आयुष्य म्हणजे काय असत ...
-- विद्या
आयुष्याला एक गूढ रहस्य म्हणु का न सुटणार कोड म्हणु ..
आयुष्य जन्म मृत्यू मधील जणू एक प्रवास असतो ..
आयुष्य खूप सुंदर आहे ते हसत हसत जगावे कि रडत रडत ते आपणच ठरवायचं असत ...
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाच सोन करायचा असत .
भगवद्गीता..
न जायते म्रियते वा कदाचिन्- नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे॥
-आत्मा चा जन्म होत नाही आणि मृत्यू ही होत नहीं !! शरीर नष्ट झालं तरी आत्मा अमर असतो !!
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२
-ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो.
देवाच दर्शन न घडता देखील त्याच्यावर आपली श्रद्धा असते ..त्याच अस्तित्व म्हणजे जीवन आहे .
हवा दिसत नसली तरी त्याची जाणीव होते ना..मग ज्या व्यक्ती बरोबर आयुष्याचे चार क्षण व्यतीत केलेले असतात त्याच मृत्यु नंतरच अस्तित्व आपण का नाकारतो ...जन्म मृत्यू हा आयुष्याचा लपंडाव आहे ...त्याला मोक्ष शिवाय अंत नाही .
ह्या धावपळीच्या जीवनात माणूस आयुष्य जगायचं विसरून गेला आहे ..फक्त पैश्या च्या मागे असतो ...भले तो चांगल्या अथवा वाईट मार्ग ने मिळो. मृत्यू हे आयुष्यातलं कटू सत्य आहे ..शेवटी जगात कोणाचीच सोबत कोणाला पुरत नसते ...गोड शब्दात बोलायचं झालं तर गुण्या गोविंदाने राहा आणि ह्या सृष्टीच नंदनवन कराव !!
सौजन्य : http://janak-thus-speaks.blogspot.com/2009/03/chapter-2-verse-20-of-72.html
http://www.bhagavad-gita.org/Gita/verse-02-22.html
http://www.bhagavad-gita.org/Gita/verse-02-20.html
http://www.misalpav.com/node/17344
तस
बघायला गेला तर मृत्यु सारखी सुंदर गोष्ट नाही पण ... जन्माला आलोय म्हणजे
कधी तरी येणारच आहे ... पण शेवट मात्र समाधानी व्हावा... झुरून नाही
जगण्यामुळे ..1-7-2013
0 comments:
Post a Comment