मराठी साठी एकदा नक्की वाचा !!
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी
उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं.
आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे
एक - एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं ;
"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??.. मुठभर
मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे ?"
त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,
"यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय
फ़रक पडला ? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला."
मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने
किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती
मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल
घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?
मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने,
किती मराठी माणसे श्रीमंत होणार?
मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन
विकत घेतल्याने किती मराठीबिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल?
मी एकट्याने, विज वाचवल्याने
किती अंधारलेल्या घरांमधे प्रकाश पडेल?
मी एकट्याने, पाणी बचत केल्याने,
किती तहानलेल्या जिवांना पाणी मिळेल?
मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा खरेदी केल्याने,
किती मराठी दुकानदार [जिवघेण्या] स्पर्धेत टिकुन रहातील?
मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदीकेल्याने,
किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा होणार?
मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती
मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?
कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी.........
बाहेरच्यांना, दरमहा किमान रु. दोनशे अब्ज = २००,०००,०००,०००/-
दररोज किमान रु. सहा अब्ज, सहासष्ट कोटी, सहासष्ट लाख, सहासष्ट हजार, सहाशे,
सहासष्ट = ६,६६६,६६६,६६६.६६/-
त्यांना अहोरात्र , दर ताशी, रु. सत्तविस कोटी, सत्त्याहत्तर लाख, सत्त्याहत्तर
हजार, सातशे, सत्त्याहत्तर = २७७,७७७,७७७.७७/-
इतके माप आपणच पदरात टाकतो.
आपला पोशिंदा कसा जगेल ..? त्याच्या पदरात आपले किती पडतात..??
आपला पोशिंदा कसा जगेल? त्याच्या पदरात आपले किती पडतात?? -उत्पादन किंवा सेवा
कोणालाही विकावे , खरेदी, फ़क्त आणि फ़क्त मराठी शेतकर्याकडूनच /
व्यापार्याकडूनच करावी. -महाराष्ट्रात बाहेरचे कोट्याधिश आणि अब्जाधिश आहेत
याची लाज वाटू द्यावी. कितीही अड़चणी / प्रलोभने असली तरी मराठी माणसालाच मोठे
करावे
-सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे परन्तु तेथे अधिष्ठाण देवाचे पाहिजे.
!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!
|| मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा |
0 comments:
Post a Comment