Saturday, February 16, 2013

सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात



सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात,
खोल गेलेले डोळे अन पडून गेलेले दात!
पण पाठीवर हात ठेवता, मिटते सारी काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

आजीच्या हाताची चव लय लय भारी,
पोट भरेपर्यंत मग ती स्वःता मला चारी!
हॉटेल मधल्या पिझ्झाला तिची चव नाही,
भूक लागल्यावर चारायला आता ती नाही!

आईच अन आजीच मात्र कधीच पटत नाही,
एकदातरी भांडल्याशिवाय दिवस जात नाही!
बाबांनी ओरडल्यावर मात्र आई रडत बसते,
तेव्हा मात्र स्वःता हि तिचे डोळे पुसते!

आजीची माझ्या गोधडी सतरा ठिकाणी फाटलेली,
तरीसुद्धा मायेने ओतप्रोत भरलेली!
बेडवरच्या गादीवर झोप मला येत नाही!
पाणावलेले डोळे मग गोधडी तुझी शोधत राही!

आजीचा माझ्या जीव सगळ्या तिच्या लेकरांवर,
गोठ्यामधली गाई अन कोंबडीच्या पिल्लावर!
सगळ्यांचीच नेहमी करत बसणार काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

माझ्यावर माझी आजी जीवापाड प्रेम करायची,
शब्द पडण्यापूर्वीच इच्छा पूर्ण करायची!
त्या दिवशी मात्र तिन माझ ऐकलं नाही,
हाका मारून रडलो तरी साद दिली नाही!

रडून रडून नंतर डोळे गेले थकून,
आजी माझी गेली आयुष्यातून निघून!
लाडक्या तिच्या नाताला एकटच माग सोडून,
आजी माझी गेली देवाकडे निघून!

देवाने अस का केल मला माहिती आहे,
माझ्याइतकाच तोसुद्धा प्रेमाचा भुकेला आहे!
ए देवा, आजीला माझ्या नेहमी सुखात ठेवायचं,
पुढच्या जन्मीसुद्धा तिलाच तू पाठवायचं!
-अनामिक 

Related Posts:

  • मामा तुझं गाव मामा तुझं गाव.. लहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय इथे शेजारीच राहतो माझा मामा आणि अलीकडे पलीकड… Read More
  • वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावेतुझ्या नाजूक चेहऱ्यावरती स्मिथ हास्य फुलवावे. करताच स्पर्श तुझ्या अंगी रोमांच उभा राहावातुझ्या गुलाबी ओठांचा हळूच स… Read More
  • मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतोमनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतोदूर जरी तू तिथे हितगुज मी साधतो अंतरीची ओळख सखी पाउल इथे रेंगाळतेमनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तू तिथे तृप्तीचे… Read More
  • प्रेम जी माणसे हवीशी वाटतातती कधी भेटत नाहीजी माणसे नकोशी वाटतातत्यांचा सहवास संपत नाहीज्यांच्याकडे जावेशे वाटतेत्यांच्याकडे जायला जमत नाहीज्यांच्याकड… Read More
  • आयुष्यठरवल होत खुप काही पण सारच तस घडल नाहीविधिलिखित असत सार मीही याला अपवाद नाही सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाहीभल्यासठीच होते सारे कल… Read More

0 comments: