उखाणे:
१. "समोरच्या कोनाड्यात ठेवलेत गहू
लग्न नाही झाले तर नाव कोणाचे घेऊ?'
२. कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन
३. आकाशाच्या निलिम्यावर इंद्रधनुष्याचा पट्टा
...चे नाव घेते पुरे करा बाई थट्टा
४. वर्षा ऋतूत आकाशात लकाकतात विजा
...च्यासह केली श्री सत्यनारायणाची पूजा
५. लतिकांनी भरले हिरव्या पानांचे चुडे
...चे नाव घेते मंगळागौरीपुढे
६ आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून
७ .चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा
८. समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
...करता माहेर केले मी दूर
९. अरबी समुद्रात उसळल्या लाटा
...च्या सुख-दुःखात माझाही वाटा
१० . संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!
११ . दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
१२. रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा !!!!!
१३ . संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
१४ . सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
.....मिळाली आहे मला अनुरूप
१५ . नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
१६ . दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
१७ .वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!
१८ . दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती !!!!!
१९ . जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!
२०. देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
२१ . बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!
२२ . आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!
२३. दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!
२४ . गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
२५. सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!
२६ . अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
२७ . चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
२८ . चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!
२९ . इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
३० . हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!
नवरदेवाचे उखाणे:
३१ . ...भोवती आहे सतत मैत्रिणींचा घोळका
पैठणी का शालू दिलाय ते सर्वांनी ओळखा
३२ . नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
... आहे माझी खरंच पट्टराणी
३३ . मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
....ला देतो गुलाबजामचा घास
३४. कॉम्प्युटर-मोबाईलचा उपयोग झाला छान
... आता प्रत्यक्ष गप्पा मार, ऐकतो देऊन कान
0 comments:
Post a Comment