Sunday, February 17, 2013

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?

वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
-सौमित्र

Related Posts:

  • दुष्काळ दुष्काळाच्या झळा संपता संपेना कर्जाचा बोजा काय कमी होईना ह्यातही घोटाळ्यावर खापर नेत्यांचा नुसता दिखावा सुरु शब्द फार आणि कामाची नुस… Read More
  • बघ माझी आठवण येते का? मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण येते का ? वारय… Read More
  • बीज अंकुरेबीज अंकुरे, अंकुरे, ओल्या … Read More
  • सुर्योदय सुर्योदय रात्र संपली ! सूर्य उगवला ,पहाट झाली! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओल… Read More
  • बालपण खरच छान असतं बालपण खरच छान असतं सारं जग कसं मोकळं रान असतं त्या चिमुकल्या पंखांना आभाळ देखील लहान असतं बालपण खरच छान असतं ..... आईचं धरलेलं बोट जगाचं… Read More

0 comments: