Friday, August 8, 2014

तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर


#मराठी

तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर

'तुझी सावली होऊन'* राहावं आयुष्यभर
हेच तर स्वप्न होतं माझं
पण आताशा
हे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर
असंच वाटत राहत अधूनमधून …

पूर्वी तुझी सावली पडायची
योग्य दिशेला आणि योग्य उंचीची
आताशा
ओढाताण होते माझी
तुझ्या सोबत अडजस्ट होताना !

मध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक
अन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.
कधी कधी दिवसा उजेडात …
मीच मला शोधत फिरते
आणि रात्रीच्या गर्भ अंधारात
थैमान घालतात सावल्या
एकीच्या दोन आणि
दोन्हीच्या अगणित होवून !

मी पाहिलं होतं स्वप्न
विश्वासाचं, विश्वासानं
तुझ्या सावलीच्या रुपात

माझीच मला होतेय सध्या दिशाभूल
तुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज
म्हणून ….
आताशा तुझ्या सोबत असले तरी
तुझी सावली होऊन राहणं
जमेलच असं वाटत नाही !

- रमेश ठोंबरे
https://www.facebook.com/ramesh.thombre.9
Blog : http://www.rameshthombre.com/

Related Posts:

  • कितीसा असा उरणार आहे #मराठीकितीसा असा उरणार आहेदाटूनच आलाय तो बरसणार आहे..कर्कश त्याचा वावर आहे..सोसलं जे वसूल करणार आहे..पावसाला पाऊस म्हणाव की नाही..ही शंका आज असुरी … Read More
  • नभाखालती अथांग #मराठीनभाखालती अथांगवेड्या वळणाच्या वाटादर्याखोर्या पहाडांशीकाळ्या अंधाराच्या लाटावाट चालायची दूरकुठे दिसेना सावलीमला टाकून एकटीकुठे हरवून गेलीहोता… Read More
  • देव असलाच तर असावा #मराठी देव देव----,असलाच तर असावाउगवत्या सूर्याच्या सोनवर्खी बिंबातपडणा-या पावसाच्या पारदर्शी थेंबातमेढीला फुटलेल्या हिरव्यालूस कोंबातदेव----,दिस… Read More
  • तितकं वेडेपण झेपलं असतं तर…. #मराठीतितकं वेडेपण झेपलं असतं तर….पायाखालची वाट माझ्याच बापाची होतीशून्याच्या वळणावर सूचना लाखाची होतीहळव्या हळव्या कपाळावर आठी होती खडूसमीच म्हणाल… Read More
  • कुणी कुणाचे ना उरले । #मराठीकुणी कुणाचे ना उरले । स्वार्थात सारे गुंतले ।आधार सरता सगळे । गुरूकडे मन धावले ।।आम्ही आमच्या आरत्या । ओवाळी बघा रोजला ।दया चापटी थोबाडात । डो… Read More

0 comments: