Wednesday, September 21, 2011

मराठी हास्यकट्टा 12

पुण्यातल्या एका कॉलेजचा पहिला दिवस.
मुलगा : हॅल्लो... तुझं नाव काय गं?
मुलगी : सगळेजण मला ताई म्हणतात.
मुलगा : अरे वा... मला पण
सगळे भावोजी म्हणून हाक मारतात.
October 3
*************

चम्या : हमारे पिताजी इतने लंबे है कि खडे खडे चलता पंखा रोख देते है .
.
.
.

बंडू : हमारे वडील भी लम्बेच आहे पण ऐसा आगाउपणा नही करते.

*****************
म्हणी पूर्ण करा ..

प्रश्न:- बोले तैसा चाले......
उत्तर:- त्याची ओढावी पाऊले.

... प्रश्न :- लौकर निजे लौकर उठे त्यास.......
उत्तर:- टी. व्ही. प्रोग्राम पाहणे जमत नसे.

प्रश्न :- जो स्वयेची कष्टता गेला......
उत्तर - तो कष्ट करूनच मेला.

********
एक अविवाहित पुरुष फेसबुक वर स्टेटस अपडेट करतो. "बायको पाहिजे"
२ मुली लायिक करतात.
अणि..५५० पुरुष कमेन्ट करतात....
...
...
...
...
...
...

''माझी घेउन जा''
:D :D
October 2 at 12:15pm

***********
डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय.
कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.

***********
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

***********
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

***********
मुलांना मुलींबद्दल समजायला अवघड असणारी गोष्ट कोणती?
" आयला...हसून पाहत होती..की पाहून हसत होती...?? " :O :O
September 20 at 7:51pm

0 comments: