#मराठी
जेव्हा आतुन धुमसत असते
नक्की कविता उमलत असते
घट्ट गुंफले जावे नाते
शिवण अन्यथा उसवत असते
हवा गुलाबी येता जाता
तिची खुशाली कळवत असते
अखेरचा हा श्वास असावा
जीवन तरी खुणावत असते.
शिस्त नकोशी असते त्याला
गझल नेहमी चकवत असते
लग्नाआधी, लग्नानंतर
सदैव नशिबी कसरत असते
नसतो पश्चाताप तरीही
शल्य कोणते बोचत असते ?
कुठे न आता राम राहिला
खुद्द जानकी सांगत असते
~प्रशांत पोरे.
https://www.facebook.com/ PrasPore
जेव्हा आतुन धुमसत असते
नक्की कविता उमलत असते
घट्ट गुंफले जावे नाते
शिवण अन्यथा उसवत असते
हवा गुलाबी येता जाता
तिची खुशाली कळवत असते
अखेरचा हा श्वास असावा
जीवन तरी खुणावत असते.
शिस्त नकोशी असते त्याला
गझल नेहमी चकवत असते
लग्नाआधी, लग्नानंतर
सदैव नशिबी कसरत असते
नसतो पश्चाताप तरीही
शल्य कोणते बोचत असते ?
कुठे न आता राम राहिला
खुद्द जानकी सांगत असते
~प्रशांत पोरे.
https://www.facebook.com/
0 comments:
Post a Comment