Friday, January 13, 2012

मराठी हास्यकट्टा 44

नाद खुळा Google चा ::
सोनू -आज मला खूप मार पडला.
मोनू- का?
सोनू- शेजाऱ्यांचा मुलगा हरवला.
मोनू- मग तू काय केलं?
सोनू- मी त्यांना सांगितलं गुगलवर सर्च करा सापडला तर डाउनलोड करा!

******************

नवरा बायकोला :

ना कजरे कि धार

ना मोतियोके हार

ना कोई किया सिंगार

फिर भी कितनी सुंदर हो
:
:
:
बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअप साठी पैसे नाही आहेत म्हणून
******************
आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो पण आता त्याने नामी युक्ति काढलिय तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो " दया दरवाजा तोड दो " आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो.. :)

******************
एक चित्ता सिगारेट ओढत होता !
१ उंदीर म्हणाला -"माझ्या बंधू सोड हि नशा , माझ्या सोबत ये , बघ हे जंगल किती सुंदर आहे ."
चित्त्याने विचार केला ,आणि उंदरा सोबत निघाला .
पुढे हत्ती ड्रग्स घेताना दिसला
उंदीर -"हत्ती माझ्या मित्र सोड हि नशा ...."
हत्ती सुद्धा सोबत निघाला
पुढे १ वाघ विस्की चा पेग बनवत होता ,
उंदीर त्याला तेच म्हणाला ...
वाघाने ग्लास बाजूला ठेवला , उंदराच्या ५ -७ कानाखाली वाजवल्या ..
हत्ती -"अरे उंदीर चांगला सांगतोय का मारलेस बिचार्याला ?"
वाघ -"हा जेव्हा जेव्हा देशी पितो ...तेवा असेच बोलतो , ३ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय मी याच्यासोबत !!!"

******************
बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.
******************

प्राध्यापक साठे घाईघाईने वर्गात आले आणि पुस्तक उघडून त्यांनी विचारले, ‘तर मी काल कुठ आलो होतो ?’
‘इथच या वर्गात सर !’ एका मुलाने उत्तर दिले.

******************
"मुलगा- तुझी खुप आठवण येत होती. म्हटलं फोन करुया...
मुलगी- अरे सोन्या, आताच आपण तासभर बोललो ना.. ...
मुलगा- आयला... परत तुलाच फोन लागला...??"
******************
एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन.
.
.
.
.
परीक्षा.. .. .. ..
दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि घरचे आरती पण ओवाळतात..

******************

******************

******************

0 comments: