Friday, February 1, 2013

बालपण खरच छान असतं

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं .....

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

-श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने !!

Related Posts:

  • जीवन जीवन नामानिराळ्या कविता मरगळलेले शब्द नसावे सळसळणारे गीत असो नफ़ा फ़ायदा सोडून देऊन कळवळणारी प्रीत असो विलक्षणावर प्रेम असावे ऐरे… Read More
  • सुर्योदय सुर्योदय रात्र संपली ! सूर्य उगवला ,पहाट झाली! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओल… Read More
  • पंढरीची वारी पंढरीची वारी भक्तीचा मेळा उत्सव पंढरीचा जनसागर वारकऱ्यांचा  ~  विद्या पालकर … Read More
  • चेहरा चेहरा ----------- चेहऱ्यावरी चेहरा न जाणे त्यावर किती मुखवटे विश्वास अविश्वासाच्या साऱ्या खुणाचं भासती कधी हास्यामागे आक्रंदने लपवती खळी खुलताच… Read More
  • तू सावली तू सावली माझ्या जीवनाची .. तू श्वास माझ्या अंतरीचे .. कधी अश्रू बनून ओघळणारी तू.. तरीही सदा जवळ वाटणारी तू .. जीवनात रंग भरुनी जाणारी … Read More

0 comments: