Sunday, November 27, 2011

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?


एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?

तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची

तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?

आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे

नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून,
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून.

तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ,
ती त्याचीच बनुन जाते.

एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते.

पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं ,

पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं…………
-अनामिक 

Wednesday, November 23, 2011

आयुष्य जास्त सुंदर वाटत



आयुष्य जास्त सुंदर वाटत......
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…….

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत……….

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत………

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत………..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…..
-अनामिक

Saturday, November 19, 2011

मराठी मुलाचे मुलीला प्रपोज ..

मुलगा : शब्द तुझे, गीत माझे....
जीवन गाणे गाऊ का ?

मुलगी : गाल तुझे, हात माझे....
कानाखाली लाऊ का ?
****************

OTHER LANGUAGE JOKES !!

OTHER LANGUAGE JOKES !!

एकदा मुन्नाभाई आणि सर्किट अमेरीकेला जात असतात.
तेव्हा ते इंग्लिश ची प्रॅक्टीस कशी करतात ते पहा...

... सर्किट :-भाई!अमेरिका मे पता पुछनेका तो क्या बोलनेका?
मुन्ना :-धोबी घाट.
सर्किट :-भाय!इंग्लिश मे बोलनेका तो ?
मुन्ना :-अरे क्या तु तेरेको इतना नही आता.
सर्किट :-बोलो ना भाय.
मुन्ना :-Washington.....


सर्किट :-भाय! इधर आ कैसा बोलने का ?
मुन्ना :-Come here.
सर्किट :-फ़िर उधर जा कै्सा बोलने का?
मुन्ना :-पहले उधर जाने का और बोलनेका Come here.


सर्किट :-भाय! ये कैसे बोलने का,
"चल ए हवा आने दे "
मुन्ना :-simple hai,"Hey you move sideways,
late the Airforce come in.."


मुन्ना :-अभी मै पुछता हू तु बोल .
"ए मामू भेजा मत फ़िरा."
सर्किट :-"Mother's brother dont rotate my brain."


मुन्ना:-ये बोल,"इधर आ खजूर देता हू खर्चापानी"
सर्किट :-"खजूर याने date,"
"Come with me for a date i will pay u."

मुन्ना:-"अब ये बोल,अपून को बहोत सर्दि हो गएली है."
सर्किट :-"I got big winter in small nose..."

प्रोफ़ेसर:-"अकल बडी के भैस बडी?"
मुन्नाभाई:-"बोले तो पहले'DATE OF BIRTH'तो बता मामू...


मुन्नाभाई:-सर्किट, बोले तो ये’FORD'क्या है?
सर्किट:- क्या भाई!’FORD' गाडी है.
मुन्नाभाई:-तो फ़ीर ये 'OXFORD'क्या है?
सर्किट:-बोले तो सिंपल है भाई.
’OX’बोले तो बैल,’FORD'बोले तो गाडी.
"बैलगाडी"...........


मुन्नाभाई:-ए मामू! तु कितना पढा है ?
मामू :- B.A.
मुन्नाभाई:- साला दो अक्षर पढा है और वो भी उलटा.......

Tuesday, November 8, 2011

मराठी हास्यकट्टा 1

राजू : आई गं, आमचे गुरुजी ज्ञानेश्ववर आहेत.
आई : असे का म्हणतोस राजु?
राजू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडुन कविता पाठ करुन घेतली.

***********************
डॉ. श्रीराम लागू एका उपहारगृहात गेले. तिथे एक तरुण सुंदरी त्यांना म्हणाली, “तुम्हाला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.”
डॉ. लागू खूष होऊन म्हणाले, “तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं आहे का?”
“हो”,
... “मग त्यावेळी तुम्ही मला पाहिलं असणार”, डॉ. लागू हसले.
“असेल बाई” ती म्हणाली, “ते नाटक पहायला तुम्ही कुठं बसला होता?”
डॉ. लागू कोसळले, ते बराच वेळ उठले नाहीत.

***********************
पुणेरी झणझणीत झटका……

पुण्यात एका हॉटेलमध्ये दोन उतारू उतरले.

हॉटेलची व्यवस्था पाहून पुणेरी खवचटपणा करण्याची त्यांना लहर आली.
... …
त्यांनी मॅनेजरला विचारले, ‘‘तुमच्या गोठ्याचे भाडे किती ?’’

‘‘एका बैलाला तीनशे रुपये, दोन बैलांचे पाचशे फक्त’’ मॅनेजर म्हणाला !

***********************
शिक्षक मुलांना जीवनातील उच्च मुल्ये काय ती समजावून सांगत होते.

शेवटी त्यांनी मुलांना प्रश्न केला, "समजा, रस्त्यात गाढवाला काही लोक विनाकारण मारीत आहेत आणि मी त्यांच्यापासून गाढवाला वाचवल. तर या कृत्याला तुम्ही काय म्हणाल ?"

त्यावर बंडू तात्काळ म्हणाला, "बंधुप्रेम !"

***********************
शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
.

.
“जमिनीवर!!”

***********************

पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे …

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
मंग्या : बहिण तुझी आहे….

**************

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..
*****************
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"
*****************
नवरा- जर मला लॉटरी लागली तर काय करशिल?
बायको- अर्धे पैसे घेइन अन या नरकातुन निघुन जाईल.
.
.
.
.
.

नवरा- मला दहा रूपयाचं बक्षिस लागलय, हे पाच रूपये घे अन निघ .

*****************
एक डॉक्टर एका लहान मुलाच्या घरी जातात.
त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात.
त्यावेळी त्याचं लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात, “ती बघ तिकडे चिमणी.”
लहान मुलगा : ओ चिमणीचे मामा, खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझा.

*****************

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता, हे समजल्यावर त्याची आई संतापलीच.
त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, ”तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?”
त्यानं उत्तर दिलं, ”पाहिलं.”
...
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, ”काय पाहिलंस?”
” आपले बाबा!!!!”
*************
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास
होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू..
.
.
... ... ... .
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट
करावं लागंल.

Monday, November 7, 2011

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे.. विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व

'' एकटा पुरतो ना ?''


... आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.

मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.

अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.

अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले ,

' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता

पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''

बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,

'' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''

'' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''

'' आणि कोंबडे किती ?''

'' फक्त एक हाये ''

'' एकटा पुरतो ना ?''

उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला

पत्रकारही त्या हंशात सामील झाले.

मराठी माणसाने व्यवसाय की नोकरी करावी ??

मराठी माणसाने व्यवसाय की नोकरी करावी ?


कॅश ( Cash ) म्हणजे ' धन ' कमविण्याचा कॅश ( KASH ) मंत्र :
बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रॉप आऊट. Microsoft ची स्थापना.

लेरी अलीसन ( Larry Elloson ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रॉप आऊट. Oracle ची स्थापना.

स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कॉलेज ( Reed College Portlad ) मधून ड्रॉप आऊट. Apple ची स्थापना.

मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रॉप आऊट. Facebook ची स्थापना.

जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

वरील लोकांमधे एक गोष्ट कॉमन आहे . ती म्हणजे ही सर्व मंडळी शिक्षण अर्धवट सोडलेली आहेत . त्यातील कांही जणांकडे डिग्र्या आहेत. पण अंतिम शिक्षण पूर्ण केलेले नाही. पण आज ही सर्व मंडळी प्रसिध्दी झोतात आहेत, ती त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमुळे !

आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते आहे . हे कसे शक्य झाले ? शिक्षण पूर्ण न करता सुध्दा त्यांना हे कसे जमले ?

मराठी समाजात पहिल्या पासूनच शिक्षणाला महत्व आहे . शिक्षण क्षेत्रांत मराठी माणूस, विशेषतः मराठी स्त्रिया नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. ही खरे तर एक चांगली आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षितच बनत नाही तर हुशार, ज्ञानी, व्यवहारी बनतो. त्याला इतर अनेक कौशल्ये प्राप्त होतात असे समजले जाते. पण हल्लीचे शिक्षण हे फक्त डिग्र्या मिळविणे आणि डिग्र्यांची सर्टीफिकीटे ( Certificates) गोळा करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले असावे असे वाटू लागले आहे. कारण हल्ली शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मिळणाऱ्या डिग्र्यांना नको एवढे महत्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे जास्त डिग्र्या तो जास्त हुशार आणि ज्याच्याकडे कमी डिग्र्या तो कमी हुशार असे समीकरण बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी समाज अजूनही नोकरीच्या मानसिकतेमध्येच अडकलेला आहे. चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी डिग्र्यांची आवश्यकता ही असतेच असा समज आहे.

