Thursday, May 19, 2011

मराठी हास्यकट्टा 23

आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..
आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..
मला जावू द्याना घरी
आता वाजले कि बारा . :D :D

*******************
बंटी : दादा मी खुप अभ्यास केला पण मला फक्त ८०% च मिळाले.
दादा : ८०% काय कमी झाले, त्यात २ मुल ४० % -४० % टक्के घेऊन खुशाल पास झाली असती !!!

*******************
मराठी भाषा फारच अवघड आहे.

गाड़ी बिघडली असेल तर म्हणतात गाड़ी " बंद " आहे .

आणि
...
पोरगी बिघडली असेल तर म्हणतात पोरगी " चालू " आहे .

*******************

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’

*******************
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

*******************
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
*******************
पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग.

पुलं तेव्हा चौदा पंधरा वर्षांचे होते. लोकमान्य सेवा संघात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर होणा-या प्रश्नोत्तरात शाळकरी पुरुषोत्तमनं प्रश्न विचारला. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती. तर पुरुषोत्तमनं तात्यासाहेबांना विचारलं की फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये ?
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं,...
‘ स्वीकारू नये, पण राबवावं. ’
यावर पुरुषोत्तम म्हणाला, मला आपलं उत्तर कळलं नाही.
त्यावर तात्यासाहेब म्हणाले, ‘ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा. ’
त्यावर पुरुषोत्तमांनी तात्काळ प्रश्न विचारला
‘ पुण्याला सध्या अंजिरांचा काय भाव आहे ?’
*******************

हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘ सफरचंद ‘ म्हणावं. ‘
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘ हवाई सुंदरी ‘ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ‘ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ‘ म्हणतो, तर वैमानिकाला ‘ उडपी ‘ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ‘ किंवा ‘ राष्ट्रपिता ‘ म्हणतात

*******************
गंपू आणि झंपू स्टेशनला येतात, तेवढ्यात ट्रेन सुटते.
दोघेही ट्रेनच्या मागे पळू लागतात.
शेवटी गंपू कसाबसा गाडीत चढतो.
गाडीतले लोक गंपूला म्हणतात, 'शाब्बास! शेवटी तू ट्रेन पकडलीसच.'
त्यावर गंपू उत्तरतो, 'शाब्बास काय? ट्रेन झंपूला पकडायची होती, मी तर सोडायला आलो होतो!'

*******************
पिंट्या : ओ बाबा... ओ बाबा...ओ बाबा

बाबा : काय रे पिंट्या?

पिंट्या : एका गंभीर विषयावर बोलायचंय.
...
बाबा : शाळेत काही झालं का?

पिंट्या (गंभीरपणे): नाही, त्याचं काय आहे ना... तुमच्या बायकोशी यापुढे एडजस्ट करणं जरा कठीण आहे आता...
त्यामुळे मला माझी स्वत:ची बायको आणून द्याल तर बरं होईल म्हणतो...

*******************
बसमध्ये सुरेश सारखा त्या मुलीशी बोलण्याचा व काही ओळख निघते का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता.

“तुम्हाला कुठं तरी पाहिलयं, पण नक्की आठवत नाही…..आपले वडील काय करतात ?

“ते डॉक्टर आहेत”,
...
वैतागून मुलगी म्हणाली.

“तरीच………..”,

सुरेशचा धीर वाढला, “…..आता मला आठवल,

मी एकदा आजारीपडलो, तेव्हा त्यांनी औषध दिलं होतं”.

“शक्य आहे”,

ती मुलगी म्हणाली,”

ते जनावरांचे डॉक्टर आहेत”

*******************


0 comments: