Monday, March 21, 2011

मराठी हास्यकट्टा 27

मराठी मुलाचे मुलीला प्रपोज ..

मुलगा : शब्द तुझे, गीत माझे....
जीवन गाणे गाऊ का ?

मुलगी : गाल तुझे, हात माझे....
कानाखाली लाऊ का ?

*********************
एक बाई दुसर्‍या बाईला विचारले
पहिली बाई : तुम्ही गहू कसा आणला?
दुसरी बाई : पिशवीतून आणला.
पहिलीबाई : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दुसरी बाई : चुलत भावाने आणला.

*********************

एकदा एक माणूस समुद्रा काठी उभा असतो.
एक प्रचंड मोठी लाट येते आणि त्या माणसाला म्हणते - चल माझ्या बरोबर....
आणि तो जातो.......का ?
कारण....पाण्याला कधी नाही म्हणू नये.

*********************
एकदा एक तरुण हॉटेल मध्ये जातो. त्याला तिथला वेटर विचारतो............. 'साहेब, काय आणू ? साधा डोसा ,मसाला डोसा, पेपर डोसा....? गृहस्त : सध्या तरी मला फक्त आडोसा हवाय, माझ्या दोन मैत्रिणी एकदम मला शोधताहेत!
*********************
पुणेरी झटका
एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि
एका पुणेरी माणसाला विचरतो - अहो इथे शनिवार वाडा कुठे येतो ?
पुणेरी माणूस - हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही, तुम्हालाच तिथे जावे लागेल.

*********************

बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.
साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही.
बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय.. काहीच कळत नाहीय.

*********************

बाबा-आजचा पेपर कसा सोडवलास ?
मुलगा-पहिला प्रश्न राहून गेला,
तिसरा प्रश्न येत नव्हता,
चौथा प्रश्न सोडवायचा विसरून गेला,
पाचवा प्रश्न दिसलाच नाही...म्हणून तो पण राहिला.
... ......बाबा रागाने...,
आणि प्रश्न दुसरा ???
मुलगा-बास......फ़क्त तोच चुकला !!!!!

*********************
एका नेपाळी माणसावर यक्ष प्रसन्न झाला.
यक्ष : सांग बाळा...कुठच्याही तीन इच्छा सांग.
नेपाळी : एक प्रचंड मोठा बंगला हवा.
यक्ष : तथास्तु.
नेपाळी : त्यात एक खूप-खूप श्रीमंत माणूस राहावा.
...नेपाळी : आणि त्या बंगल्याचा गुरखा म्हणून फक्त माझी नेमणूक व्हावी.

*********************
पु . लं. देशपांडे यांचे विनोदी किस्से

त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

*********************
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."
*********************

0 comments: