतो? खरंतर ती काळजी आपल्याला कुणी चुकीचं म्हणू नये, ह्यासाठीची असते. पण, तीच काळजी आपण आपल्या मातृभाषेची घेत नाही. इतर कोणत्याही भाषेपेक्षा वेलांटी, उकार, काना, मात्रा यांचं सौंदर्य मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या भाषांना लाभलेलं आहे. केसांचा भांग कधी बिघडू नये, ह्याची काळजी घेणारे आपण, भाषेच्या सौंदर्याच्या बाबतीत खरंच दक्ष असतो का? आपण आपल्या दिसण्याची जितकी काळजी घेतो, तशीच आपल्या भाषेचीही काळजी घेतलीच पाहिजे. मग ती काळजी लिहिण्यातली असो की बोलण्यातली.. आपण दक्ष असलंच पाहिजे.

हिंदीपेक्षा तुलनेने आपल्या मराठी भाषेचे व्याकरण अधिक बारकावे असणारे आहे. एवढ्या कमी वेळात, कामी शब्दात फार उदाहरणे देता येणार नाहीत, तरीही हे एक उदाहरण.. 'पाणी' हा शब्द आपल्या नित्याच्या वापरातला आहे. आता त्यातही 'पानी' की 'पाणी' ह्यावरून होणारे उच्चारवाद बाजूला ठेवूया. कोणत्याही शुद्धतेला होणारा विरोध ही खरेतर शुद्धतेपासून काढलेली पळवाटच असते. केवळ शुद्धतेलाच नव्हे तर तो अभ्यासालाही केलेला विरोध असतो. हे माझे अगदी ठाम मत आहे. असो.. पण, ह्या 'पाणी' मधील 'णी' ची वेलांटी 'दीर्घ' म्हणजे दुसरी आहे. ती जर र्हस्व म्हणजेच पहिली दिली, तर शब्दाचा अर्थच बदलतो. 'पाणी' ऐवजी 'पाणि', असं लिहिलं तर त्या शब्दाचा अर्थ 'हात' असा होतो. आता लक्षात घ्या अशा किती शब्दांचे उकार, वेलांटी आपण चुकवत असतो. जे थोड्याशा प्रयत्नाने सुधारता येऊ शकतात.

ह्या लेखात अनेक मुद्दे राहून गेले आहेत, ह्याची मला नम्र जाणीव आहे. लेख संपवतानाही एक मुद्दा स्मरतो आहे. 'सुलेखनाचा' ह्या बाबतीत, अच्युत पालव, निलेश गायधनी, नंदू गवांदे, संजय शिंदे ह्या आणि अशा अनेक सुलेखनकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे. तितकेच जबाबदारीचे स्थान प्रकाशकांचे आहे. त्यांनीही साहित्य प्रकाशित करताना मर्यादा, दर्जा यांचा विचार करायला हवा आहे. वृत्तपत्र आणि इलेक्ट्रानिक मिडिया यांना तर मराठी भाषेची कोणतीही काळजी नसल्याचे चित्र पहायला मिळते आहे.

भाषा सहज उपलब्ध आहे, पण तिच्यातली सुलभता आपण शोधून तिचं सौंदर्य जपलं पाहिजे. इंग्रजीतलं मराठी लिहिणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. केवळ एका क्लिकवर इंग्रजीसारखं टाईप करून मराठी अक्षरे उमटण्याची सुविधा उपलब्ध असताना आपल्याच तंत्रआलस्याने आपण एकप्रकारे भाषेची गळचेपीच तर करत असतो. विशेषतः लिहित्या हातांनी, म्हणजेच लेखक, कवींनी ह्या बाबत जागरूक राहून अत्यंत जबाबदारीने आपलं लेखन केलं पाहिजे. शुद्धलेखनापासून तर फारकत घेऊच नये. कळत नाही, वेळ नाही अशी क्षुल्लक कारणे देताना आपण स्वतःला मराठीचे लेखक म्हणवून घेत आहोत, ही बाब ध्यानात असू द्यावी.

राजभाषा दिनाच्या निमित्ताने किमान एवढी काळजी घेण्याचा संकल्प केला, तरी माय मराठीच्या आपल्यावरील ऋणांचे आपण थोडे तरी उतराई होऊ शकू..

*- जनार्दन केशव*

तळटीप : *कृपया प्रतिक्रिया देताना इंग्रजीतली मराठी लिहू नका.. आणि किमान आज तरी इमोजी, जीआयएफ, फोटो यांचा वापर करू नका किंवा वापर केलात तरी सोबतीने मराठीतूनच प्रतिक्रिया लिहा, ही विनंती.

मराठी भाषा दिन २

रोज सकाळ-संध्याकाळ Good Morning आणि Good Evening चे संदेश पाठविणारे, प्रत्येक वाक्यात wow, cool, great असे शब्द मिरवणारे जेव्हा २७ फेब्रुवारीला "गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा" किंवा "एवढ्या जगात माय मानतो मराठी" असे संदेश पाठवतात तेव्हा अगदी मनापासून मायबोलीत शिव्या हासडण्याचे मन करते. 
पण ठीके... निदान आजच्या दिवशी तरी हे तथाकथित ( so called ) मराठीजन "माज" दाखवतात हे हि नसे थोडके... 
आपल्या देशात इंग्रजी म्हणजे आई आणि मातृभाषा म्हणजे सावत्र आई असा समज रूढ आहे... 
उगीच प्रत्येक वाक्यात wow, cool, great असे शब्द वापरून किंवा जड जड इंग्रजी शब्द वापरून आम्ही किती सुशिक्षित किंवा किती पुढारलो आहोत हे दाखविण्याचा मूर्खपणा जगाला दाखवू नका...   
इंग्रजी हि एक भाषा आहे अन तिला त्याइतकेच महत्व द्या. अगदीच गरज असेल तिथेच तिचा "वापर" करा... 

असो... असंही पु.ल. म्हणून गेलेत... "आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल."

राजभाषा - ज्ञानभाषा मराठीदिनाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ..
कुसुमाग्रज यांना मानाचा मुजरा...!!!
थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे पुण्यस्मरण ...!!!

-: मनु :- 
२७ फेब्रुवारी २०२०

मराठी भाषा दिन १

" मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती 

"मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन याच्या दिवशी , मी सर्व मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती करीत आहे .

मराठी भाषिकांना  हे बहुतेक सांगावे लागू नये कि " मराठी " हि तुमची / मराठी भाषिकांची मातृभाषा आहे . 

" मराठी संभाषणात ( अव्यावसायिक ) , लिखाणात इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर करणे टाळावे . शक्यतो शुद्ध मराठीत संभाषण करावं . मराठीवर इंग्रजीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण रोखणे अत्यंत निकडीचे आहे .

मराठी भाषा स्वतःचे अस्तित्व गमावत चालली आहे . मराठी भाषेत शब्द , वाक्ये , म्हणी , वाक् प्रचार यांची अजिबात वानवा नाही .इतर व्यक्ती साजरा करतात म्हणून " मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन " इंग्रजीत शुभेच्छा देऊन साजरा करू नकात .

उठा , तुम्ही मराठी भाषिक आहात . मराठीत बोला , मराठीत लिहा , मराठीला " मराठी भाषा " म्हणून मानाने जगू द्या .जर तुम्हाला मराठी शब्द माहित नसतील तर मला संपर्क करा , माझ्याकडे अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द तयार आहेत .

हे मी फक्त लोका सांगे ब्रम्ह ज्ञान , स्वतः मात्र कोरडे पाषाण .... या म्हणीप्रमाणे वागत नाही . मी स्वतः गेली अंदाजे ५ वर्षे , अव्यावसायिक मराठी संभाषणादरम्यान इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी म्हणी , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर कटाक्षाने टाळतो .

सत्यजित अ शाह - ठाणे - ०९८२११५०८५८ , satyajitshah64@gmail.com

http://fightofacommonman.blogspot.in/

Wednesday, February 26, 2020

स्वा सावरकर पुण्यतिथी

तात्या गेले !

अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की, 
                               
 की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
 लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने|
 जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे
 बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे||

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला, त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, " देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !" वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची  स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची ज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की ,”१० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल.! “ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते. 

अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ' मोरिया ' बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच 'भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी' असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ‘आझाद हिंद’ चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे 'पाया’ आणि सुभाषचंद्र हे 'कळस' आहेत! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें ,पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले. 

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत “हे कृष्ण, हे श्याम” असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली. तुकोबा "आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा!" असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.

धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम । 
कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम 

✍🏻आचार्य अत्रे.
 'दैनिक मराठा'
दिनांक २७ मार्च १९६६
 


#स्वातंत्र्यवीर_सावरकर #आत्मार्पण_दिन

Wednesday, June 19, 2019

नव्या मराठी संख्या वाचन पद्धतीवर आक्षेप

महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे ह्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'नव्या मराठी संख्या वाचनाच्या पद्धतीवर' आक्षेप घेत, ह्या तकलादू बदलाबद्दल मुद्देसूद मांडणी केली आहे. नक्की वाचा...  

मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो,  विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ञांनी दिल्याचे समजते. या निर्णयाची समाजात कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली सदर चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील  अधिकारी सहभागी होते याची माहिती प्रसिद्ध झालेली  नाहि.  संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर  किंवा ३२ बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन,  सत्तर तीन किंवा तीस दोन  असे  करावे हे इयत्ता दुसरीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. 

जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही हे या बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे आणि समर्पक नाही. महाराष्ट्र शासनाने पुढील मुद्यांचा विचार करून सदर नवी पद्धत तातडीने मागे घ्यावी अशी मा
गणी मी संबंधित शासकीय यंत्रणेकडे केली आहे. माझ्या मागणीच्या पुष्ट्यर्थ मी पुढील मुद्दे मांडत आहे.

मुद्दा क्र. १ - जोडाक्षरे नको व जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील   पानावर ज्या टिपणात हे सुचवले आहे त्या  टिपणातच भरपूर जोडाक्षरे आहेत.  महाराष्ट्र, राज,  मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,  अभ्यासक्रम, गुणोत्तर, संख्या, स्पर्शिका, वर्तुळ, क्रम, प्रश्न, उत्तर, चक्रीय चौकोन, वक्रपृष्ठभाग, वक्रपृष्ठफळ, क्षेत्रफळ, त्रिकोणमिती या गणिताशी संबंधित सर्व शब्दांमध्ये भरपूर जोडाक्षरे आहेत. केवळ गणित नव्हे तर सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मिळून हजारो जोडाक्षरे आहेत.  ती सर्व जोडाक्षरे उच्चारण्याचे शिक्षण सर्व शाळांमध्ये देतात आणि बहुसंख्य विद्यार्थी त्या सर्व जोडाक्षरांचा उच्चार व्यवस्थित करतात. जोडाक्षरे हा सर्वच भारतीय  भाषांचा आत्मा आहे. जोडाक्षरे हद्दपार करायची असतील तर सर्व भारतीय भाषांमधून शिक्षणच नव्हे तर भारतीय भाषांमधून सर्व व्यवहार  थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातून भारतीय  भाषा हद्दपार करण्याचा निर्णय अजून तरी महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने घेतलेला   नाही. असा दुर्दैवी निर्णय घेतल्यानंतर आपोआपच संख्या वाचनातील जोडाक्षरे हद्दपार होतील.

मुद्दा क्र. २ -  संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे.  असे असताना जोडाक्षरे अवघड जातात या किंचितही संयुक्तिक नसलेल्या युक्तिवादाच्या आधारे संख्या वाचनातून जोडाक्षरे वगळण्याचा निर्णय सर्वथैव अयोग्य आहे.

मुद्दा क्र. ३ - संख्यावाचन सोपे करावे असा  उपरोक्त  प्रस्तावित बदलांचा हेतू आहे असे सदर बदल सुचवत असलेल्या इ. २ रीच्या पाठ्यपुस्तकातील टिपणात नमूद  आहे.  प्रत्यक्षात, या प्रस्तावित बदलानुसार संख्यावाचन अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघडच  होणार  आहे.  ६३ ला साठ तीन  म्हणायचे  असेल तर ६३४५ चे  वाचन कसे करायचे ?  साठ तीन चाळीस पाच  की सहा हजार तीनशे चाळीस पाच  ?  याचा  उलगडा सदर टिपणात नाही. 

मुद्दा क्र. ४ - जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील   पानावर ज्या टिपणात अशी सुचवलेली पद्धत केवळ पन्नास ( याला काय म्हणावे ? कारण या पन्नास मध्ये देखील जोडाक्षर आहे.) या संख्येपर्यंतच वापरावी असे म्हणले आहे, पण  प्रस्तावित संख्या वाचन पद्धत सुचवण्यासाठी ६३ त्रेसष्ठ,  ७३  त्र्याहत्तर   यातील  उच्चार अवघड जातात अशी अडचण  मांडली आहे. 

मुद्दा क्र. ५ - सुचवलेली नवी पद्धत अधिक  गुंतागुंतीची, अवघड व अधिक  वेळखाऊ  आहे.  ११ +१/४ सव्वा अकराचे वाचन  कसे करावे  याबाबत  काहीही  सुचवलेले नाही. त्याचे  शालेतील कोवळ्या, अजाण  बालकांनी  ११.२५  हे रूपांतर करून मग त्याचे वाचन दहा एक पूर्णांक वीस पाच  करावे असे गणित  अभ्यास  मंडळाचे  मत  आहे  का ?

मुद्दा क्र. ६ - ९. ३१४५६ या  संख्येचे वाचन  पुढील  वरच्याइयत्तेतील  मुलांनी कसे करावे याबाबात गणित  गणित  अभ्यास  मंडळाचे  काय मत  आहे ? 

मुद्दा क्र. ७ - महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ या दिवशी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या शासन निर्णयात मराठी वर्ण चिन्हे, मराठी अक्षरे, मराठी जोडाक्षरे, मराठी वाक्यरचना, मराठी अंक,  अंकातील मराठी संख्या,  अक्षरी मराठी संख्या  आणि या दोन्ही प्रकारे संख्या कागदावर कशा लिहाव्यात किंवा उमटवाव्यात याविषयी प्रत्यक्ष उदाहरणे  देऊन सविस्तर आणि पुरेसे मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र या शासनाच्या शासन निर्णयात यात नमूद केलेल्या प्रकारे संख्या वाचन न करता अन्य पद्धतीने करावे असा निर्णय घेण्याचा सल्ला देण्याबाबतचे अधिकार गणित अभ्यास मंडळाला आहेत का ? याचा प्राथमिक आढावा घेतला असता उपरोक्त गणित अभ्यास मंडळाला असा अधिकार दिलेला नसावा असे अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.                                                                                    

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता मराठी संख्यांचे वाचन करण्याची नवी, अशास्त्रीय पद्धत केवळ अनुकरणाच्या हौसेने   आणि  “  आली लहर, केला कहर “ या तत्वावर सुचवलेली  असावी,  असे मला वाटते.

शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ या दिवशीच्या शासन निर्णयाशी पूर्णपणे विसंगत आणि संख्या वाचन   आत्ताच्या पद्धतीपेक्षा प्रचंड प्रमाणात अधिक गुंतागुंतीचे करणारी ही नवीन पद्धत पाठ्यपुस्तकातून काढून टाकावी आणि ती वापरण्याचा जो सल्ला शिक्षकांना दिला आहे तो स्वतंत्र परिपत्रकाद्वारे मागे घ्यावा अशी मागणी मी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडे केली आहे.

मुद्दा क्र. ८ - जोडाक्षरे हे मराठी तसेच सर्व भारतीय  भाषांचे महत्वाचे वैशिष्ट्य असून जगातील इतर  भाषा आणि लिप्यांच्या तुलनेत  जोडाक्षरांमुळेच मराठी तसेच सर्व भारतीय भाषांतून अधिक वेगाने लेखन, वाचन, बोलणे करता येते. जोडाक्षरे हा  भारतीय  भाषाच्या  तसेच मराठीच्या मूलभूत रचनेशी जोडलेले जगात दुर्मीळ असे एकमेव वैशिष्ट्य  आहे.  महाराष्ट्र शासनाच्या गणित अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी नेमलेल्या  गणित  अभ्यास मंडळाला भारतीय भाषांच्या आणि विशेषत:  मराठीच्या मूलभूत  रचनेतच  बदल करण्याचा अधिकार आहे  का ?  या मुद्द्यावर देखील  शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही  मी शासनाकडे  केली आहे. गणित अभ्यास मंडळाची नेमणूक करताना त्यांनी पाठ्यपुस्तकाचा  आराखडा अथवा संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे प्रारूप  तयार करून  देताना भाषेच्या  मूलभूत  रचनेतील बदल भाषा तज्ज्ञांशी विचारविनिमय  करून  समाविष्ट केले  की भाषा तज्ज्ञांशी  विचारविनिमय न करता केले आहेत याचा आढावा  शासनाने घ्यावा  आणि मगच व्यपक विचरविनिमय  झाल्यावरच इतका मूलभूत बदल लागू  करावा, अशी मागणी मी  शासनाकडे  केली आहे. भाषा तज्ज्ञांशी असा औपचारिक  विचारविनिमय  न करताच इतका मूलभूत बदल केला असेल तर तो बदल तातडीने स्थगित कारावा  आणि या संबंधीचा  आशय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे परिपत्रक  ( शुद्धिपत्रक ) तातडीने काढावे, अशी मागणीही मी शासनाकडे केली  आहे. 

वर उल्लेखित मुद्द्यांचा विचार करून अधिकाधिक विद्यार्थी, पालक, समाजसेवक, शिक्षक, विचारवंत, मराठी लेखक, गणिताचे शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत सदर नवीन पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे शिक्षण संचालकांकडे समक्ष पत्राने करावी असे मी सर्वांना आवाहन करतो.

| शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे.

Sunday, April 14, 2019

पूर्वी बाई ठेवणे

पूर्वी बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते. आणि त्यातच  या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात.

मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे.

जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे. कारण घरात पुरुषाचा धाक असे.

बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच. तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात. पण वाड्याबाहेरच्य माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे.

वाड्यातला वारा आणि अंधार पिवून सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखांदे मुल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर “कडू बियाणे” म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई.

माझ्या ऒळखीतली आज्जी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेवून सांगायची की, “तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “कडू बियाणे” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.

त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.

बाकी, 'बाई वाड्यावर या' म्हणून आज नाचणाऱ्या आताच्या मूर्ख पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधीच नाही   समजणार 
                                                       -ज्ञानेश्वर पोळ