एखादा मनुष्य जर खरोखरच हुशार असेल पण त्याच्याकडे साधे १० वी किंवा १२ वी चे Certificate नसेल तर तो अशिक्षित आणि निर्बुध्द समजला जातो. या हिशोबाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,समर्थ रामदास ही मंडळी तर अशिक्षितच समजायला हवीत. कारण ते कोणत्या शाळेत गेल्याचे किंवा त्यांच्याकडे कोठली Certificates असल्याचे अजूनपर्यंत तरी आढळून आलेले नाही . पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ गेली शेकडो वर्षे, पिढ्यान पिढ्या अगदी आवडीने आणि भक्ती भावाने वाचले जात आहेत. त्यांची पारायणे होत आहेत . अजूनही हे ग्रंथ मराठीतील ' बेस्ट सेलर ' या कॅटेगिरीत ( Category ) मोडतात. हे कशाचे प्रतिक आहे ?

फक्त इयत्ता ४ थी पर्यंत शिकलेला आणि रेल्वेच्या डब्यात वर्तमान पत्रे टाकणारा थॉमस अल्वा एडिसन ( Thomas Alva Edison ) जगातला मोठा, नावाजलेला शास्त्रज्ञ बनला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हेन्री फोर्ड (Henry Ford ) नावाचा फिटर जगातील मोठा मोटारींचा कारखानदार बनु शकला. त्याने स्थापन केलेली फोर्ड मोटर कंपनी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल ( Automobile) कंपनी आहे. साईचीरो होंडा (Soichiro Honda) हा जपानमधील एका गॅरेज मधे काम करणारा एक साधा मोटार मेकॅनिक पण मोटारींचा कारखानदार होऊ शकला .

त्याने स्थापन केलेली होंडा मोटर कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे . इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांत या तिघांचे योगदान महत्वाचे आहे. पण या तिघांकडे इंजिनियरिंग ची कोठली डिग्री ,डिप्लोमा किंवा कोणतेही Certificate नव्हते. या सगळ्यांचा चुकून मराठी समाजात जन्म झाला असता, तर डिग्रीचे सर्टीफिकेट नाही म्हणून एडिसन शेवट पर्यंत वृत्तपत्र विक्रेता राहिला असता. तर हेनरी फोर्ड आणि होंडा हे अनुक्रमे फिटर व मेकॅनिक म्हणून राहिले असते आणि नोकरी करून निवृत्त झाले असते.

भारतातही अशी उदाहरणे आहेत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेले बेळगावचे सायकल दुकानदार लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया घातला. तर गुजरातमधील ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या फक्त मॅट्रिक पर्यंत शिकलेल्या धीरूभाई अंबानी या मुलाने रिलायन्स उद्योग समूहाचा पाया घातला. तो सुध्दा कोणत्याही डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट शिवाय.

चंद्रकांत किर्लोस्कर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की डिग्री मिळाली म्हणजे सर्व ज्ञान मिळाले असे नव्हे. डिग्रीचा अर्थ तुम्ही कांही पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि काही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खऱ्या शिक्षणाची सुरवात शाळा, कॉलेजमधून बाहेर पडल्यावरच होते.

शिक्षणाच्या क्षेत्रांत मागे पडलेल्या वरील लोकांनी अपरंपार धन संपदा कमावली. आयुष्यात तुफान प्रगती केली . त्यातील कित्येक जण तर गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले. त्यांना उद्योग व्यवसायाची कोठल्याही तऱ्हेची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. आर्थिक परिस्थिती पण कधीच धडधाकट नव्हती. मग त्यांना एवढी प्रगती करणे कसे जमले ? त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणून?त्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्चीचे होते म्हणून? का दैवाची त्यांच्यावर विशेष कृपा होती म्हणून? याचे कारण म्हणजे या सर्वांनी 'कॅश '( Cash ) म्हणजे धन कमविण्यासाठी ' कॅश ' ( KASH ) या मंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला .

या ठिकाणी ' धन ' म्हणजे फक्त पैसा अडका समजू नये. धनामध्ये पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, गौरव, मान सम्मान , समाजात आदरणीय स्थान, चांगले मित्र - सहकारी - शिक्षक - विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश होतो. धनाची किंमत फक्त पैशाने होत नसते.

तर हा ' कॅश ' ( KASH ) मंत्र काय आहे ते आता बघुया .

K - Knowledge - ज्ञान

A - Ability - क्षमता

S - Skill - कौशल्य

H - Habits - सवयी

K - Knowledge - ज्ञान :-

वरील सर्व जण, ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहोत त्या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. ज्ञान अनेक मार्गांनी मिळविता येते. शाळा कॉलेजमधील शिक्षण हा ज्ञान मिळविण्याचा एक मार्ग झाला . त्याशिवाय प्रशिक्षण ( Training ), वाचन, संशोधन, प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन, गाठी - भेटी, चर्चा , विचार -विनिमय , विचारांची देवाण घेवाण, प्रवास,प्रदर्शने, सेमिनार्स, कॉन्फरन्स या मार्गांनी पण ज्ञान मिळविता येते. आपले ज्ञान अत्याधुनिक

( Most Modern) आणि अद्ययावत ( Up to date ) असावे याची ते सतत काळजी घेत गेले. आपल्या क्षेत्रांत काय घडामोडी चालू आहेत, कोणते नवीन संशोधन होत आहे, कोणते नवीन ट्रेंड्स निर्माण होत आहेत यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. कारण शेवटी ज्ञान हेच खरे भांडवल आहे हे त्यांनी अचूक ओळखले होते .

A - Ability - क्षमता:-

आपल्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या क्षमतेबद्दल त्यांनी त्यांच्या मनात अविश्वासाची भावना कधीच येवू दिली नाही. ज्या क्षेत्रांत आपण कमी पडत आहोत त्या क्षेत्रांत इतरांची मदत घेण्यामध्ये त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. आपली क्षमता सतत कशी वाढत राहील या कडे त्यांनी लक्ष दिले. आपल्या कल्पना इतरांपेक्षा जास्त चांगल्या आहेत. आपली उत्पादने इतरांपेक्षा जास्त चांगली आहेत. आपल्या आयडियाज इंतारांपेक्षा जास्त फायदेशीर आहेत याबद्दल त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. आपल्या बरोबर आपले सहकारी, संगठना, कंपन्या, कर्मचारी यांची क्षमता कशी वाढविता येईल या विषयी ते सतत प्रयत्नशील राहिले

S - Skill - कौशल्य :-

आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याची जी प्रक्रिया असते त्याला कौशल्य म्हणतात. आपल्याकडे जर ज्ञान असेल पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग करता येत नसेल तर त्या ज्ञानाला फारसे महत्व उरत नाही. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्याचा व्यवहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग व्हावा या साठी ते सतत प्रयत्नशील राहिले. यासाठी त्यांनी अनेक निरनिराळे प्रयोग केले. अनेक नवीन मार्ग शोधून काढले. अनेक नवीन कौशल्ये प्राप्त केली आणि विकसित केली. कोठलेही नवीन कौशल्य आत्मसात करायचे म्हणजे त्यासाठी भरपूर कष्ट लागतात, मेहेनत लागते. या ठिकाणी आपण कमी पडणार नाही याची ते काळजी घेत गेले. 'Practice makes the man perfect' या म्हणीप्रमाणे ते सतत आपल्या कौशल्याचा उपयोग करीत गेले. आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या कौशल्यात सतत वाढ कशी होत राहील याची काळजी ते घेत गेले.

H - Habits - सवयी:-

आपल्या व्यवसायासाठी आवश्यक त्या सवयी त्यांनी स्वीकारल्या. तसेच आवश्यकतेनुसार या सवयींमध्ये बदल करण्याची लवचिकता त्यांनी दाखवली. या मधे त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. कित्येक वेळा त्यांना सर्वसाधारण कुटुंबाला मिळणाऱ्या साध्या-साध्या सुखांचा त्याग करावा लागला. पण या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधी तक्रार केली नाही.

शिक्षणाला किती महत्व द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या डिग्रीला किती महत्व द्यायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. याचा अर्थ शिक्षणाची कास सोडावी असा होत नाही. कारण शिक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट ला महत्व हे असतेच. पण जर शिक्षण माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान देऊन केवळ 'पुस्तक पंडित ' बनवत असेल. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून 'परीक्षार्थी' होण्याची प्रेरणा देत असेल. ज्याचा व्यवहारात फारसा उपयोग करता येत नसेल. जे माणसाचे 'व्यवहारज्ञान' न वाढविता माणसाला जास्त 'अव्यवहारी' बनवत असेल. केवळ नोकरीचे माफक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची प्रेरणा देणारे असेल. आणि ज्यामुळे प्रतिष्ठेचा खोटा तोरा निर्माण होत असेल. तर अशा शिक्षणासाठी आयुष्याची किती वर्षे आणि पैसा खर्च करायचा याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. एखादी डिग्री मिळाली म्हणजे सर्व कांही मिळाले असे समजू नये. तसेच डिग्री मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे पण समजू नये. कारण शिक्षणाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते .तसेच शिक्षण नाही किंवा पूर्ण झाले नाही म्हणून मागे पडू ही भावना पण मनातून काढून टाकायला हवी.

हल्लीचे मराठी तरुण / तरुणी पुष्कळ Talented आहेत . अनेकांनी शिक्षण क्षेत्रांत उत्तम यश मिळवले आहे. पण अजूनही बरेच जण नोकरीच्या मानसिकते मधेच अडकले आहेत. मायक्रोसोफ्ट च्या बिल गेट्स सारखे न होता बिल गेट्स च्या मायक्रोसोफ्ट मधे नोकरी करण्याची स्वप्ने बघत आहेत किंवा धन्यता मानत आहेत. आणि त्यांचे पालक पण याचा अभिमान बाळगत आहेत. आज भारताची वेगाने जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रगती चालू आहे. याचा अर्थ जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण/ तरुणींनी या संधीचा फायदा करून घेतला नाही तर त्यांच्या सारखे कर्म दरिद्री तेच ठरतील. आपल्या शिक्षणाला 'कॅश' ( KASH ) मंत्राची जोड देऊन मराठी तरुण /तरुणींनी बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग सारखे व्हायचा प्रयत्न का करू नये ?
-अनामिक

Wednesday, November 2, 2011

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज


दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा !!
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
असो आमुचा मुजरा माझा श्रीशिवरायाला!!
जय भवानी जय शिवाजी..

Tuesday, November 1, 2011

बहीण

बहीण

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. 

असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली
     कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं..
    मी असंख्य उदाहरणे पाहिलीत व ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ पाहून थक्क झालोय. पोटची पोरगी असली की आईला मुलाची काळजी नसते. तिच्या पदरात मुलाला टाकून ती निर्धास्त होते. बहीण स्वत:ची व आईची अशा दोन्ही भूमिका निभावत असते. वडील असू देत, भाऊ असू देत, काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीण. हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.
    भावाची काळजी करणे, त्याच्यासाठी नवस व उपासतापास करणे, त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते.निसर्गाचा नियम आहे, सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ!
       भाऊबीज हा तिच्या लेखी वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो. भाऊ जेवायला येणार म्हणजे काय लहानसहान गोष्ट आहे? ती आदल्या दिवशीपासून खपून त्याच्या आवडीचा मेनू करणार. अगदी आई करायची व तो तुटून पडायचा तसा. नवर्‍याने व मुलांनी त्या दिवशी मध्ये लुडबुडायचं नाही. एक दिवस एकट्या भावाचा. तो रक्षाबंधनाला येऊ शकला नाही तर त्याच्या बचावार्थ झाशीच्या राणीच्या आवेशात हीच पुढे सरसावणार.
मला या सगळ्या कोमल, हळव्या भावना कळतात. फक्त मला बहीणच नाही.

-शिरीष  कणेकर